Ritbhatmarathi

Search
Close this search box.

“अग मी येणार आहे लवकरच,काही खास नाही ग असाच चाललोय काकांना भेटायला’’, रोहन पुजाला सांगत होता.

‘’ठिकय पण आला की सर्वात आधी माला फोन करून भेटायला यायच!’’,पुजा हक्काने बोलली.

‘’हो ग,नक्की येईन’’, रोहन हसत बोलला.

पुजा आणि रोहन लहानपणा पासूनचे मित्र, रोहनला पुजा खूप आवडायची अगदी लहानपणा पासून तो तिच्यावर प्रेम करायचा पण पुजाला सांगायच धाडस कधी त्याच्याकडून झालंच नाही, मग शेवटी व्हायचं तेच झालं..

एक दिवस पुजा त्याच्याकडे पळत पळत आली …..“रोहन मी खूप खुश आहे आज मला सुभाषने प्रपोज केलं , मी पण त्याला हो बोलले, मी काही चुकीचं नाही ना केलं…??”

रोहनला काय बोलावं ते सुचेना तोंडावर नकली हसू आणत तो बोलला… “अरे वा अभिनंदन खूप चांगला मुलगा आहे तो’’

त्या दिवशी घरी जाऊन एकांतात खूप रडला तो, पण त्याला पुजाचा आनंदी चेहरा आठवला, किती खूश होती ती सुभाष सोबत आणि मग त्याला स्वत:चाच राग आला, कसलं प्रेम आहे माझं जे पुजाला आनंदी पाहून अश्रु वाहवत बसलोय.

दिवसामागून दिवस जात होते आणि सुभाष आणि पूजातर प्रेमात पूर्ण बुडाले होते..रोहन काही दिवसांसाठी दिल्लीला चालला होता त्याने पुजाचा फोनवरच निरोप घेतला, दिल्लीमधे त्याचे काका होते,खूप मोठे डॉक्टर होते ते.

बघता बघता सहा महीने होवून गेले,रोहनला पुजाची खूप आठवण यायची पण त्याने तिला जाणीवपूर्वक तिच्याशी बोलणं टाळलं होतं…सहा महिन्या नंतर तो परत आला…रेल्वे स्टेशनवर आल्या आल्या त्याने पूजाला फोन केला परंतु तिचा फोन बंद होता, मग रोहन घरी गेला थकल्यामुळे त्याला लगेच झोप लागली…थोडा आराम करून मग तो उठला आणि पुन्हा पुजाला फोन केला पण अजूनही फोन बंदच होता, मग त्याने सुभाषला फोन केला,

“बोल रोहन,कधी आलास पुण्यात’’…सुभाष बोलला

“अरे सकाळीच आलो, पण मला सांग पुजा कुठे आहे आणि फोन का बंद आहे तिचा…??” रोहन सरळ मुद्द्यावर आला ..

“हे बघ रोहन मला तिच्या बद्दल काही बोलायचं नाही मागचा चार महिन्या पासून मी बोललो नाही तिच्याशी” सुभाष त्रासिक आवाजात बोलला

‘’अरे का काय झाल.भांडण झाल का तुमच..तुम्ही तर किती प्रेम करायचा….?? रोहनला काही कळत नव्हतं.

“रोहन तुला बोललो ना मला काही बोलायच नाही पुजाबद्दल”,सुभाष चिडून बोलला.

“अरे पण झाल तरी काय”

“बलात्कार झालाय तिच्यावर….” सुभाष ओरडून बोलला आणि फोन कट करून टाकला. रोहनच्या तर पायाखालची जमीन सरकली हे ऐकून…तो जागेवरच बसला..रोज तो बातमी ऐकायचा पेपर मधे वाचायचा बलात्कार बद्दल पण आपल्या एका जवळच्या व्यक्तिसोबत अस काही घडलं अस त्याने कधी विचार केला नव्हता..तो लगेच तेथून उठला आणि सरळ पुजाच्या घरी गेला, त्याने बेल वाजवली पुजाच्या आईने दरवाजा उघडला,

“ये ना रोहन किती दिवसानी आला आहेस”पुजाचा आईने त्याच स्वागत केल..रोहनला चहा बनवून दिला.. रोहन इकडे तिकडे पाहून बोलला.. “पुजाबद्दल समजल मला” एवढं ऐकून पुजाची आई रडू लागली आणि बोलली.. “रोहन बघ ना रे काय झाल माझ्या पिल्लासोबत लोकल मधून येत होती रे रात्रीची…. चार नराधमांनी तिला घेरल आणि तिची अब्रू लुटली रे”

रोहन …. “कुठे आहे ती?”

“रूममधे बंद असते आणि आता तर नवीनच खूळ भरलय तिचा डोक्यात” पुजाची आई डोळे पुसत पुढे बोलली, “तिला त्या घटनेमुळे दिवस गेलेत”

रोहनला तर एकामागून एक धक्के बसत होते.. आई पुढे बोलली… “तिला गर्भपात करायला सांगितलं तर तयार पण नाही, तूच समजून सांग आता तिला, समोरच्या रूम मधे आहे ती..”

रोहन उठला आणि हळूच रूम मधे गेला, पुजा कोणततरी पुस्तक वाचत होती, केस मागे बांधलेले, चेहर्‍या वरील तेज तर नाहीस झालं होतं…

“पुजा…”……रोहनने हलक्या आवाजात हाक मारली पुजाने रोहनला पहिलं आणि खूप खुश झाली,दोघे बोलत बसले थोडा वेळ बोलल्या नंतर रोहन बोलला.. “तुझ्यासोबत जे घडलं ते कळलं मला खूप वाईट वाटलं ऐकून”

पुजा बनावट हसत बोलली.. “अच्छा तर तू मला सात्वन द्यायला आला आहेस तर…”

“नाही ग…पुजा पण,मला अस वाटतं की तु गर्भपात करून कुठेतरी लग्न करावस”रोहनला तिची काळजी होती..

पुजा बोलली..”हे बघ रोहन जे घडलं त्यात माझ्या पोटातील जीवाचा काय दोष होता, त्या राक्षसानी जे केल त्याची शिक्षा मी या छोट्या जीवाला नाही देऊ शकत”

“अग मग लग्न कर ना, लग्न करायला काय हरकत आहे..?? रोहन बोलला.

आता मात्र पुजाला रोहनची कीव आली आणि बोलली.. “कोण करणार माझाशी लग्न, त्या घटने नंतर तर सुभाषने मला एकदा पण फोन नाही केला,मी प्रयत्न केला तर त्याने सरळ सरळ पुन्हा फोन करू नको म्हणून बजावल” पुजाचा डोळ्यातून पाणी आल..

“अग पण सुभाषच का…? दुसर कोणीतरी नक्की लग्न करेल तुझ्याशी” रोहन बोलला

“तू करशील माझाशी लग्न..?? पुजाने विचारलं असल्या अनपेक्षित प्रश्नाने रोहन गोंधळला आणि बोलला.. “नाही,ते शक्य नाही..”

पुजा हसली आणि बोलली, “हेच मी तुला सांगतेय, बोलणं खूप सोप असत आणि करन तेवढच अवघड,एखाद्या मुलीच मार्तुत्व स्वीकारायला पुरषार्थ लागतो..”

“रोहन उठला आणि खिडकीतून उगाचच बाहेर बघत बोलला… “तुझ मार्तुत्व स्वीकारायच पुरुषार्थ आहे माझात” रोहन वळला आणि पुजाकडे पाहत बोलला… “पण तुला मार्तुत्व देण्याचा पुरषार्थ नाही माझ्यात”

पुजाला उठून उभी राहिली आणि बोलली, “म्हणजे…???”

रोहन बोलला…”मी कधी बाप बनू शकत नाही…..” पुजाला हे ऐकून खूप धक्का बसला

रोहन पुढे बोलला… “दिल्ली मध्ये काकांकडे गेलो होतो,ते डॉक्टर आहेत म्हणून म्हटलं करून घ्यावं पूर्ण चेकअप त्याच रिपोर्ट मध्ये हे सिद्ध झालं,तू बोल आता,मी तुझा बाळाला माझ नाव द्यायला तयार आहे,पण तू तयार आहेस का अशा माणसाचं नाव लावून घ्यायला जो कधीच तुला पुन्हा आई बनवू शकत नाही…”

पुजा त्याचाजवळ गेली ….. “तू माझा स्वीकार करतोय यातच तू तुझ पुरषत्व सिद्ध केलस,मी तुला देईन आयुष्यभर साथ…”

दोघांनी एकमेकांचा हातात हात दिला आणि बाहेर निघाले, एका अशा आयुष्याकडे जिथे फक्त ते दोघेच एकमेकांच्या भावना समजू शकत होते.

==================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories