Ritbhatmarathi

Search
Close this search box.

पांढरे केस होयला सुरुवात झाली असेल तर वेळीच सावध व्हा आणि हे घरगुती उपाय नक्की करा.

how to turn grey hair into black permanently naturally: केस हा स्त्री आणि पुरुषांच्या सौंदर्याचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच तर म्हणतात ना स्त्रीचे सौंदर्य हे तिच्या केसात असते. पण आता हे केवळ स्त्रीयांच्या सौंदर्यापुरते मर्यादित नसून पुरुषांच्या सौंदर्याशी ही निगडित आहे. स्त्रिया जितक्या त्यांच्या सौंदर्याविषयी जागरूक असतात तितकेच पुरुष सुधा. कारण सौंदर्य ही गोष्टच तशी आहे.

सुंदर दिसायला कोणाला नाही आवडणार ?? काळे, घनदाट आणि लांब केसांमुळे खुलून दिसणारे सौंदर्य खूप लोभसवाणे असते. असे सौंदर्य आपल्याला लाभावे अशी प्रत्येकाची सुप्त इच्छा असते. पण आजकाल अगदी तरुण वयातच केस, गळती, अकाली केस पांढरे होणे अशा समस्या उद्भवत आहेत. पांढरे केस असल्याने सौंदर्य तर कमी होतेच होते शिवाय पांढऱ्या केसांमुळे केस गळण्याचे आणि खाजण्याचे प्रमाण पण वाढते. एकंदरीत केसांच्या सगळ्या समस्या सुरू होतात. त्यामुळे वेळीच या समस्यांवर उपाय करणे हिताचे ठरते.

  • आपल्या शरीरातील मेलेनिन पिग्मेंटेशनची कमतरता.
  • वाढते धूळ, प्रदूषण.
  • ताण, तणाव.
  • अनुवंशिक आजार तसेच खाण्यापिण्याच्या सवईत बदल आणि बदलती जीवनशैली.

जुनं ते सोनं ही म्हण तर सगळ्यांनीच ऐकली असेल. त्यामुळे आजकालच्या महागड्या तेलांचा आणि शाम्पू, कंडीशनरचा वापर करूनही केस गळणे, पांढरे होणे, कोंडा असणे या तक्रारी सुरूच असतात. त्यामुळे शंभर टक्के नैसर्गिक अशा वस्तूंचा उपयोग करूनच आपल्याला केसांच्या समस्या सोडवता येतील. या वस्तू आपल्या घरात अगदी रोजच्या वापरात असतात पण त्याकडे आपण लक्ष देत नाही त्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. चला बघुया घरातील वस्तू वापरून केस कसे काळे बनवायचे :

रोज एक चमचा त्रिफला चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याबरोबर घ्या. त्रिफळा चुर्णला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. यातील घटक केसांच्या सगळ्या समस्या सोडवण्यात मदत करते. हे त्रिफळा चुर्ण नियमित घेतल्यास केस पांढरे होण्याची समस्या सुटेल आणि केस गळती थांबेल.

प्रत्येकाच्या घरात चहा पावडर उपलब्ध असतेच असते. आपल्याला ऐकून कदाचित नवल वाटेल पण पांढरे केस काळे करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. यासाठी चहा पावडर चांगल्या प्रकारे उकळवून घ्या आणि हे पाणी गाळणीने गाळून या पाण्याने केस धुवा. हळू हळू त्यामुळे केस काळे तसेच चमकदार दिसू लागतील.

खोबरेल तेलात लिंबाचा रस १-२ चमचे आणि कांद्याचा रस १-२ चमचे घाला. हे मिश्रण एकत्रित करून केसांना पाच मिनीटे मसाज करा. साधारण अर्ध्या तासाने केस धुवा.हा उपाय आठवड्यातून २-३ वेळा नियमित केल्याने केस पांढरे होणार नाहीत आणि केस गळती थांबेल. शिवाय लिंबू वापरल्याने त्यातील सल्फर केसांना चमक देईल.

आवळा आंबट असून बहुगुणी असतो. त्यात क जीवनसत्व असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. आवळ्याचे छोटे छोटे तुकडे करुन तेलात उकळवा. तेलात लिंबाचा रस मिसळा आणि आवळ्याचा रंग काळा झाल्यानंतर या तेलाने केसांना मालिश करा. यामुळेही केसांना खूप फायदा होईल.

शिवाय आवळा पावडर एक दोन चमचे आणि कॉफी पावडर एक चमचा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी केस धुवून झाल्यावर हे पाणी सगळ्यात शेवटी डोक्यावर ओतून घ्या. यामुळे केसांना रंग चांगला चढेल शिवाय केस चमकदार होतील.

डेड स्किन घालवण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा

सौभाग्याचं लेणं…’ टिकली ‘…लावा पण जरा जपून…

हिवाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्याल

पेरू जसा खाण्याचे फायदे आहेत तसेच पेरूची पाने पण उपयोगी आहेत. यांचा वापर पांढरे केस काळे करण्यासाठी होतो. पेरुच्या पानात व्हिटॉमिन बी, सी असते. त्यामुळे केसगळती रोखण्यास आणि केस पुन्हा उगवण्यास मदत होते. यासाठी पेरूची पाने वाटून पेस्ट तयार करा आणि ती केसांना लावा. पंधरा ते वीस मिनिटे ठेवून केस धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून एकदा केला तरी चालेल.

कोरफड या वनस्पतीत अनेक गुण आहेत. आयुर्वेदात कोरफडीचा अनेक उपयोग सांगितले आहेत. त्यामुळे ही बहुगुणी कोरफड त्वचेप्रमाणेच केसांसाठी पण उपयुक्त आहे. केस काळे करण्यासाठी किंवा केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी केस धुण्यापूर्वी केसांना कोरफड जेल लावा आणि मसाज करा. त्यानंतर पाच मिनिटात केस धुवा. यामुळे केस काळे आणि दाट होतील.

कडीपत्ता जसा आहारात महत्त्वाचा असतो तसेच त्याचे इतरही आरोग्यदायी फायदे आहेत. कडीपत्ता केसातील कोंडा कमी करतो, केसातील खाज कमी करतो. याशिवाय केसांच्या मुळाशी असलेला कोरडेपणा घालवतो. पर्यायाने केसांचे आरोग्य उत्तम ठेवतो. त्यामुळे आहारात तर कडीपत्ता वापरलाच पाहिजे याशिवाय केस पांढरे झाले असतील तर खोबरेल तेलात कडीपत्ता घालून रोज त्या तेलाने केसांना मसाज करा. रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवा. पण हे नियमित म्हणजेच आठवड्यातून दोन तीन वेळा करायला हवे. परिणाम लवकर दिसून येईल.

दही शरीरातील उष्णता कमी करते. दह्यात असलेले सायट्रिक असिड केसांसाठी फायदेशीर ठरते. यासाठी अर्धा कप दह्यात चिमुटभर काळी मिर्च आणि चमचाभर लिंबूचा रस मिसळून केसांवर लावावे. त्यामुळे केस चमकतील आणि लांब होतील.

तूप हे किती फायदेशीर आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही त्यामुळेच जुने लोक आहारात रोजच तुपाचा समावेश करत असत. केसांसाठी पण ते तितकेच फायदेशीर आहे. त्यासाठी दररोज साजुक तुपाने डोक्याची मालिश करा. म्हणजे पांढरे केस काळे होण्यास मदत होते.

आहारात तीळाचे प्रमाण असू द्यावे. तसेच तिळाचे तेल केसांवर लावावे. त्यामुळे केस वाढतात आणि पांढरे होत नाहीत.

पपई चवीला उत्तम लागते. पपई हे रसदार फळ असल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते आणि शरीराला थंडावा देते. केसांसाठी कच्च्या पपईची पेस्ट डोक्याला दहा मिनिटांपर्यंत लावून ठेवल्याने केस गळत नाहीत आणि कोंडाही होत नाही.

याशिवाय आहारात गाजर, काकडी आणि लिंबू पाणी यांचा आवर्जून वापर करावा.

ताण तणाव हे ही केस गळतीचे कारण असल्याने रोज ध्यान धारणा करून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा.

या उपायांनी केस पांढरे असण्याची सोबतच केस गळती आणि कोंडा यावरही नक्कीच फायदा होईल.

==========================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *