Ritbhatmarathi

Search
Close this search box.

आपल्या भारतीय संस्कृतीत साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ समजला जाणारा मुहुर्त म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा यालाच गुढीपाडवा असे म्हणतात. हा सन विविध प्रांतांत वेगवेगळया पद्धतीने साजरा केला जातो.या सणाला भारतीय संस्कृतींमध्ये खूप महत्त्व आहे. पुराणात गुढीपाडव्याच्या बऱ्याच आख्यायिका आहेत. उदा. ब्रह्मांड पुराणात ब्रह्मदेवाने याच दिवशी संपूर्ण ब्रह्माण्ड निर्माण केलं, द्वापर युगात, त्रेतायुग्,कृतयुगात याच शुभमुहुर्तावर वाईट गोष्टीवर सत्याचा विजय झालेला आहे. म्हणून हिंदू संस्कृतीत गुढीपाडवा या उत्सवला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ह्याच दिवसापासून नवरोत्सवाला सुरुवात होते त्यालाच चैत्र गौर असेही म्हणतात. 

त्रेतायुगात भगवान श्रीराम यांना चौदा वर्षे वनवास भोगावा लागला होता. हा वनवास भोगत असताना, रावनासार्ख्या मह दैत्यांचा वध केला आणि याच दिवशी भगवान श्रीराम अयोध्येत परत आले आणि श्रीरामाच्या आगमनप्रित्य्थ अयोध्यवासियानि दारोदारी गुढी उभारली आणि आपला आनंद व्यक्त केला. याच दिवशी भगवान श्रीरामानि वनवास भोगत असताना वानरराज बाली याचा वध करून किष्किंध वासियांना बालीच्या जाचातून मूक्त केले.या दोन्ही घटना म्हणजे वाईट गोष्टीवर सत्याचा विजय.म्हणून हिंदू संस्कृतीत गुढी उभारणे हे शुभ समजले जाते.गुढी हे विजयाचे  ,सकारत्मक्तेचे आणि समृद्धीचे प्रतिक आहे.

आपली दिन्दर्शिका आपण शके या नावाने लिहिलेली आपण पाहतो. असंच मी एक दिवस माझ्या आजीला विचारले,’’ आजी शके-शके असा दिन्दर्शिकेत् का ग लिहिला आहे?’’ यावर आजीने मला शालीवाहन राजची गोष्टं सांगितली. शालीवाहन राजा हा कुंभार काम करणाऱ्याच्या घरी वाढलेला असतो.मग शालीवाहन राजाने शक या दैत्यांचा संहार करण्यासाठी मातीचे सहा हजार पुतळे तयार केले आणि मग त्या पुतळ्यात प्राण अर्पण केले आणि त्यांना जीवंत केले आणि त्या पुतळ्यांच्या मदतीने शकाचा पराभव केला.याच शालीवाहन राजाच्या नावे नवीन काल गणना सुरु झाली.तिलाच शलिवहन् शक असा म्हणतात.

महभारतातही  गुढीपाडवा या उत्सवाच्या मुहुर्तावर एक आख्यायिका आहे.चेदि नावचा एक राजा होता तो वसू नवाच्या जंगलात गेला आणि कठोर तप केले.मग देव चेदी राजावर प्रसन्न झाले. राजावर प्रसन्न होऊन देवाने राजाला वैज्यन्ति माला,भ्रमन्ति साठी विमान आणि राज्यकारभारासाथि राजदंड दिला.या प्रसादने राजा आनंदित झाला आणि राजने दंडा वर जरिचे रेशमी वस्त्र ठेऊन आणि त्यावर चंबू ठेऊन राजाने दंडाचि पूजा केली.

ब्रह्मन्द्पुरानात तर ब्रह्मांड निर्मितिचे काम ब्रह्देवने याच शुभमुहूर्तावर केले.भगवान शंकर आणि पार्वती देवींच्या विवाहाचा मुहूर्तही चैत्र शुद्ध प्रतिपदेला काढला गेला होता आणि पुढे तृतीयेला शिव पार्वतीचे लग्न झाले. म्हणून चैत्र गौरीचे हळदीकुंकू घालण्याची पद्धत आहे. माहेर वाशिनिची ओटीभरण करण्याचीही  पद्धत आहे.

महाराष्ट्रामध्ये बांबूला केशरी वस्त्र किंवा साडी बांधून त्याला साखरेच्या गाठी, कडूलिंबाची पाने आणि आंब्याची पाने  बांधतांत. त्यावर तांब्या किंवा लोटा उपडा करून  उपडा ठेवायची पद्धत आहे. त्यावर हळदीकुंकू आणि अक्षता वाहतात आणि पाटावर उंच गुढी उभारतात. घरातल्या कर्त्या पुरुषांच्या हातून गुढी उभारली जाते. जुनी लोक सांगतात चपळ माणुस पाहून त्याच्या हातात गुढीची काठी दिली जाते.

गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळी किंवा मग श्रीखंड पुरी आणि आंब्याच्या रस ह्या नैवेद्याला महत्व असते. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी गुढी उतरवण्यात येते.

यंदाच्या वर्षी गुडीपाडवा दि. २ एप्रिल, २०२२ रोजी , मंगळवारी साजरा करण्यात येणार आहे. ह्या वर्षी देखील कोरोनाने थैमानच चालवला आहे. त्यामुळे कुठेही बाहेर न पडता घरच्या घरीच गुढी उभारून नववर्षाचं स्वागत करू या. पुढल्या वर्षी गुढीपाडवा दि. २२ मार्च, २०२३ रोजी आहे. आशा करू या की नववर्षाच्या सुरुवातीबरोबरच नको असलेला पाहुणा म्हणजेच कोरोनाही निघून जाईन.

===================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories