Ritbhatmarathi

Search
Close this search box.

आधार कार्डला आपला मोबाईल नंबर कसा लिंक करावा? | how to link aadhar to mobile number

             link aadhar to mobile number: आधार कार्ड म्हणजे एक असे कागदपत्र जे तुम्ही भारतीय असल्याचे ओळखपत्र म्हणून दाखवू शकतात जे सिद्ध करतात कि तुम्ही एक भारतीय नागरिक आहात २००९ मध्ये भारत सरकारने एक विशेष आणि महत्वाची ओळख म्हणून आधार कार्ड लागू केले आहे. नागरिकांना आधार कार्ड मिळवण्यासाठी हाताच्या फिंगरप्रिंट, डोळ्यांच्या प्रिंट्स यासारख्या बायोमेट्रिक तपशिलांव्यतिरिक्त पत्ता,मतदार ओळखपत्र यासारखे प्रमुख दस्तावेज सादर करावे लागतात. यानंतर त्या नागरिकाला एक १२ आकडी क्रमांक  UIDAI एजन्सी देते हाच क्रमांक हा त्या व्यक्तीचा ओळख क्रमांक समजला जातो.  आपल्या भारतात आधार कार्ड हे प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वात महत्वाचे आणि आवश्यक असे कागदपत्र बनले आहे त्यामुळे अगदी लहान मुलांपासून आधार कार्ड गरजेचं झालेलं आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच सरकारी आणि खासगी कामांसाठी आधार कार्डची आवशक्यता भासू लागली आहे. नेहमीच ओळखपत्र म्हणून आधारकार्ड ची गरज असल्याने त्या ओळखपत्राला आपला मोबाईल नंबर लिंक असणं अनिवार्य ठरलेलं आहे. 

              आधार कार्ड हे सर्व ठिकाणी एक ओळखपत्र म्हणून वापरले जाते जसे कि आपण एके ठिकाणी मुलाखतीसाठी गेलो आहोत आपलं वय व्हेरिफाय करण्यासाठी आधार कार्ड चा वापर केला जातो त्याचप्रमाणे आपला पत्ता म्हणजेच एड्रेस प्रूफ म्हणूनही आधार कार्ड चा वापर केला जातो.

                               आपला मोबाईल नंबर आधारकार्डशी लिंक नसेल तर अनेक कामे रखडू शकतात आधार कार्ड मोबाईलला लिंक करणं गरजेचं झालेलं आहे खालील पद्धतीने आधार कार्ड मोबाईलला लिंक करावा आपला मोबाईल नंबर आधाराला लिंक करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कागदपत्रे सबमीट करावी लागत नाही  –

१.https://www.uidai.gov.in/ या वेबसाईट वर जावं त्यानंतर “My Aadhaar” टॅब वरती जाऊन “Locate and Enrollment Center “वर क्लिक करा

link aadhar to mobile number
link aadhar to mobile number

२. त्यांनतर एक पेज ओपन होईल त्या पेजवर कार्डधारक म्हणजे ज्याचे आधार कार्ड बनवायचे आहे त्या कार्डधारकाच राज्य, पिनकोड किंवा पत्ता टाकून तिथल्याच जवळच्या नोंदणी केंद्राचा पत्ता मिळवू शकता.

३. त्यानंतर कार्डधारक नोंदणी केंद्रात जाऊन दुरुस्ती फॉर्म भरावा लागतो याचे कारण असे कि जो मोबाईल नंबर ऍक्टिव्ह म्हणजे चालू आहे तोच या फॉर्म मध्ये टाकावा लागतो तरच आधार योग्य नंबरला लिंक करता येते.

४. यानंतर आपला फॉर्म योग्य ती माहिती भरून आधार नोंदणी कार्यालयात सबमिट करायचा आहे यासाठी कार्डधारकाला बायोमेट्रिक चाचणी करावी लागते म्हणजेच फिंगरप्रिंट्स आणि डोळ्याच्या प्रिंट्स

५. कार्डधारकाला यानंतर एक स्लिप देण्यात येते ज्यात अपडेट रिक्वेस्ट नंबर ज्याला URN असे म्हणतात हा नंबर समाविष्ट केला जातो

६. कार्डधारक याच नंबर ने आपापल्या आधार अपडेशन चे स्टेटस सहज ट्रॅक करू शकतो

७. नवीन मोबाईल नंबर जयावेळी आपल्या आधार कार्ड ला लिंक होईल त्यावेळी एक वन टाइम पासवर्ड म्हणजेच OTP आपल्या मोबाईल नंबर वर येईल

८. जर आपल्याला आधार कार्ड  हवे असल्यास आपण ते वेबसाईट वरती जाऊन सहज डाउनलोड  करू शकतो.

आधार कार्डसाठी कसं अप्लाय करावं?

जन्मनोंदणीसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

  • शाळेंपासून ते बँकांपर्यंत अशा  ठिकाणी आधार कार्डचा उपयोग होतो त्यामुळे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे
  • मोबाइल नंबर लिंक असल्याने अनेक कामे ऑनलाईन कारण शक्य होतात
  • २००९ पासून आधार कार्ड हि जनसामान्यांची एक ओळख बनले गेले आहे त्याचप्रमाणे अनेक सेवा पुरवठाधारकांकडूनही आधार कार्ड हे मान्यताप्राप्त असं दस्तावेज झालं आहे
  • आधार गरीब नागरिकांना त्यांची ओळख सहजपणे निर्माण करण्यासाठी मदत करु शकतो
  • आपली जन्मतारीख यावरून आपल्या वयाचं अनुमान सहज लावता येतं त्याचप्रमाणे  पत्त्या वरून आपण  भारतातील रहिवाशी असल्याचं दाखला दिला जातो
  • बायोमेट्रिक्स असल्यामुळे आपली माहिती सुरक्षित राहते बायोमेट्रिक अहवालामुळे कुणीही आपल्या आधार संदर्भातील माहिती गहाळ करू शकत नाही

         अशा पद्धतीने आधारकार्ड आपल्या मोबाईल नंबर ला लिंक असणं गरजेचं आहे.      

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *