Ritbhatmarathi

Search
Close this search box.

याआधी मी जे काही लेख लिहिले , हा लेक त्यांच्या एकदम उलट आहे. पण प्रभावित करणारा आहे. हा लेख देखील तुमच्या पर्यंत पोहचवण्याची गरज होती म्हणूनच लिहीत आहे.

आजची सद्य परिस्थिती काय सांगते कि आज मुली कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत. आज मुली शिकून मुलांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. खूप चांगली गोष्ट आहे आणि मुलींना त्याच्या पालकांनी प्रोत्साहन देणं गरजेचे आहे.

हे सर्व काही ठीक आहे हो!! पण खरं सांगायला गेलं तर लग्न झाल्यावर आणि मुलंबाळ झाल्यावर नोकरी करून खरंच सगळं होतं का हो म्यॅनेज ? मी ह्या गोष्टीवर खूप विचार केला आणि म्हटलं कि मुलींना शिकवा आणि तिला तिच्या पायावर उभं करा हे तर सगळेच बोलतात, पण मग पुढे काय? ह्याबद्दल कुणीही बोलत नाही.

जास्त दूर कशाला जाता. माझीच गोष्ट सांगते ना मी गेल्या १० वर्षांपासून आयटी मध्ये नोकरी करते. एक ३ वर्षांचा मुलगा पण आहे. मुलगा नव्हता तोपर्यंत सगळं छानच चाललं होतं. सगळं काही वेळेवर म्यॅनेज होत होतं. डिलिव्हरी झाली तेव्हा ब्रेक पण घेऊन झाला. मुलगा ९-१० महिन्यांचा असेल तेव्हा परत रुजू व्हावं लागलं. घरात सासू होत्या. मला त्यावेळी नाईलाजाने लवकरच जॉईन व्हावं लागणार होतं. खरं सांगावं तर तान्ह्या बाळाला सोडून हिम्मतच होतं नव्हती ऑफिसला जायची. पण घरची सद्य परिस्तिथी बघता मीही तडकाफडकी निर्णय घेतलाच…. परत कामावर रुजू होयचा…. आणि अजून खरं बोलायचं म्हटलं तर “लोक काय म्हणतील?” याची आपल्याला फार चिंता असते. कारण मी पाहिलं आहे… जॉब सोडला कि लोक…अरे!! तू जॉब सोडला का ? का सोडला ? हातचा चांगला जॉब होता तो तू सोडून दिलास? हे जे प्रश्न आहेत ते मनाला काहूर करून जातात आणि आपल्यालाच आपली लाज वाटायला लागते कि खरंच जॉब सोडून आपण खूप मोठी चूक केली का?
त्यामुळे जॉब काही मी सोडला नाही. आयटी मध्ये नोकरी करत असाल तर तुम्ही कितीहि म्हटलं तरी कमीत कमी ६-७ तास तुम्हाला ऑफिस मध्ये द्यावेच लागतात.

सुरुवातीला एक आठवडा काय सांगू हो तुम्हाला!!!! मी घरी परतताच मुलगा खूप रडायला लागायचा…. असा वाटायचं जसं काही तो माझीच इतक्या आतुरतेने वाट बघायचा.. चिमुकल्याचा चेहरा फार पडलेला असायचा…. घरी आल्या आल्या बाकी काही नाही…. तर पटकन हाथ पाय धुवून त्यालाच घ्यायचे आणि तो एक स्पर्श दिवसभराची माझी थकान दूर करायचा.. त्याच वेळी मनात विचार यायचा कि आपण जर २ मिनिटे आपल्या चिमुकल्याला देऊ नाही शकत तर आपण कशासाठी…. एका जॉब साठी आपल्या आणि त्याच्याही जीवाचं रान करतो ?

हळू हळू परिस्थिती सुधरली. तोही आता आजीकडे राहायला शिकला. हळू हळू मीही ऑफिस मध्ये कामात दंग झाले आणि ऑफिसला जास्त वेळ देऊ लागले. मी आणि माझे पती एकाच ऑफिस मध्ये काम करतो.. त्यामुळे सकाळी सोबतच जातो आणि रात्रीही (हो रात्री !!!!) सोबतच घरी वापस येतो.. आम्ही सकाळी साधारण ९:३० वाजता घर सोडतो आणि रात्री ८ वाजता घरी येतो. सकाळी माझा मुलगा ९ वाजता उठायचा आणि कधी कधी तर असा दिवस यायचा कि रात्री आम्ही घरी यायच्या आधीच झोपलेला असायचा.. त्यामुळे कधी कधी फार कमी भेट होयची.. 
आणि थोड्याच दिवसात असं प्रकर्षाने जाणवू लागलं कि त्याच्या दुनियेत फक्त तो आणि त्याची आजीचं असायची!!!! तो फक्त आजी !!आजीच!! करायचा. आई बाबा असो.. नसो.. त्याला काहीच फरक पडत नसे .एवढंच काय काही खायला देखील मागायचं असेल तर त्याला आजीचं आठवते. काहीही हट्ट करायचा असेल तर आज हि त्याला आजीचं लागते.

आणि अजून त्यात भर म्हणजे तो कधी मला किंवा त्याच्या पप्पाना हाक जरी मारतो तर त्याच्या तोंडून सर्वप्रथम शब्द येतो तो म्हणजे “दादी”!!
एवढा त्याला.. त्याच्या आजीचा लळा लागतो. खूप समाधान वाटायचं हे बघून कि चला आपल्या मागे घरचं कुणीतरी आपल्या चिमुकल्याची काळजी घेत आहे ..पण मनात एक विचार मात्र सतत काहूर करायचा कि आपण कुणासाठी जॉब करतो ? आज सगळे बोलतात तर खरे कि मुली प्रत्येक क्षेत्रात प्राविण्य आहेत.. आणि आज नवरा बायको दोघे जिथे जॉब करतात त्यात काहीच वावगं नाही.. कारण घरासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी जर घरच्या स्त्रीने जॉब करून हातभार लावला तर चांगलंच आहे.. पण खरंच का मुलांच्या भविष्यासाठी स्त्रीने जॉब करावा का ?

मुलांसाठी पैसे कमवून बँक बॅलन्स तर बनवतो आपण.., पण त्यासाठी आपण मुलांचं बालपण त्यांच्यापासून हिरावून घेतो त्याच काय ? ते चिमुकले पहिल्यांदा चालायला शिकतात , त्यांचं ते तोंड बघण्यासारखं असतं जेव्हा दुधाव्यतिरिक्त त्यांना पहिल्यांदा काहीतरी देतो , त्यांचं ते खेळणं , खिदळणे , हसणं, झोपेत काहीतरी स्वप्न पडलं कि ते स्मितहास्य, पहिल्यांदा बोलणं , पहिल्यांदा शाळेत जाणं.. हे सगळं आपण मिस नाही का करत आहोत? हे चिमुकले जेव्हा लहान असतात तेव्हाच ते आपल्याकडे येतात तेव्हाच त्यांना आपली आणि आपल्या सहवासाची गरज भासते. एकदा मोठे झाले कि पाखरासारखे भुर्र्कन उडून जातात. मग तुम्ही त्यांना तुमच्या जवळ बोलावलात तरी देखील ते येणार नाही तुमच्याकडे.

बोध : हि काही बोधकथा नाही. आजची सद्य परिस्थिती आहे आणि माझी स्वतःची मनोगाथा. त्यामुळे हि गोष्ट कुणी स्वतःच्या मनाला लावून घेऊ नका. पण फक्त ह्यावर खोलवर विचार नक्की करा. माझं एवढंच सांगणं आहे कि तुमच्या चिमुकल्यांना जगवायला शिकवण्यापेक्षा त्यांच्या सोबत जगायला शिका….

© RitBhatमराठी

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories