Ritbhatmarathi

Search
Close this search box.

नवऱ्याने नवीन ट्रेंडनुसार जुना फोटो अपलोड करावा म्हणून अलबममधला   गोबऱ्या गालांचा ,बाजूला बदकबिदक ठेवलेला, डोळ्यांत काजळ रेखाटलेला स्वत:चा फोटू काढून टेबलावर ठेवला न् बेल वाजली म्हणून दार उघडलंन तर शेजारीण शंकरपाळीची कातणी मागायला आत आली.

नेमकं तिचं लक्ष त्या फोटोतल्या गोंडस बाळाकडे गेलं. झेप घालून तिने तो फोटू उचलला..अय्या कित्ती गोड म्हणत दोनचार मुके(फोटूचे) घेतले न् इकडे तव्यातली चपाती धुमसली.

खाऊ का गिळू या नजरेने बायकोने नवऱ्याला पाहिलं न् आम्ही आज शंकरपाळ्या करणार आहोत..झालं की चिंगीकडे पाठवते म्हणत तिनं शेजारणीच्या तोंडावर दार आपटत नवऱ्याकडे मोर्चा वळवला.

नवरा खिंडीत अडकला हे सांगणे न लगे.

–गीता गरुड.

===========

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *