Ritbhatmarathi

Search
Close this search box.

लेकीसाठी बाप स्वतःचे प्राण देखील देतो (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

“रीतभातमराठी_ लघुकथा_ स्पर्धा_ जाने_२२”

– श्री संतोष माळी

एक छोटेसे गाव होते त्या गावांमध्ये एक कुटुंब राहत होतं. हे नवदाम्पत्य कुटुंब काबाडकष्ट करून आपले पोट भरीत होता. पाहता पाहता दिवस गेले. त्यांच्या पोटी एक सुंदर कन्या जन्माला आली, परंतु देवाचे  मनात काही वेगळेच होते. मुलगी एक वर्षाची झाली व त्या गावात भयंकर दुष्काळ पडला. त्या नवदाम्पत्याची स्वतःच्या पोटाची खळगी भरणे देखील कठीण झाले. ते नव दांपत्ये कसे तरी आपले व आपल्या लेकी चे उदरनिर्वाह करीत होते. एकदा पत्नीने पतीला विचारले, आपले दुःख कधी संपणार का? हो आपल्या कन्येला देखील चांगल्या शाळेत दाखला मिळणार का? तिच्या सर्व हौशी पूर्ण आपण करू शकू का तिचे लग्न थाटामाटात करता येईल का? तिला मोठा अधिकारी नवरा मिळेल का? त्यावेळी पती आपल्या पत्नीला समजावून सांगतो हे बघ आपण स्वतःचे  हौस मौज बाजूला ठेवू  व आपल्या कन्येला पाहिजे ते सुख देवू असे म्हणून दोघी खूप कष्ट करू लागले. एके दिवशी रात्री शेतात पाणी भरण्यासाठी ते दोघे गेले. कारण रात्री फक्त चार तास वीज येत असायची. जर या चार तासात आपल्या पिकांना पाणी नाही दिले तर ते पीक येणार नाही. म्हणून दोघे आपल्या लेकीला शेताजवळ एक झोका बांधून त्यात तिला झोपवून पाणी भरण्यासाठी गेले. पती पाणी भरत होता पत्नी त्याला मदत करत होती. तेवढ्यात पत्‍नीला आपली मुलगी जागी झाली व ती रडत आहे असे जाणवले व ती मुलीच्या झोक्याकडे धावत जाऊ लागली. धावता-धावता अचानक तिचा पाय एका विषारी सर्पावर पडतो व तो सर्प तिला दंश करतो ती जोरात ओरडते अहो..

तिची किंकाळी ऐकून पती धावतच तिच्या जवळ येतो. पाहतो तर पत्नीच्या तोंडातून फेस येत असतो. पती समजून जातो आपल्या पत्नीला विषारी सापाने दंश केला आहे. तो तिला उचलून मांडीवर घेतो. तेवढ्यात झोक्यामधून मुलीच्या रडण्याचा आवाज येतो. एकीकडे दोन वर्षांची चिमुकली व दुसरीकडे मरणाच्या दारात असणारी पत्नी त्या पतीला काय करावे ते समजेना त्याने एकदा पत्नीकडे बघितले. तिच्या तोंडातून फेस येत होता. त्याने आपल्या पत्नीला खांद्यावर घेतले व मुलीच्या झोक्या कडे गेला. मुलीला झोक्यातून काढून दुसऱ्या खांद्यावर घेतले व तो  दवाखान्यात पत्नीला नेण्यासाठी रोडच्या दिशेने धावू लागला. परंतु धावता-धावता त्याला जाणवले की पत्नीने शेवटची आरोळी ठोकून मान खाली टाकली. पती समजून गेला माझी अर्धांगिनी मला उभ्या संसारात अर्धवट टाकून कायमची सोडून गेली. परंतु त्याला आता चिंता होती ती लेकीची त्याने धीर न सोडता पत्नीला गावात आणले सर्व विधी कार्यक्रम करून पत्नीला शेवटचा निरोप दिला. दिवसामागून दिवस जाऊ लागले, तशी मुलगी मोठे होत गेली मुलीला त्याने चांगल्या शाळेत दाखल केले. मुलगी शाळेत जाऊ लागली तिला कळायला लागले. त्यावेळी आजूबाजूचे शेजारी पाजारी व गावातील लोक तिला सांगू लागले. जर तुझ्या वडिलांनी त्यांना येत असलेली कला दाखवून वेळेवर पत्नीचा इलाज केला असता तर तुझी आई आज जिवंत असती मुलगी बापाला बोलू लागली. बाबा तुम्ही माझ्या आईला का वाचवले नाही का तिला लवकर दवाखान्यात घेऊन गेले नाही त्यावर तिचा बाप काही न बोलता फक्त तिच्याकडे पाहत होता.

मुलीला बापाबद्दल आजूबाजूचे लोक पुन्हा पुन्हा सांगू लागले. तुझा बाप तुझ्या आईला वाचू शकला असता हे दररोज ऐकून मुलीला बापाबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला. मुलगी बापाला जास्त प्रेम करत नव्हती. तरीदेखील बाप् मुलीचे कल्याण व्हावे म्हणून सतत रात्रंदिवस काबाडकष्ट करीत राहील एके दिवशी बापाच्या लक्षात आले मुलगी उपवर झाली आहे. लग्न करणे आवश्यक आहे म्हणून बापाने आपल्या शेतातली स्वतःच्या नावे असलेली जमीन विक्री काढली व एका मोठ्या अधिकाऱ्याचे स्थळ मुलीसाठी घेऊन आला. त्या अधिकाऱ्याला देखील मुलगी आवडली. बापाने मोठ्या थाटामाटात मुलीची सर्व हौस मौज पूर्ण केली व लग्न पार पाडले. मुलीला मोठ्या आनंदाने बापाने तिच्या सासरी पाठवले व आपल्या पत्नीचा फोटो जवळ जाऊन ढसाढसा रडून सांगू लागला बघ आपण दोघांनी बघितलेले स्वप्न आज साकार केले मुलगी चांगल्या घरात सुखी राहील अशा ठिकाणी पाठवली. दिवसामागून दिवस जाऊ लागले तिकडे बापाचे नावे असलेले शेती विकली गेली. असल्यामुळे बापाने दुसऱ्याच्या शेतात मंजुरीने काम करण्यास सुरुवात केली. मोठ्या कष्टाने तो दोन वेळेचे जेवण करू शकत होता. दुसरीकडे मुलीने शहरात मोठा बंगला घेतला बंगल्याची वास्तुशांती होती त्या वास्तुशांतीसाठी मुलीच्या पतीचे मोठमोठे अधिकारी मित्र येणार होते.

मुलीने बापाला निरोप पाठविला. आमच्याकडे माझ्या मोठ्या बंगल्याची वास्तुशांती आहे. तुम्ही सदर कार्यक्रमासाठी या परंतु माझी एक अट आहे. येताना जरा चांगले कपडे घालून या मळकट व फाटके कपडे घालून आला. तर माझ्या पतीला त्यांचे अधिकारी मित्रांना तुमची ओळख दाखवण्यात लाज वाटेल व मलादेखील ते योग्य वाटणार नाही. म्हणून चांगले कपडे घालून या मुलीचा निरोप ऐकून बापाने सावकाराकडून पाचशे रुपये व्याजाने घेतले व साडे चारशे रुपये चा सदरा घेतला व मुली साठी पन्नास रुपयाचे गोड घेतले आणि मुलीच्या बंगल्याकडे शहरात जाण्यासाठी निघाला मुलीच्या बंगल्या जवळ आला. तेव्हा पाहतो तर काय मोठंमोठ्या गाड्या लागलेल्या श्रीमंत माणसे अलिशान कपडे घालून बंगल्यात जात होते. बाप मुलीच्या बंगल्यासमोर गार्डन मध्ये थबकला तेवढ्यात मुलगी आली. मुलीने बापाला बघितले व बापावर लहानपणापासून असलेला राग तिच्या चेहऱ्यावर दिसला व बोलली बाबा तुम्ही माझ्या आईला वाचवली नाही व आता मी सांगितले तरी असे हलक्या दर्जाचे कपडे घालून आला मला तुमची लाज वाटत आहे. थांबा मी तुम्हाला घरातून चांगले कपडे आणून देते बापाला खूप वाईट वाटले त्याने विचार केला. आपल्या मुलीला तिच्या कार्यक्रमात आपल्यामुळे लाज वाटू नये म्हणून आपण गेलेलेच बरे म्हणून बापू हळूहळू गार्डन मधून बाहेरच्या दिशेने जाऊ लागला तेवढ्यात मागून जोरात आवाज आला. अरे वाचवा वाचवा व गर्दी जमा झाली बाप त्या गर्दीतून वाट काढत सदर ठिकाणी जाऊन पाहतो तर काय त्याच्या मुलीला गार्डन मध्ये एका विषारी सापाने  दंश केलेला आहे. लोक म्हणू लागले ॲम्बुलन्स  बोलवा दवाखान्यात न्या परंतु बापाने त्याच्या नवीन सदरा काढला व मुलीच्या पायाला घट्ट बांधून ज्या ठिकाणी सापाने दंश केला होता.

त्या ठिकाणी स्वतःचे तोंड लावून तोंडाने विष बाहेर काढू लागला पाहता पाहता बापाला चक्कर येऊ लागली व मुलीच्या शरीरातील सर्पाचे विष कमी होत गेल्यामुळे मुलगी शुद्धीवर येत गेली मुलगी पूर्णपणे शुद्धीवर आली व तीने बापाकडे बघितले व आपल्या दंश झालेल्या जखमेकडे बघितले व बापाच्या तोंडाकडे बघितले व बापाला म्हटले बाबा तुम्हाला ही कला अवगत होती. मग तुम्ही त्यावेळी माझ्या आईला का नाही वाचविले त्यावेळी बाप अर्ध शुद्धीवर असताना बोलला बेटा तुझ्या आईला कोब्रा नावाच्या अत्यंत विषारी सापाने दंश केलेला होता जर मी ही कला त्यावेळी वापरली असती आणि जर तुझी आई व मी आम्ही दोघे नाही वाचलो असतो तर माझ्या छोट्याशा चिमणीला झोळीत शांतपणे झोपली आहे तिचे संपूर्ण आयुष्य तिला जगायचे आहे. आम्ही दोघांनी त्या चिमुकली साठी अनेक स्वप्नं पाहिलेली आहेत ते पूर्ण करणार कोण मी माझ्या चिमुरडीला कोणाच्या भरवशावर सोडून जाऊ हे जग चांगले नाही बेटा म्हणून मी माझ्या अर्धांगिनीला या जगाचा निरोप येऊ दिला व त्याच वेळी मनातल्या मनात तिला वचन दिले की मी तुझ्या चिमुकलीला तू तिच्यासाठी पाहिले सर्व स्वप्न पूर्ण करीन चांगले शिकवीन चांगल्या घरात थाटामाटात तिचे लग्न करीन असे बोलून बापाने शेवटचा श्वास घेतला याला म्हणतात बाप……….

– श्री संतोष माळी

====================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.

हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.

पहिला विजेता – १००१/-

दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी

तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी

बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *