Ritbhatmarathi

Search
Close this search box.

महाराष्ट्रामध्ये कुठलीही भाजी असो वा नुसती भाकरी त्यासोबत मिरचीचा ठेचा तर हवाच. मिरचीचा ठेचा बनवायला जितका सोपा तितकाच तो चवीष्ठही लागतो. खेड्यागावात तर कधी भाजी उपलब्ध नसेल तर भाकरी अथवा चपाती सोबत आवडीने खाल्ला जातो.

मिरचीचा ठेचा साहित्य :

हिरव्या मिरच्या – १५-१६

लसूण पाकळ्या – १०-१२

जिरे – १ चमचा

मीठ चवीनुसार

तेल – २-३ चमचे

मिरचीचा ठेचा बनवण्याची कृती:

सर्वप्रथम एक लोखंडी तवा तापवत ठेवावा. तवा लोखंडी असेल तर उत्तम. कारण लोंखंडी तव्यावरची चव काही वेगळीच लागते.

त्यानंतर तव्यावर २-३ चमचे तेल टाकावे. तेल तापले की त्यावर पहिल्यांदा लसूण भाजून घ्यावा. कारण मिरच्या आधी भाजल्या कि लसूण कच्चा
राहण्याची शक्यता असते. तसेच लसूण जास्त ब्राउन करू नये.

लसूण थोडासा सोनेरी झाला कि त्यात जिरे टाकावे. जिरे थोडे तडकले कि मग मिरच्या टाकाव्या. मिरच्या छान सोनेरी होऊपर्यंत भाजून घ्याव्यात. 
मिरच्या जास्त करपवु नये.

मिरच्या भाजून झाल्या, कि मीठ टाकावे आणि मिरचीचे मिश्रण लगेच तव्यावरून काढून घ्यावे. मिश्रण गरम असतानाच खलबत्त्यामध्ये कुटून घ्यावे. मिश्रण मिक्सर मधून बारीक करू नये .कारण जी अस्सल चव खलबत्यामध्ये किंवा पाट्यावर पारंपरिक पद्धतीने वाटून येते ती मिक्सर मध्ये येत नाही.

तयार आहे झणझणीत मिरचीचा ठेचा!!!!

तुम्ही हा ठेचा चपाती/भाकरी अथवा कुठल्याही भाजी सोबत तोंडी लावू शकता.

 

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories