Ritbhatmarathi

Search
Close this search box.

ekvira aai information in marathi: आपल्या महाराष्ट्राला देवीच्या तीन शक्तीपिठामुळे एक वेगळाच लौकिक प्राप्त झाला आहे. जगभरात देवीची अनेक मंदिरे आहेत पण त्यातील मुख्य तीन शक्तीपीठे ही आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्यातील लोणावळा जवळील वेहेरगाव कार्ला गडावरील आई एकवीरा देवी महाराष्ट्राची आराध्य कुलदेवता, हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी जागृत देवता आहे. एकविरा आई ही रेणुका मातेचा अवतार म्हणून ओळखली जाते. ही रेणुका माता म्हणजेच परशुरामाची आई. परशुरामाने आपल्या पराक्रमाने सर्वत्र ख्याती मिळवली म्हणून एका वीर पुत्राची आई म्हणजेच एकविरा या नावाने ही रेणुका माता ओळखली जाते. असे म्हणतात की, भगवान शंकरानेच आईला एकविरा हे नाव दिले आहे.

पंडुराजाला पाच पुत्र होते. धर्मराज, भीम, अर्जुन, नकूल, सहदेव अशी त्यांची नावे. त्यांना पाच पांडव नावाने ओळखले जाते. ते वनवासाला निघाले होते. वनात भटकत असताना कार्ला परिसरात पोहोचले. त्यांच्या समोर प्रत्यक्ष देवी प्रकट झाली. ‘या ठिकाणी माझे मंदिर बांधा’ असा दृष्टांत दिला. पण, ‘एका रात्रीतच मंदिर बांधायला हवे’ अशी अटही घातली होती. तिचा स्वीकार करत पांडवांनी एका रात्रीत मंदिर बांधले. देवी प्रसन्न झाली. वनवासानंतर पांडवांना एक वर्ष अज्ञातवासात राहायचे होते. या काळात ‘पांडवांना कोणीही ओळखू शकणार नाही,’ असा एक वर देवीने पांडवांना दिला. एकवीरा देवी ही माहूरच्या रेणुका मातेचा अवतार आहे, असेही म्हटले जाते. विद्येची देवता गणपतीची आई माता पार्वती, देवी यमाई आणि रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकवीरा देवी, अशीही आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे तिला वेहेरगावची यमाई, अंबामाता किंवा परशुराममाता रेणुका असेही म्हटले जाते.

मंबई-पुणे महामार्गावर (११० कि.मी.) लोणावल्याजवळ मळवली रेल्वे स्थानकापासून उत्तरेस पाच कि.मी. अंतरावर वाकसईजवळ कार्ला फाट्यावरून ३ कि.मी. अंतरावर कार्ला गड आहे. कार्ला फाट्यावर भव्य व रेखीव प्रवेशव्दार आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये हे स्थान समुद्रसपाटीपासून ४०० फूट उंचीवर आहे. त्यामुळे येथील वातावरण नेहमीच थंड असते. एकविरा आईचे मंदीर दररोज पहाटे ५ ला उघडले जाते मंदीरात गुलाबजल, अत्तर, गोमूत्र शिंपडून स्वच्छ पवित्र वातावरण निर्माण केले जाते. तांदळा दगडात कोरलेली शेंदूर चर्चित आई एकविरेची मूर्ती स्वयंभू आहे. मुळ मुर्तीची पहाटे ५.३०ला काकड आरती केली जाते, आणि ६ वाजून ३० मिनीटांनी अभिषेकाला सुरुवात होते. मंदिराचा गाभारा खूप छोटा आहे. या देवीचे डोळे मिन्यापासून बनवले आहेत. ही देवी जलदेवता म्हणून प्रसिद्ध आहे.

जाणून घ्या त्र्यंबकेश्वरला गंगा नदीचा उगम कसा झाला?

खंडेरायाची दंतकथा

जाणून घ्या सप्तशृंगी मातेच्या मुखात पानाचा विडा का ठेवला जातो

एकविरा देवीच्या डाव्या हाताला देवीची ननंद म्हणजेच जोगेश्वरी देवीची मूर्ती आहे. कोळी, आगरी, कुणबी, सोनार, कायस्थ, पाठारे प्रभु, चौकाळशी, पाचकळशी, क्षत्रिय, वैश्य या समाजाची एकविरा देवी कुलस्वामिनी आहे. दिवसेंदिवस देवीच्या भक्तांमध्ये वाढ होतच असल्याने वर्षभर भाविकांची गर्दी असते. शिवाय मंदिरा भोवतालचा परिसर खूपच निसर्गरम्य असल्याने मन प्रसन्न झाल्याशिवाय रहात नाही. या मंदिरा शेजारी प्राचीन बौध्द इतिहासप्रसिध्द कार्ला लेणी“ आहेत. येथील शिल्प चैत्यगृह, बौध्दशिल्पे, सिंहस्तंभादी शिल्पे, मुख्य गुंफा, सभा मंडप, उत्तुंग सिंहस्तंभ, स्तंभावरील शिल्पे, काष्ठकाम, भित्तीचित्रे, शिलालेखांसाठी या लेणी जगप्रसिध्द आहेत.

इ. स. १८६६ मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. या मंदिराचे बांधकाम दगड कोरून बांधण्यात आली आहे. चौकोन प्रवेशद्वार, दोन्ही बाजूला दिवे ठेवण्यासाठी ३ फुटी स्तंभ, प्रवेशद्वाराजवळ दोन नक्षीची वर्तुळे, मधोमध गणपतीचे वर्तुळ आहे. मंदिराच्या मध्यभागी गणपतीची मूर्ती आहे.

अशा या नवसाला पावणाऱ्या आणि निसर्गाने नटलेल्या या रेणुका मातेचे म्हणजेच एकविरा आईचे दर्शनाचा नक्की लाभ घ्या.

=====================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *