Ritbhatmarathi

Search
Close this search box.

सध्या “फास्ट फॉरवर्ड” चा जमाना आहे असं म्हटलं तर काहीच हरकत नाही. आज लोकांची लाईफ इतकी फास्ट झाली आहे कि कुणालाही कुणासाठी हवा तसा वेळ देता येत नाही. सोमवार ते शुक्रवार नवरा बायको दोघेहि जॉब करत असतील तर फक्त रात्री जेवायला आणि झोपायला घरी येतात. जेवताना देखील दोघेही मोबाईल न्याहाळल्याशिवाय राहत नाही. झालं तर मग!!!! सोमवार आला कि ह्या धकाधकीच्या जीवनात शुक्रवार कधी उजळतो हे कळण्याच्या पलीकडे असतं.

संध्या आणि श्रवण ह्यांच्या बाबतीत देखील हेच झालं होतं. दोघांनाही भल्या पगाराची नोकरी होती तर खरं! पैश्यांची बक्कळ कमाई होती. खूप कमी वयात दोघांनी बंगलोर सारख्या शहरात स्वतःचं घर घेतलं होतं, पण दोघेही नोकरीमध्ये इतके व्यस्त होते कि दोघेही घरात कमी आणि बाहेर जास्त राहतं. सोमवार ते शुक्रवार दोघांनी एकमेकांची तोंडं जरी बघितलं तरी खूप झालं. स्वयंपाकाला देखील दोन्ही टाईम बाई लावलेली होती.

म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर राहण्यासाठी स्वतःचं घर होतं पण त्या घराचा उपभोग घेण्यासाठी संध्या श्रवण कडे वेळ नव्हता !!
स्वयंपाकासाठी वेळ नसल्याने बाई लावली आणि तिने तो स्वयंपाक कसाही बनवला तरी नाक मुरडून खाण्याशिवाय दुसरा पर्याय त्याच्याकडे नव्हता. का तर स्वयंपाक बनवायला संध्या श्रवण कडे वेळ नव्हता !!
एवढाच काय तर ते बनवलेलं जेवण निवांत एकत्र बसून करायलाही संध्या श्रवण कडे वेळ नव्हता !!

एक दिवस शनिवारी सकाळी संध्या ने चहा बनवला आणि ती बाल्कनी मध्ये घेऊन गेली. श्रवण ला तिने आवाज दिला.

“श्रवण चहा झालायं, लवकर ये बाल्कनी मध्ये !! बघ ना आज किती छान वातावरण आहे.”

आज बाहेर पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. सगळीकडे अफाट शांतता होती. पक्ष्यांचा मंद किवकिवाट चालू होता.

वाऱ्याची मंद झुळूक संध्याच्या चेहऱ्यावरून गेली. कपाळावरचे केस सावरत संध्या लहानपणीच्या आठवणींमध्ये गुंतली होती. लहानपणीचं ते हसणं बागडणं!! आई गृहिणी आणि बाबांची मोजकीच कमाई असूनसुद्धा छोटं आणि सुखी कुटुंब होतं. आई बाबानी तंगी कधीच जाणवू नाही दिली.
कुठलाही सणवार असो वा कुठले सोहळे खूप उत्सुकतेने साजरे केले जायचे. दिवाळी उन्हाळी सुट्टी लागली कि बस्स मामाच्या गावाला…. नाहीतर आजोळी जायची ओढ लागायची.सणावाराच्या दिवशी आई सकाळी लवकर उठून अंगणात सडा रांगोळी करायची. पहाटे पहाटे च कुकर ची शिट्टी वाजायची. आम्ही सर्व खुश होयचो कि आज नक्की पुरणपोळीचा बेत आहे घरात !! संक्राती दसऱ्याला चाळीतल्या सगळ्या मुली साडी घालून.. नटून थटून एकमेकींच्या घरी तिळगुळ सोनं द्यायला जायच्या. चाळीतल्या लोकांची एकमेकांबद्दल वेगळीच आपुलकी आणि ओढ असायची.

उन्हाळ्याच्या दिवसात चाळीतल्या बायका एकमेकांच्या घरी जाऊन पापड, कुरडया बनवायच्या आणि आम्ही सगळे पोरं पापडाच्या पिठाची एक एक लाटी उचलून फस्त करायचो. आणि हो पेप्सीचे ते रंगबिरंगे पाकिटं बाबा डझन भर आणून ठेवायचे फ्रिज मध्ये.. वाह्ह ! काय मज्जा असायची लहानपणी.. दिवस कसे सरायचे कळायचं नाही.

लहानपणीच्या आठवणींमध्ये संध्या फार रमून गेली होती आणि हलकेचं हास्य तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं होतं.

श्रवण – “संध्या ए संध्या!! “

श्रवण चा आवाज ऐकून संध्या एकदमच दचकली आणि आपल्या लहानपणीच्या रम्य आठवणीतून बाहेर आली.

श्रवण – “अगं काय झालं कधीचा आवाज देतोय…. लक्ष कुठे आहे तुझं!!!!, तुझा चहा पण थंड झाला बघ “

संध्या – “अरे काही नाही. अचानक लहापणीचे ते दिवस आठवले. किती मज्जा असायची ना रे!! कसलंच टेन्शन नाही, फिकीर नाही.. आणि आता बघ ना रे पैसे आहे.. घर आहे.. सगळं काही आहे.., पण आपल्याकडे ते उपभोगायला…. नाती जपायला….. वेळ नाही “

“आपला सगळं आयुष्य असंच जाणार का रे श्रवण ?”

श्रवण – “अजिबात नाही. “

“माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. “

संध्याच्या हातात ३ तिकिटे देत मोठ्या उत्साहाने श्रवण संध्या ला बोलत होता.

श्रवण – ” मी खूप दिवसांची तुझी हि घालमेल बघत होतो. “

“now it’s time to take break and get refreshed ourselves”

“संध्या पुढच्या महिन्यात निघायचं आहे आपल्याला….”

पॅकिंग आतापासूनच सुरु कर.

संध्या – “अरे श्रवण, wait….wait… तू काय बोलतोय मला काहीच कळत नाहीये.”  “Will you please ellaborate? “

“मला तिकिटे तर पुणे, मुंबई आणि
मालदीवची दिसतायेत…. काय प्लॅन आहे तुझा?”

श्रवण – “हे बघ प्लॅन अगदी सोपा आहे. ” बंगलोर वरून आपण थेट पुण्याला जायचं.. तुझ्या आई बाबांकडे तिथे २ आठवडे राहणार आहोत…. मग तिथून माझ्या मम्मी पप्पा कडे १ आठवडा आणि मुंबई वरून थेट मालदीवला जाणार आहोत आपण शेवटच्या १ आठवड्यासाठी…. “

“आणि हे बघ तुझ्या मॅनेजर ला आताच सांगून टाक कि पुढचा एक महिना तू ऑफिस मध्ये नाही येणार”

संध्या – “अरे पण ! श्रवण एवढ्या शॉर्ट नोटीस वर कसं शक्य आहे ?”

श्रवण – “अरे तुरे काही नाही ! सगळं शक्य आहे….बरं तुला आयुष्यभर असंच राहायचं आहे का?.. नाही ना ….मग चल आवर पटकन.. आज लंच बाहेरच करू या आणि मॉल मध्ये शॉपिंग !! मालदीव आणि घरच्यांसाठी नको का काही घ्यायला..

असं म्हणून श्रवण ने जबरदस्तीने संध्याला उठवलं आणि सरळ रूम मध्ये ढकललं तयार होण्यासाठी !!!!

===================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories