Ritbhatmarathi

Search
Close this search box.

कोरोना म्हटलं कि आठवतो तो गतवर्षी मार्चपासून  २-३ महिन्यांचा तो लॉकडाऊन.  लॉकडाऊन मध्ये  जरी खूप जणांचं आर्थिक नुकसान झालं पण तशीच घरातील गृहिणीपासून पुरुषमंडळींपर्यंत सगळ्यांना शिस्तही लागली.  पूर्वी आपले वाड वडील बाहेरून आल्यावर प्रथम हाथ पाय स्वच्छ धुवुन तोंड धुवायची पण आता कोरोनामुळे स्वच्छ अंघोळच करावी लागते म्हणजेच स्वच्छतेची सवय लागली.

पिझ्झा, बर्गर, पाणीपुरी खाणारी आपली मुलं भाजी पोळी खायला लागली. जेवणाआधी हाथ धुवायला टाळाटाळ करणारी आपली पोरं हाथ धुवायला शिकली. अवास्तव फिरणाऱ्या टोळक्यांवर कोरोनामुळे आळा बसला. कुटुंबामध्ये एकाकीपणा वाढला. घराची साफ सफाई आलीच कि घरात गृहिणींनी स्वछता करणं जितकं महत्वाचं असायचं तितकचं घरातल्या प्रत्येकाने स्वछ्तेत गृहिणीच्या मदतीला येण्याचं प्रमाण वाढलं. तू दिवसभर करतेस काय विचारणाऱ्या  पतीदेवास  लॉकडाऊनमध्ये घरूनच काम असल्याने पत्नी दिवसभरात आपली जबाबदारी कशी चोखपणे पार पडते ह्याची जाणीव झाली.

कुणी कुणाचं नसतं! हे कोरोनाने सिद्ध केलं. नातेवाईकांचे जाणं येणं कमी झालं आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपणच घ्यावी ह्याची जाणीव होऊ लागली.  वाहतूक कमी झाली म्हणजे पर्यावरण प्रदूषण कमी झालं. प्रदूषण विरहित वातावरणात दमा, अस्थमा सारखे श्वसनाचे विकार कमी झाले. 

“जो घरात राहील, तोच सुरक्षित राहील”, ह्यावरून एक खेळ आठवतो…. “सारीपाट” म्हणजेच “चल्लस आठ”. ह्यावरून एकच गोष्ट लक्षात येते कि , घरातील गृहिणीने बजावून सुद्धा हि शिस्त लागली नसती जी कोरोनाने वेळीच लावली. गृहिणीच्या मदतीला आला तो “कोरोना”.

===============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories