Ritbhatmarathi

Search
Close this search box.

शकुंतलाबाई संध्याकाळी टी.व्ही. पुढे बसल्या होत्या. घडल्यात ७ वाजले होते. मंजुश्री म्हणजे शकुंतलाबाईंची सून यायची वेळ झाली होती. शकुंतलाबाई नेहमीप्रमाणे डैलीसोप बघत बसल्या होत्या. शेजारी नात खेळात बसली होती.

मंजुश्री आली. आज तिचा मस्तपैकी पावभाजी बनवायचा बेत होता. आल्या आल्या मंजुश्री फ्रेश झाली आणि तिने भाज्या उकडायला ठेवल्या. भाज्या उकडत होत्या तोवर मंजुश्रीही हॉल मध्ये कांदा आणि टोमॅटो कापायला घेऊन आली. तेवढ्यात शकुंतलाबाई मंजुश्रीला खोचकपणे विचारतात ,

“आज रात्रीच्या जेवणात काय बनवतेस.”

मंजुश्री – “आई आज पाव भाजीचा बेत आहे. मी ऑफिस मधून येतानाच पाव घेऊन आली आहे. “

शकुंतलाबाई अजून खोचकपणे ,

“काय? पाव भाजी!!!! पाव भाजी शिवाय दुसरं काही सापडलं नाही का तुला बनवायला”

“आणि काय गं , घरात मोठ्यांना काही विचारायची पद्धत आहे कि नाही.”

मंजुश्री – “पण आई तुम्हाला पण तर आवडते पाव भाजी आणि मी रोज आधी तुम्हाला विचारायची कि काय खाणार म्हणून तर तुम्ही ‘बनव काहीही’ म्हणायच्या म्हणून मी विचारायचं बंद केलं.”

“काही हरकत नाही. तुम्हाला पालक आवडते ना तर पालक बनवते मी तुमच्यासाठी….नाहीतर पाव भाजी राहू देत आज…आज पालकाची भाजीच बनवते.”

“मी म्हटलं कि पाव भाजी घरात सगळे आवडीने खातात आणि रिंकूलाही फार आवडते कि पाव भाजी.”

यावर शकुंतलाबाई रागाने म्हणाल्या, “पण तरीही तुला मला विचारायला काय अडचण आहे का? माझं काही अस्तित्वच नाही या घरात…सगळे निर्णय तुम्ही तुमचे घायचे आम्ही काय घरात फक्त नाममात्र आहोत काय ?”

“बरं आज राहू दे पाव भाजीच, पण उद्यापासून मला विचारूनच बेत आखत जा.”

खरं तर शकुंतलाबाईंनाही पाव भाजी आवडते पण अडचण फक्त इथे होती कि मंजुश्रीने त्यांना विचारून बेत आखला नाही.

मंजुश्रीने मुकाट्याने कसातरी सगळा स्वयंपाक केला कारण तिचा टोटल मूड ऑफ झाला होता. बिचारीने २ पाव जास्त खाल्ले असते तर तेही तिला गेले नाही. मंजुश्रीचा नवरा संजय आज उशिराच आला होता ऑफिसमधून….मंजुश्रीने पटापट पाव भाजी गरम केली आणि संजयला ताट वाढलं. शकुंतलाबाई मस्त पाव भाजीवर ताव मारून कधीच झोपायला गेल्या होत्या.

मंजुश्रीच्या कपाळावरच्या आठ्या पाहून संजयला संशय आला कि आज त्याच्यामागे काहीतरी गडबड नक्कीच झाली आहे.

संजय मंजुश्रीला – “वाह्ह! आज बऱ्याच दिवसातून पाव भाजी खायला मिळाली आणि तीही तुझ्या हातची.”

मंजुश्री काहीही बोलली नाही .

“काय गं काही बिनसलं का आज?”

मंजुश्रीने झालेला प्रकार संजयला सांगितला. संजयने तिचं व्यवस्थित ऐकून घेतलं आणि लागलीच शक्कल लढवली.

संजय – “हे बघ मंजुश्री माझ्याकडे ह्या प्रॉब्लेमच उपाय आहे. आजकाल आयुष्य एवढं बिझी असल्याने तसेही वेळेचं नियोजन आणि प्लँनिंग फार महत्वाची आहे.”

“आपण व्यवस्थित प्लॅन करून पैसे कुठे गुंतवायचे हे ठरवतो…किंवा घरात कुठलीही गोष्ट घ्यायची म्हटलं कि आधी सगळे मिळून चर्चा करतो…थोडक्यात कुठलीही गोष्ट करताना पूर्व प्लँनिंग शिवाय करत नाही मग जिथे अन्नपूर्णा नांदते त्या किचन मध्ये आपण प्लँनिंग का नाही करत?”

मंजुश्रीला संजय काय म्हणतोय काहीच काळात नव्हतं.

संजयने आत जाऊन मेनू चार्ट आणला.

“हे बघ मंजुश्री, हा आहे मेनू चार्ट….ह्यावर आपण दर रविवारी १ तास तरी सगळे एकत्र बसायचं आणि हा चार्ट भरायचा….सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतचा आठ्वड्यापर्यंतचा मेनू ह्यात लिहून ठेवायचा.”

“आणि ह्याचे फायदे असे कि नेहमी काय बनवायचं असा पडणारा प्रश्न कायमचा निघून जैन….दुसरं म्हणजे सगळ्यांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन मेनू आखलेला असेल त्यामुळे कुणालाही विचारायची गरज नाही कि मेनू डिसायडेड असल्यामुळे वेळेचीही बचत होईल.”

मंजुश्रीलाही संजयची आयडिया पटली आणि ती खुश झाली.

संजय पाव भाजी भरवत मंजुश्रीला म्हणाला…

“काय मग कशी वाटली आयडिया!! हे घे पाव भाजी….मला माहित आहे तुला खूप आवडते नाही आज तुझा नेमकी मूड ऑफ झाल्याने तू खाल्ली नसणार .”

दुसऱ्या दिवशीच दोघांनी शकुंतलाबाईंना सांगितलं आणि त्यांनाही पटलं….तेव्हापासून मंजुश्रीच्या घरात खाण्यावरून कधीच वाद होत नाही…..

आपल्या समोर असेच खूप प्रॉब्लेम्स असतात पण जे प्रॉब्लेम्स सहजरित्या चर्चा करून सोडू शकतात त्यांना आपण तोंडं फुगवून उगाच खेचत बसतो ..ह्याला काहीच अर्थ नाही..

=======================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories