Ritbhatmarathi

Search
Close this search box.

संध्याकाळची वेळ होती…सेजलताई  निवांत चहा पित होती…आपला मुलगा सुहास त्याच लग्न लावून दिलं…सूनही खूप चांगली मिळाली नशिबाने…’देविका’ तिचं नाव…सगळ्या कामात पारंगत घरात फक्त तिघेच…सेजलताई  मात्र रोज आपल्या नवऱ्याचा छोटासा फोटो हृदयाशी घेऊन रडत असे…आपल्या घरातला लक्ष्मी  नारायणाचा जोडा पाहून सेजलताई ला नेहमी स्वतःचा भूतकाळ आठवत असतो…खूप कमी वयात विधवा झाल्याने आपला नवरा अरविंद याच्या आठवणी आठवून नेहमी रडत असे…चहा पितानाही अरविंदचा विचार काही मनामधून जात नव्हता…

देविका एक कस्टम अधिकारी असल्याने घरी खूप कमी थांबत असे…जबाबदारीच काम होत म्हणून…बाहेरची जबाबदारी पेलता-पेलता घरातली जबाबदारीही देविका पेलत असे…सेजलताई  चहा पिऊन झाल्यावर लगेच एक मोठी डायरी घेऊन बसते…त्यात अरविंदबरोबरचे किस्से लिहीत असते…” अरविंद तुला माझे लांबसडक केस खूप आवडायचे ना…पण आत्ता पाहशील ना तर केस खूपच कमी झालेत माझे…असं होत ना…जाऊदेत ना आता कुणाला दाखवायचेत केस..तू नेहमी मला गजरा आणायचास…मला बाहेर फिरायला घेऊन जायचास…मी दुसऱ्या कुणाशी बोललेही तुला आवडत नसायचं…म्हणून कायम माझ्या मागे-मागे करायचास…तुला माहितीय आपल्या मुलाच्या म्हणजे सुहासच्या लग्नाला आता दोन वर्ष होतील…

देविका खूप समजूतदार आहे…त्या दोघांना पाहिलं ना कि मला आपली आठवण येते…आपण असंच फिरत असायचो ना…सासुबाईंनी म्हणजे माईंनी मला तर खूप माया लावली…पण त्यांचंही प्रेम माझ्या नशिबात नव्हतं…नशिबाने त्याही तू जायच्या आधीच मला आणि तुला सोडून गेल्या निमित्त होत फक्त एका आजाराचं…असं वाटत मी कुठे तरी कमी पडले कि काय…” सगळं लिहीत असताना सेजलताई च्या डोळ्यातून पाणीही टपकत होतं…डायरीचे कागद भिजत होतं फक्त…इतक्यात दारावरची बेल वाजली…तसं सेजलताई ने डोळ्यातलं पाणी पुसलं…दरवाजा उघडताच समोर देविकाला पाहताच चेहरा टवटवीत होतो…

देविका – काय आई…काय झालंय…डोळे ओढून धरल्यासारखे वाटतायत…

सेजलताई  – काही नाही ग…नंबर वाढलाय असं वाटतंय…कारण वय काय आहे माझं आत्ता ५० ओलांडली कि…नंबर वाढत असतो सारखा…

देविका – हम्म…चला तर मग…गरम-गरम सामोसे आणलेत खाऊन घेऊयात…

सेजलताई  – हो..अगं पण सुहास ला येऊ देत की..

देविका – आई…त्याला यायला अजून वेळ आहे…मला फोन आला होता त्याचा…आपण खाऊन घेऊयात

सेजलताई  – थांब… मी प्लेट्स आणते…तू फ्रेश होऊन ये…

सासूबाई प्लेट्स आणतात तोपर्यंत देविकाही आवरून येते…दोघीही मस्त गरमागरम समोस्यांवर ताव मारत होत्या…देविका आपल्या सासूशी बोलतोय पण सेजलताई ताई मात्र आपल्या तंद्रीतच होत्या…देविकाही आपल्या सासूबाईंना बोलतं करू पाहत होती…

देविका – आई…काय झालंय…मी बोल-बोल बोलतेय…तुम्ही काहीच बोलत नाहीय….आई…मला तुमची एक मैत्रीणच समजा…कारण आता वर्ष होईल आमच्या लग्नाला…मी या घरात आल्यापासून तुम्हाला पाहतेय…तुम्ही आपल्याच विश्वात मग्न असतात…माझ्याशीही काही बोलत नाही…मी आवडत नाही का तुम्हाला…?

सेजलताई  – नाही ग बाळा…असं कसं म्हणतेस तू…

देविका – नाही ना…मग मला सांगाल सगळं…

सेजलताई  – यांची आठवण जात नाही ग…तुम्ही नसलात ना…सगळीकडे फक्त यांचाच भास होत असतो…सुहास खूप लहान होता ग…तुझे सासरे गेले तेव्हा…त्यांच्या आठवणींवरच जगायचंय मला आत्ता….

देविका – आई …झालं गेलं…झालं सगळं…आता आठवणी येणारच…आठवण आली की आपण आपल्या विश्वात रममाण होतो…तुम्हाला अजूनही मामंजींना विसरायला हवंय…तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडलं पाहिजे…

सेजलताई  – नाही ग नाही विसरू शकत यांच्याबरोबरचा प्रत्येक क्षण…

देविका – आई…तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या…एक सांगू…नाही तुमच्यासाठी दोन-दोन पर्याय आहेत माझ्याकडे…म्हणजे तुमची इचछा असेल तर…मी दबाव नाही टाकत आहे तुमच्यावर…

सेजलताई  – दबाव कसलं ग पोरी…बोल ना मैत्रीण ना तू माझी…

देविका – आई…तुम्ही स्वतःला अजूनही एकट्या समजतात बरोबर…! मग आत्ता तुम्हाला जर कुणी लग्नाची मागणी घातली तर…

सेजलताई  – अशक्य….तू काहीही पर्याय सुचवू नकोस गं…या वयात दुसरं लग्न…लोक काय म्हणतील….तू जर माझं दुसरं लग्न लावणार असशील तर भांडणं होतील आपल्यात…

देविका – आई…परत तुम्ही अग्ग्रेसिव्ह होत आहेत….शांत व्हा….माझा दुसरा पर्याय तर ऐका की….

सेजलताई  – बोल…ऐकतीय मी…

देविका – आई…मी सुहास कडून खूप ऐकलंय तुमच्या गाण्याविषयी…तुम्ही खूप छान गाता म्हणून…मला असं वाटत तुम्ही तुमच्या गाण्यावर फोकस करावं…आवाजही मस्त आहे तुमचा…बऱ्याचदा गुणगुणताना ऐकलंय मी तुम्हाला…

सेजलताई ताई – म्हणजे नक्की काय करायचं याच…गाण्याचं सांगायचं झाल्यास गाणं आता मनातून यायला हवंय…गाणं फक्त ओठात उरलंय आता…मनातून गाणं येन बंद झालंय आता…

देविका – आई…अहो तेच तर तुम्हाला करायचंय…गाणं मनातून येण्यासाठी ज्याच्यासाठी गाणं म्हणायचात त्याची आठवण मनामधून आली की…सूर सापडतील आणि हरवलेलं परत येईल की…म्हणजे पुढच्या महिन्यात आमच्या ऑफिसमध्ये टॅलेंट हंट म्हणून एक स्पर्धा आहे…त्यात ना सगळ्या स्टाफच्या नातेवाइकांमधून कुणी ना कुणीतरी सहभागी होतंय…माझ्या तर्फे मी तुमचं नाव द्यायचं ठरवलंय…तुम्हाला पटतंय ना माझं म्हणणं…

सेजलताई ताई – देविका…टॅलेंट हंट म्हण्याइतकी काय मी टॅलेंटेड नाही हा…उगाच मला चढवू नकोस…हे गेल्यापासून मला माझ्यातला सूरच सापडत नाहीय…

देविका – आई…मामंजींसाठीच तर म्हणा ना गाणं…आपण महिनाभर मस्त तालीम करूयात

गाण्याची…उद्यापासूनच करूयात तयारी…सुहासला आपण मस्त सुखद धक्का देऊयात…

सेजालताईंनीही नाही…नाही म्हणत शेवटी गाणं म्हणायला हो म्हटल्या…दोघीही मस्त

गाण्याची तालीम करत होत्या…पंधरा दिवसात गाणं अखेर बसवून झालं…हळू-हळू ते प्रेक्षकांसमोर कसं म्हणायचं याची प्रॅक्टिस करू लागल्या मग काही दिवसांनी प्रेक्षकांची भीतीही गेली….अखेर गाणं प्रेसेंट करण्याचा दिवस उजाडला…सेजलताई मस्त क्रिम कलरची पैठणी त्यावर मस्त नाजुकशी मोहनमाळ,केसांचा अंबाडा आणि त्यावर चाफ्याच्या फुलांचा गजरा…या वेशात स्टेज वर जातात…सुहासला आपल्या आईमध्ये झालेला बदल पाहून खरंच खूप आनंद होतो…पण सुहासला गाण्याबद्दलची जराशीही कल्पना नसते…अचानक आपल्या आईच नाव अनाऊन्स होत…सुहास मात्र एक टक आपल्या आईकडे पाहताच असतो…सेजालताईही मस्त डोळे मिटून मनात..अरविंदरावांचा चेहरा आणून तालासुरात गाणं म्हणतात…गाण्याचे बोलही साजेशेचं असतात …

                         ‘तेरी तसवीर को सिनेसे लगा रक्खा है…‘   

                          हमने दुनियासे अलग गाव सजा रक्खा है…

गाणं संपताच सर्व प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट होतो…अत्यंत भावपूर्ण अशा शब्दात सेजलताई ते गाणं म्हणतात…कारण ते गाणं त्या जगलेल्या असतात…सुहासही आपल्या आईकडे एकटक बघतच राहतो…अल्पोहारचा कार्यक्रम होतो आणि सगळेजण आपापल्या घरी जाण्यासाठी निघतात. घरी आल्यावर सुहास लगेच आपल्या आईचे तोंडभरून कौतुक करू लागतो…

सुहास – आई…मला नव्हतं माहिती तू एवढी मस्त गातेस…

सेजलताई – हम्म…खरं तर तुझ्या पप्पानीच मला गाण्याची गोडी लावली…

देविका – सुहास…अरे हे काय…तूच मला सांगितलंस ना आईंच्या गाण्याबद्दल…आत्ता माहिती नाहीय असं म्हणतोस तू…

सेजलताई – मी स्टेजवर गातेय हे पहिल्यांदाच पाहत असेल तो ग…कारण मी कधीच असं सगळ्यांसमोर परफॉर्म केलं नव्हतं…तुझ्याचमुळे ते शक्य झालं बघ…

देविका – आई…खरंच तुमचा खूप अभिमान आहे आम्हाला….गाणंही तुम्ही अगदी साजेसं असं निवडलं होत…केवढं अवघड गाणं आहे ते…श्वास सुद्धा घ्यायला जागा नाही त्या गाण्यात…हुबेहूब मामंजींना आठवत होता तुम्ही…असं जाणवलं मला…

सेजलताई – खरं तर…ते गाणं म्हणजेच माझा श्वास आहे…त्यांना खूप आवडायचं ते गाणं…त्या दिवशी तू दुसरया लग्नाबद्दल विचारलंस मला…खरंच मी नाही विचार करू शकत दुसऱ्या लग्नाचा…फक्त सोबत असावी म्हणून दुसरं लग्न करायचं का…त्यांच्या आठवणीतच मी जगलीय…अगदी आजन्म मी आठवणीत जगायला तयार आहे..

या वयातही काही जणी जोडीदार शोधतात…आपल्या सासूबाईंना अजूनही जुण्या आठवणीत राहिलेलं पाहून…सासूबाईंच्या प्रेमाचं कौतुक वाटलं…दुसऱ्या कुणाचा विचारही त्यांना स्पर्शून गेला नाही याच गोष्टीच देविकाला फार नवल वाटलं.आपला जोडीदार नसताना त्याच्या फक्त आठवणींवर जगणं खूप मोठं आव्हान असत.

          

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories