Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️राधिका कुलकर्णी.

प्रसादने केलेला फोन रिसीव्ह करताच आशू त्याच्यावर फटाक्यांसारखी बरसू लागली…

“हॅलो,अरे कुठेस तू?
इतके दिवसांपासून कूठे गायब?
मी किती विचार करत बसले इकडे.”

“अगंऽऽ होऽ होऽ. जरा मला बोलू तर देशील की नाही? “प्रसाद म्हणाला.
” हम्!बोल आता पटापट.मी खूप वाट पाहिलीय आता अजून उशीर नको लावूस “

“ए घाई नाही हं.”
“मी शांतपणे सांगणार. मला घाई आवडत नाही”

“अरे बोल आता. एकतर अर्धवट मेसेजेस करून अचानक गायब झालास.तिकडे काय परीस्थिती तेही कळायला मार्ग नाही. जीव नुसता टांगणीला लागलेला.आता अजून नको परीक्षा पाहूस.
पटपट बोल..नमनाला घडाभर तेल नको.”
आशूने तंबी देत आपल्या मनाची उद्विग्नता व्यक्त केली.

एक प्रदीर्घ श्वास टाकत प्रसादने मोठ्ठा पॉझ घेतला अन् बोलायला सुरुवात केली.

त्याचा सूर आता खूपच खोल झाला होता.

” मागला पूर्ण महिना माझ्या आयुष्यात इतक्या घटना घडल्या ना सखी, मला खरच तूझ्याशी बोलायचे होते.पण तूझा फोन लागत नव्हता. मेसेजेसला तू रिप्लाय देत नव्हतीस.
त्यात माझा फोन चोरीला गेला. अचानक सगळे कॉन्टॅक्ट्स गेले. तूझा नंबर पाठ नव्हता आणि खूप घटना अशा घडल्या की त्या निस्तरण्यातच अजूनही वेळ चाललाय सगळा.
घरी आल्यावर फक्त खाणे पडणे.झोपायचा प्रयत्न करतो पण शांत झोपही लागत नाही.मन खूप अस्थिर झालेय.सतत नको नको ते विचार मनात येत राहतात.

तूला ओझरते सांगीतलेच होते ना ऑफिसमधे एक मेजर प्रॉब्लेम झालाय असे.आता सविस्तर ऐक..पण ही गोष्ट फक्त तुला सांगतोय
इव्हन मनिषलाही मी बोललो नाही तेव्हा प्लिज हे आपल्यातच ठेव. “
हो रेऽऽ.तू मला आज ओळखतोएस का? तू माझ्याकडे येवून गेला आपण इतक्या गोष्टी शेअर करतो हे कुणालातरी माहितीय का, नाही ना! “
अगं त्या दिवशी मनिष आणि तू एकत्रित कॉनकॉलवर आले तेव्हा मी खूप चरकलो होतो.मला वाटले आता तू त्याला मी येऊन गेल्याचे बोललीस की काय? म्हणुनच मी घाईत फोन काटला.”
अरे तसे असते तर मनिष तुला इतक्यांदा भेटला, एकदा तरी विचारला नसता का कशी झाली आशूची भेट..पण तसे झाले का? नाही ना? मग आता तरी विश्वास आला की नाही तुला की मी काहीही सांगत नाही??

“हो गं.. विश्वास आहे म्हणुनच तर तुला शेअर करतोय ना.पण चुकून काही बोलशील म्हणून सुचवले फक्त.. “

” बरं..आता मुद्द्यावर ये आता.काय सांगायचे एवढे? “

” हम्म्म.. ऐकऽऽ……
एका ऑफीसरने माझ्या पासवर्डवर लॉग इन करून आमच्या कंपनीत एका फेक ऑर्डरवर अप्रुुुूव्हल मिळवून करोडोचा घोटाळा केला.

ती गोष्ट मागल्या वर्षी घडली आणि आता ह्या ऑडीटमधे ती पकडली गेली. त्यात माझ्या सिग्निचर्स मूळे मलाच सगळ्यांनी प्रश्न विचारून भंडावून सोडले.
मग अगदी पोलीस केसपर्यंत गोष्टी गेल्या. मला तर वाटले आता सगळे संपले. माझी इतक्या वर्षांची सगळी मेहनत,कष्टाने मिळवलेली पोझीशन,आणि माझे नाव सगळे सगळे संपले.
माझ्यापूढे सगळे शून्य झाले होते ग.
काहीच सूचत नव्हते.कसे ह्यातून सूटावे.कुणाची मदत घ्यावी.
तीन दिवस मी घराचे तोंड बघीतले नव्हते.
बायको,मलांना भेटलो नव्हतो. नजरकैदेत असल्यासारखे कमिटीच्या समोर प्रश्नांच्या फायरींगला झेलत होतो.
कंपनीच्या रेप्युटेशनचा सवाल होता ना शेवटी.

फक्त माझे प्रमाणिक चारित्र्य आणि स्वभाव डायर्क्टर्सना माहीत होता त्यामूळे त्यांनीं मुदत दिली होती की स्वत:ला प्रुव्ह कर की ह्यात तू कसा कुठेही सामील नाहीस.मग काय दिवस-रात्र ऑफिसमधली सर्व जुने रेकार्डस चेक करत होतो.माझा सगळा स्टाफ मला मदत करत होता.तेव्हा ज्या तारखेला माझी सही दाखवली त्या दिवशी मी लिव्हवर होतो ते रजिस्टरमधे दिसले.आणि मला थोडा रिलीफ मिळाला. तो ऑफिसर सध्या परागंदा आहे. पोलीस शोध चालूय. पण ताप काही संपलेला नाहीये.
त्यातच बाबा गेले अचानकच.
मी घरी कळू दिले नव्हते पण कदाचित माझे कधीतरी ऑफिशीयल्सशी बोलतानाचे काही संवाद त्यांच्या कानावर पडले की काय देव जाणे. त्याचाच धक्का बसला बहूतेक त्यांना. अचानकच तब्ब्येत खराब झाली त्यांची.
हॉस्पीटलाइज केले पण तीव्र ॲटॅक आला दुसरा अन् त्यातच सगळे संपले. तूझा फोन आल्याचे मनिषनी कळवले पण मी त्या मन:स्थितीतच नव्हतो की तुझ्याशी किंवा कुणाशीही बोलू शकेन. म्हणूनच बोलणे टाळले मी.
आणि नंतर तू अव्हेलेबल नव्हतीस. मला वाटले तू नाराज झाली असशील,कारण तुझ्या घरून इकडे आलो तसा मी संपर्कच बंद केला ना तुझ्याशी.
खरच माफ कर गं मला.
खरेतर मला खूप गरज होती तेव्हा कोणाच्यातरी आधाराची. पण असा फसलो की सुटकेचे सर्व मार्गच बंद झाले असे वाटायला लागले होते.
आता जरा थोडी परिस्थिती आटोक्यात येतीय कारण पोलीसांना सर्चमधे त्याच्या घरात बराच ऐवज आणि फोर्ज डॉक्युमेंट्स पण मिळालेत म्हणजे माझी सही पण फोर्ज केली होती.ऽऽऽऽ

“आता सांग,माझी काही चूक होती का?
गरीब जीवाला किती प्रश्न विचारून नामोहरम केलेस..”

आता जरा मस्करीच्या मूडमधे आली होती स्वारी पून्हा.

“अरे किती काय काय घडले.सगळेच किती धक्कादायक!
तू कसे सहन केलेस रे एकट्याने?
रिअली हॅट्स ऑफ डिअर.”

” एखादी वेळच वाईट असते.पण आपली कर्म चांगली असतील तर मग मार्गही निघतोच. देव देतो मार्गही आणि सहन करायची ताकदही.आणि मला तर एक ताकद एक्सट्रा दिलीय देवाने.”
” कोणती रे?”
“अग् वेडेऽऽ तू. तुझ्यासारखी प्रेमळ निरागस मैत्रीची ताकद असल्यावर काय पाहिजे अजून.”
“बरं बरं. बास आता.चापलूसी बंद कर.”
इकडे मला वाटले की तू चिडलास म्हणुन नंबर पण बंद केलास. कुठुनही संपर्क होत नव्हता.आणि मी मध्यंतरी सिमला मनाली टूरवर गेले होते.तिकडे नेट बंद रेंज नव्हती म्हणून फोनही 8 दिवस बंदच होता.तूझा मेसेज त्याच वेळचा असणार म्हणून तुझा फोनही लागला नसेल.आणि तुझ्या घरच्या सर्व अडचणी निस्तरण्यात तू बिझी होतास म्हणून मग मीही तूला कळवले नाही काही.
त्यानंतर आल्यावरही लग्न, मुंज,घरातल्या कामातून सवड मिळायला अजून आठ दिवस गेले.
गेले चार दिवस मेसेज करतीय पण रिप्लाय नाही.किती घाबरले मी.
मग मेल केला आणि थँकफूली तुझा रिप्लाय आला नाहीतर मग मी ठरवले होते की आता तू पून्हा कॉन्टॅक्ट करेपर्यंत संपले सगऴे मैत्री अँड ऑल असेच समजायचे.”

” ए सखी..इतक्या लवकर मला सोडायची भाषा.?”
“तूला पनिशमेंट द्यावी लागेल आता.”

“अरे तू सांगशील ती पेनॉल्टी देईन.

” तू बोल फक्त..”मी हसतच बोलले.”

“पून्हा एकदा भेटूयात का एकदा.”

“पण ह्यावेळी फक्त दोघेच.”
चालेल???

“हे काय प्रसाद?”
“मला लगेच कसे जमेल आता”
“शक्यता कमीच आहे.”

“कधीही भेटू.तू इकडे आलीस की.”
मला खूप बोलायचेय ग तूझ्याशी.पण असे फोनवर नाही समोर बसून बोलायचेय.”
“हम्मऽऽऽऽऽऽ!!”
“बापरे तू खूपच सिरीयसली बोलतोएस.एवढे काय बोलायचेय रे?
काय प्रेमात बिमात नाही ना पडलास कुणाच्या?”

मी ही हसून मस्करी करत होते त्याची.
तोही हसत होता.

आज खूप दिवसांनी मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. त्यामुळे खूप रिलीव्हड् फिल करत होते मी.
प्रसादही खूप समाधानी वाटत होता.
# ## ## ## ## # #
काय गंम्मत असते नाही.सगळे असूनही मैत्रीखेरीज जीवन किती अपुरे अपुरे वाटते.
कुणास ठाऊक असे काय असते की एका विशिष्ट व्यक्तीशी आपल्या मनातल्या गोष्टी बोलल्या खेरीज मन:शांती लाभत नाही.सगळे असून नसल्याचा भास.
तो एक आवाज,ती एक शाब्दिक आपुलकीची हाक,दिलेले धैर्य,प्रोत्साहन,दिलेले एक आत्मिक बळ मनाला किती उभारी देवून जाते.
आज खूप प्रसन्न आणि शांत शांत वाटत होते……..

(क्रमश:14)
®️©️राधिका कुलकर्णी.