Ritbhatmarathi

Search
Close this search box.

अलका छोट्याशा गावात वाढलेली जिथे जीवनावश्यक सोयी सुविधांची देखील कमतरता होती. गावात गरिबी होती. अलका, ३ बहिणी, १ भाऊ आणि आई वडील असं भरलेलं कुटुंब होतं. अलका बहिणींमध्ये सगळ्यात लहान आणि भाऊ तिच्या पाठचा होता. कुटुंब जरी भरलेलं असलं तरी घरात गरिबी होती. आई वडील आणि हि पण दुसऱ्याच्या शेतात रोजाने कामाला जात असत.

तिच्या बापाला ३ बहिणींची लग्न करता करता नाकेनऊ आलं होतं. सावकाराकडून कर्ज घेत तिशीची लग्न कशीबशी आवरली. आता राहिली हीच. अलका १२ वी मध्ये होती. गावापासून २ कमी वर तिचं कॉलेज होतं. पैशांच्या तंगीमुळे बाकी ३ बहिणींची लग्न १०-१२ वी झाल्यावरच बापाने आटोपली होती. तशाही त्यांनाही पुढे शिकायची इचछा नव्हतीच. पण अलका अभ्यासात खूप हुशार होती. तिला पुढे शिकायचं होतं. अलकाचा भाऊ हि ११ वीत होता पण तो कसा बस इथपर्यंत पोहोचला होता. दिवसभर नुसता मित्राबरोबर टवाळक्या करत फिरायचा. हा त्याचा रोजचाच नियम. अलका अभ्यासात तर हुशार होतीच पण घरचा पाठिंबा नसल्याने ती घरची सगळी कामं पहाटेच लवकर उठून करत असे आणि मग सकाळी रोजाने कमला जात. दुपार झाली की पळत पळत कॉलेज गाठायची त्यात हि तिचे पहिले २-३ लेक्चर्स  सुटायचेच.  पण अलका उशीर असल्याने शिक्षकांचा तिला पाठिंबा होता.

एक दिवस अलकाला शेजारच्या गावातून स्थळ आलं होतं. मुलगा नगरपालिकेत कामाला होता. सगळं चांगलं होतं. फक्त मुलाकडचे घेउपासडे होते. पण मुलगा आणि घरचं चांगलं असल्याने अलकाच्या बापाने नगद ५०,००० रुपये आणि लग्न लावून देणे ह्या अटीवर अलकाचं लग्न जमून टाकलं. इकडे अलकाने लग्नाची ध्यस्तीच घेतली होती. एक दिवस धाडस करून ती बापाला बोललीच…

“अण्णा , मला पुढं शिकायचंय , तुम्ही मला फक्त अजून ४ वर्ष द्या ना…”

“मला लगेच नाही करायचंय लग्न”

अलकाचे वडील –  “तू गप गं, तुले काय कळतंय ह्यातलं, आणि तू शिकून काय मोठी अधिकारी व्हायचीस का गं”

“तुले शिकून म्या काय करू… पैसं पायी पैसं बी जाईन आणि शिकून तुले उद्या सासरी घरातली कामाचं करायची न्हवं”

“मले माझ्या ईक्याले बी शिकवायचं हाय पुढं. तुले शिकवून तू तर दुसऱ्यांचीच धन होणार न्हवं”

“पोराले शिकवलं तर म्हातारपणी आमच्या गोळ्या औषधांचं बी बघीन माझं पोरगं “

अलकाच्या बापाने काही तिचं ऐकलं नाही आणि २ महिन्यातच तिच्या लग्नाचा बार उडवून टाकला. लग्नाच्या थोड्याच दिवसात नवऱ्यासकट अलकाच्या सासरच्या लोकांनी पैशासाठी तिचा छळ करायला सुरुवात केली होती. रोज तिला खूप मारहाण होयची. जवळपास वर्षभर रोज असाच चालू होतं. एक दिवस अलका घरातून कुणाला न सांगताच माहेरी निघून आली. तिने आई बापाला सगळं सांगितलं. तिच्या बहिणींनाही बोलावून घेतलं होतं. पण अलकाचं कुणीच ऐकलं नाही.

अलकाचा बाप तिला म्हणाला ,

“बये लग्न झाल्यावर पोरीचं सासरचं तिचं घर असतं, मग ते कसं का असणा , गोडच मानून घ्येले लागतेय “

अलकाच्या बहिणीही तिच्या वरच कोसळल्या होत्या. मोठी बहीण म्हणाली ,

“हे बघ अल्के, त्रास कुणाला नसतो व्ह , आम्हाला बी लै त्रास हाई …घरातली कामं करून रोजानं कामाला  जायले लागते आम्हला बी.”

सगळ्यांनी अलकाला समजावलं आणि दुसऱ्या दिवशी तिचा नवरा तिला घ्याल येणार होता.

अलकाला समजावून सगळे निवांत झोपायला गेले पण अलकासाठी मात्र आजची रात्र फार जड होती. तिने विचार केला कि आज सगळे निवांत झोपले, पण उद्यापासून पुढे आयुष्यभर आपला निवांतपणा शोधूनही सापडणार नाही. फार विचार केल्यावर आपलं गाठुडं घेऊन पहाटेच ती घरातून बाहेर पडली. कुठे जायचं हे तिलाही माहित नाही. थोडेफार पैसे होते तिच्या कडे. गावातून एक बस पकडली.. नशिबाचा खेळ सगळा ती बस पुण्याची निघाली. पुण्यात आल्यावर तिने तिच्या कॉलेजच्या नेने बाईंना कॉल केला. नेने बाई अलकाच्या कॉलेज मध्ये भूगोल शिकवायच्या. अल्काची शिकण्याची जिद्द आणि अभ्यासात हुशारी पाहून नेने बाईंचा तिला खूप सपोर्ट असायचा. 

गेले वर्षभर नेने बाईंशी संपर्क नव्हता तिचा, पण तरीही अलकाने कॉल करताच नेने बाईने तिला ओळखलं होतं. नेने बाईंच्या ओळखीतले नातेवाईक पुण्यात होते त्यांच्या मदतीने अल्काची पुण्यात सदाशिव पेठेत स्वस्तात राहायची सोय  झाली. अलकाकडे लग्नातले थोडे किडुक मिडूक दागिने होते ते तिने विकले होते आणि नेने बाईनेही पैशांची थोडी मदत तिला केली होती. अलकाने पुढे जाऊन पुण्यात च एका कॉलेज मध्ये बी.ए. साठी ऍडमिशन घेतले होते. बी.ए. करता करता पैशांची थोडी अडचण  येत होती आणि नेणेबाईंचेही घेतलेले पैसे तिला लवकरात लवकर परत करायचे होते. म्हणून तिने घराजवळच एका नामांकित स्पर्धा परीक्षेच्या ऑफिस मध्ये रेसेपशनिस्ट म्हणून नोकरी पाहिली. अलका आता पुण्यात चांगलीच रुळून गेली होती.

इकडे गावाकडे अलकाच्या भावाने स्वतःच मुलगी शोधून लग्न केलं होतं आणि तो आणि त्याची बायको दोघेही आई वडिलांच्या उरावर बसून खात होते. आई वडील अजूनही रोजानेच कमला जात होते. कुठे अलकाच्या बापाने पोराला शिकवायची स्वप्न पहिली होती पण झाले भलतेच होते.

अलकाला नोकरी करता करताच स्पर्धा परीक्षांचं खुळ लागलं होतं. कोचिंग क्लास मध्ये नोकरी करताना तिला स्पर्धा परीक्षेबाबत बरंच काही माहिती झालं होतं.

बी.ए. शेवटच्या वर्षाला असताना तिने एम.पी.एस.सी राज्यसेवा परीक्षेचा फॉर्म भरला आणि वर्षभर जिद्दी आणि चिकाटीने अभ्यास करून पुढच्या वर्षी तिने परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात अलका नुसती पास नाही झाली तर राज्यातून मुलींमध्ये प्रथम येऊन तिने राज्यसेवेतलं सर्वात उत्कृष्ट मानलं जाणारं उपजिल्हाधिकारी हे पद प्राप्त केलं होतं. आज निकालाच्या दिवशी अलकाने जे काही कष्ट केले त्याचं चीज झालं होतं.

संपूर्ण महाराष्ट्रात हि बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. सर्वच वर्तमानपत्र आणि टीव्ही वर अलकाचा फोटो होता. अलकाच्या गावातही हि बातमी पसरली. गावातले लोक आणि सावकार अलकाच्या घरी आई वडिलांचे अभिनंदन करायला आले तेव्हा त्यांना कळालं कि आपली पोरं मोठी अधिकारी झाली आहे .

सावकारातून अधिकारी झाल्याचं कळल्यावर अलकाच्या बापाच्या डोळ्यातले अश्रू काही थांबेना….डोळ्यातला प्रत्येक अश्रू त्यांना अलकाला मारलेला टोमणा आठवून देत होता ..”तू शिकून काय मोठी अधिकारी व्हायचीस का गं. “

आणि आज खरंच पोरगी अधिकारी झाली होती. आई बापाच्या डोळ्यात आनंदाश्रू तर होतेच पण त्याही पेक्षा डोक्यावर एक ओझं होतं कि आपण आपल्या लेकीला समजून नाही घेऊ शकलो. आता लेकीला भेटायला गेलोच तरी कुठल्या तोंडाने जायचं. तेवढ्यात अलका तिथे आली आणि आपल्या आई बापाला घट्ट मिठी तिने मारली.

तिचा संघर्ष हा तिचाच होता. गोष्टी संघर्ष आणि कष्ट करून मिळाल्या तर त्याचा आनंद द्विगुणित होतो. त्यामुळे तिने आपल्या घरात कुणालाही दोष न देता सगळ्यांना माफ केलं होतं.

वर्षभरात ट्रैनिंग संपल्यावर अलकाला ५ खोल्यांचा सरकारी बंगला राहायला दिला आणि ती आई बापाला घेऊन तिथेच राहू लागली. अधिकारी झाल्या झाल्याचं तिने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दिला होता आणि तोही मंजूर झाला होता. अलकाला मागचं सगळं विसरून नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात करायची होती.

आज तिला एवढ्या वर्षांनी रात्री निवांत झोप लागली होती.

===================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories