Ritbhatmarathi

Search
Close this search box.

हिजाब आणि मग किताब असा संभ्रम का? जाणून घ्या नक्की काय आहे हा हिजाब वाद

hijab controversy in marathi: विविधतेत एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे.कारण आपल्या देशात सर्व जातीचे आणि धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.आपल्या जातीचा,धर्माचा आणि परंपरेचा अभिमान सर्वानाच असतो आणि असायलाच हवा.पण हेच जाती धर्माचे मुद्दे समाजात वादाचे कारण बनत असतील तर मात्र आपण धर्माच्या नावाखाली काही चुकीचे तर करत नाही ना ? याचा विचार प्रत्येकाने करायलाच हवा.

धर्म आणि परंपरेच्या नावाखाली सध्या सुरू असलेला वादाचा विषय म्हणजे हिजाब वाद. दक्षिण राज्यातील कर्नाटकातील सरकारमान्य पियु कॉलेज मध्ये सहा मुली हिजाब घालून कॉलेज मध्ये आल्या म्हणून त्यांना वर्गात प्रवेश नाकारण्यात आला आणि वादाला सुरुवात झाली तो दिवस होता ३१ जानेवारी २०२१. पुढे हा वाद इतका चिघळला की या वादाने हिंसेचे स्वरूप धारण केले.

यावर तोडगा काढण्यासाठी कॉलेज प्रशासनाने हिजाब घातलेल्या सहा मुली,त्यांचे पालक आणि कॉलेज मधील अधिकाऱ्यांसमवेत एक मीटिंग घेतली.पण दुर्दैवाने ही मीटिंग अयशस्वी ठरली.चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही.नंतर २६ जानेवारी २०२२ मध्ये पुन्हा मीटिंग घेण्यात आली,त्यावेळी उडपी कॉलेजचे विधायक रघुपती भट म्हणाले जे विद्यार्थी हिजाबशिवय येऊ शकत नाहीत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यावे.त्यावर विद्यार्थ्यांनी नकार दिला.हा वाद काही मिटायला तयार नव्हता.

वॉरेन बफे म्हणतात की यशाचे सर्वात मोठे माप म्हणजे तुमचा बँक बॅलन्स नाही, तो म्हणजे….

जाणून घ्या हरिद्वारमध्ये गंगा स्नानास अनन्य साधारण महत्व का आहे?

हा वाद इतका चिघळला की उडपीच्या कुंडापुर भागात जाऊन पोहचला.या सर्व प्रकाराला उत्तर म्हणून हिंदू धर्मातील विद्यार्थी भगवा गमजा (लुंगी) घालून कॉलेज मध्ये आले ती तारीख होती २ फेब्रुवारी २०२२.त्याच्या दुसऱ्या दिवशी कुंडापुर मधील सरकारी कॉलेज मध्ये हिजाब घालून आलेल्या मुलींना वर्गात जाण्यापासून थांबवण्यात आले.नंतर ५ फेब्रुवारी २०२२ या आंदोलनाच्या समर्थांनासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले,बुरख्याला शैक्षणिक मार्गात आणून भारतातील मुलींचे भविष्य हिसकावून घेतले जात आहे.

या वादाचे पडसात बरेच दिवस पडत होते,ते इतके पडले की कर्नाटकातील बऱ्याच ठिकाणी खूप भांडणे झाली,काही ठिकाणी दगडफेक झाली तर एक व्हिडिओ आला ज्यात एका कॉलेज मधील विद्यार्थी तिरंग्याच्या पुलावर भगवा झेंडा लावताना दिसत होता तर कर्नाटकातील मांडा या भागात हिजाब घातलेल्या एका विद्यार्थिनी समोर गमजा घालून विद्यार्थ्यांनी “जय श्री राम” ची नारेबाजी केली.
कर्नाटक मध्ये घडलेला हा काही पहिला वाद नव्हे.

२००९ मध्ये बंत्वल येथील svs कॉलेज मध्ये ही घटना घडली होती,२०१६ मध्ये अशीच घटना बेलूर येथील डॉ.शिवराम करांत सरकारी कॉलेज मध्ये आणि श्रीनिवास कॉलेज मध्ये घडली तर २०१८ मध्ये सेंट इगनेस या कॉलेजमध्ये घडली.या घटनेचे पडसाद राजकीय नेत्यांपर्यंत जाऊन पोहचले, कर्नाटक गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी काँग्रेस पक्ष या वादात काँग्रेस नेता आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे असे आरोप केले, ते पुढे म्हणाले जर त्यांनी सतत असे केले तर कर्नाटक मधील लोक त्यांना उचलून अरबी समुद्रात फेकून देत.तर राजस्व मंत्री म्हणाले हिजाब किंवा भगवा गमजा घालून वर्गात येण्याची परवानगी कोणालाही मिळणार नाही.

खरतर पाच फेब्रुवारी मध्ये राज्य सरकारने कर्नाटक शिक्षण कायद्यानुसार जो १९८३ मध्ये १३३(२) अंतर्गत लागू करण्यात आला होता,त्यात असे स्पष्टपने नमूद करण्यात आले आहे की सगळ्या सरकारी तसेच खाजगी शाळांमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी ठरवलेल्या ड्रेस कोड मध्येच येणे आवश्यक आहे,तसेच जर कोणाचा शाळेचा किंवा कॉलेजचं ड्रेस कोड नसेल तर विद्यार्थी असे कपडे घालून येऊ शकत नाहीत ज्यामुळे समानता,शांतता आणि सामाजिक व्यवस्थेला धोका असेल.

पाकिस्तान सारख्या देशात मुलींनी “मेरा जिस्म मेरी मर्जी” असे म्हणत आंदोलने केली आणि बुरखा झुगारून लावला,धर्माच्या आधारावर देश वेगळा घेतला आणि आपल्या भारत देशात जिथे सावित्रीबाई फुले,आनंदी गोपाळ, फातेमा शेख यांनी धर्माच्या बेड्या झुगारून सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली,तिथेच धर्माच्या नावाखाली मुली पुढे होऊन वाद घालतात यासारखी दुसरी शोकांतिका नाही.आपल्या भारत देशातील मुली धर्माच्या नावाखाली बुरख्यासाठी वाद घालत आहेत ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे.ज्यांनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी आयुष्य पणाला लावले,ज्या देशाने शिक्षणाचा अधिकार दिला तिथेच पहिला धर्म आणि मग शिक्षण असे सूनवताय?? ज्या कारणासाठी तुम्ही कॉलेज किंवा शाळेत जाता तेच शिकण्याचा मुख्य हेतू तुमच्या डोळ्यांसमोर असायला हवा ना ??

जर तुम्हाला धर्म पालयचाच असेल तर मग तो पूर्णपणे पाळा.मग तुमच्यावर कोणत्याही गैर किंवा परक्या माणसाची नजर पडता कामा नये,बोलताना इतक्या कमी आवाजात बोला की तुमचा आवाज परपुरूषाच्या कानांवर पडणार नाही,फक्त बुरख्याचाच अट्टाहास कशासाठी ??

धर्मावर जातीवर प्रेम कराच पण त्या सगळ्या गोष्टी सामाजिक पातळीवर नेऊन ठेवू नका.धर्म तुमच्या घरात ठेवा आणि देशप्रेम मनात असूद्या.

==============

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *