Ritbhatmarathi

Search
Close this search box.

चारधाम यात्रेचे अनन्यसाधारण महत्व आणि चारधाम यात्रेची पूर्वतयारी

Char Dham information in marathi: आपण सगळेच माणसं आहोत. आणि माणूस म्हटलं की चुका तर होणारच. म्हणूनच म्हणतात ना “माणूस मात्र भुलाना पात्र”. म्हणजेच माणूस चुकीला पात्र आहे. या चुका आपल्या सगळ्यांकडूनच होत असतात. कधी कळत तर कधी नकळत. काही चुकांची जाणीव आपल्याला होते तेंव्हा आपण त्याचे प्रयचित्त करण्यासाठी किंवा झालेल्या चुकितून मुक्त होण्यासाठी देवाच्या चरणी जातो किंवा ज्यांच्या बाबतीत आपण चुकलो त्यांची माफी मागतो.

पण तरीही आपल्या कडून चुका होत राहतात. सतत, निरंतर. कधी आपण घरातील मुंग्या, झुरळ, पाली मारतो. कधी चुकून घरात साप निघाला तर तो मारतो. एखाद्या कुत्र्याला किंवा बैलाला जर तो शेतात काम करत नसेल तर मारतो. एखद्याला वाईट बोलून किंवा नको ते शब्द वापरून मनाला जखमा करतो. अशा अनेक प्रकारे आपण कोणती ना कोणती चूक किंवा त्याला आपण पाप म्हणुया करतच असतो.

आपले मन म्हणजे आपला आतला आवाज त्याची साक्ष आपल्याला वेळोवेळी देत असतेच. पण सगळ्यांनाच हा आतला आवाज कळतो असे नाही. किंवा कळला तरी आपण त्याचं ऐकतोच असे होत नाही. मग आयुष्याच्या सरत्या वेळी, किंवा आयुष्याच्या एखाद्या संध्याकाळी आयुष्यातील घटनांचा क्रम डोळ्यासमोरून जातो आणि मग हिशोब होतो तो पुण्याचा आणि पापाचा.

पण ईश्वर सगळ्यांना पापमुक्त होण्याची संधी देतोच. मनापासून देवाला मागितलेली प्रार्थना देव ऐकतो ना. म्हणूनच ईश्वरी कृपेने आपल्या महाराष्ट्रात अशी पावन आणि पवित्र स्थळे आहेत, देवालये आहेत, मंदिरे आहेत जिथे गेल्याने आपल्या आयुष्यातील सगळी पापे धुतली जातात आणि जन्म मृत्यूच्या या चक्रातून आपली सुटका होते असे मानले जाते. आपण नेहमी ऐकतो की गंगा स्नान केल्याने आपली पापे धुतली जातात. तसेच अजून एक खूप प्राचीन धार्मिक स्थळ म्हणजे ” चारधाम “.

खूप लोकांनी याबद्दल ऐकले असेल. हे खूप पवित्र ठिकाण आहे. आदिगुरू शंकराचार्य यांनी परिभाषित केल्याप्रमाणे चारधाम येथे चार वैष्णव तीर्थे आहेत. याच्या उत्तरेला बद्रीनाथ, पश्चिमेला द्वारका, पूर्वेला जगन्नाथपुरी आणि दक्षिणेला रामेश्वरधाम आहे. प्रत्येक हिंदूने त्याच्या आयुष्यात एकदा तरी इथे जाणे आवश्यक आहे. कारण हि तीर्थक्षेत्र हिंदूंना मोक्ष प्राप्त करण्यास मदत करते. म्हणूनच चारधामल भेट देणे हा आजीवन प्रवासातील शुभ प्रवास मनाला जातो. इथे आल्यामुळे जीवनात केलेली सर्व पापे धुवून जातात.

ही सगळीच ठिकाणे उत्तराखंडातील गढवाल हिमालयात आहे. पाहिले बद्रीनाथ, दुसरे केदारनाथ, तिसरे गंगोत्री आणि चौथे यामुनोत्री.

१. गंगोत्री (Gangotri)

गंगोत्री हे उत्तराखंड मधील उत्तरकाशी येथे वसलेले आहे. हा भूभाग ताज्या पाण्याच्या प्रवाहाने आणि आसपासच्या हिरवळीने नटला आहे. हिंदू मान्यते प्रमाणे गंगा नदीचे उगमस्थान आहे. यामुळेच याला गंगोत्री हे नाव पडले. याच गंगोत्रीचे पाणी चारधामच्या पुढच्या ठिकाणी म्हणजेच बद्रीनाथ आणि केदारनाथला आणले जाते. येथील गंगोत्री मंदिर बघण्यासारखे आहे. याशिवाय गांगणानी नावाचे एक ठिकाण आहे, जिथे पाण्यात बुजलेले एक शिवलिंग आहे जिथे गंगा देवता इतर धार्मिक स्थळांच्या ही आधी प्रथम पृथ्वीवर आवतार या गांगणानीच्या पाण्यात कोणत्याही प्रकारचे दुखणे बरे करण्याचा गुणधर्म असलेले गरम पाण्याचे कुंड आहे.

Gangotri
२. यमुनोत्री (Yamunotri)

याच्या नावावरूनच या शहराचा अंदाज लागतो. अर्थातच यमुना देवीला समर्पित असलेले हे पवित्र ठिकाण आहे. अशी मान्यता आहे की इथल्या कालिंदी पर्वतात यमुनेचा उगम झाला. या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांना जानकीचट्ट पासून चढून जावे लागते. पण ज्यांना चालणे टाळायचे असेल ते खेचरावर किंवा पालखीत बसून जाऊ शकतात. येथे बघण्यासाठी बरीच ठिकाणे आहेत मुख्य मंदिर, सूर्य कुंड, सप्तऋषी कुंड आणि जानकीचट्टी ही काही मुख्य ठिकाणे आहेत. इथे ट्रेकिंग करण्याचा लाभही आपण घेऊ शकतो.

Yamunotri
३. केदारनाथ (Kedarnath)

केदारनाथ हे ठिकाण रुद्र प्रयाग पासून ८६ किमी अंतरावर गुप्तकाशी मध्ये असलेले ठिकाण आहे. या ठिकाणी जाण्यासाठी निसर्गाने नटलेल्या सुंदर पर्वतामधून, गवताळ प्रदेशातून, उष्ण भागातून, पर्वत शिखरे मधून आणि सगळीकडील हिरवळी मार्गे यात्रा करून जाता येते. केदारनाथ म्हणजे बारा ज्योतिर्लिंग पैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र. इथे पाहण्यासाठी वन्यजीव अभयारण्य आहे जे दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीवांनी समृध्द आहे. येथील भैरव मंदिर पाहण्यासारखे आहे. इथेच महापंथ म्हणून एक ठिकाण आहे जे उच्च संतोपंथ म्हणून ओळखले जाते कारण हा स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे असे मानले जाते.

Kedarnath
४. बद्रीनाथ (Badrinath)

हे ठिकाण उत्तराखंडच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगेत अलकनंदा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि डेहराडूनच्या ३३५ किमी ईशान्येस आहे. शंकराचार्यानी नवव्या शतकात बद्रीनाथची पुनर्स्थापना केली. जगातील सर्वात पवित्र स्थानापैकी हे एक ठिकाण आहे. हे ठिकाण गढवाल हिमालयाच्या मध्यभागी असल्यामुळे इथे भेट देण्यासाठी विशेष परवानगीची गरज असते. या ठिकाणी जाण्यासाठी कारची व्यवस्था आहे. या कारसाठी ठराविक वेळ ठरवण्यात आली आहे. जर तुम्हाला रांगेत उभे राहून दर्शन घेणे टाळायचे असेल तर तीन नंबरच्या गेट जवळील काऊंटरवर जाऊन वेदपाठ पूजेसाठीची पावती करा. यासाठीचा प्रत्येक व्यक्तीसाठी २५०० रुपये खर्च येतो आणि फक्त पंधरा मिनिटात दर्शन होते.

Badrinath


चारधाम यात्रा ही लांब, अवघड जरी वाटत असली तरीही तितकीच लाभ देणारी आहे. या यात्रेची सुरुवात यामुनेत्रीच्या यमुना नदीत डुबकी घेऊन केली जाते. तिथून गंगोत्री, केदारनाथ आणि शेवटी बद्रीनाथ. या यात्रेच्या दरम्यान भाविक यथाशक्ती होईल तितकी सेवा, पूजा करतात.

जाणून घ्या हरिद्वारमध्ये गंगा स्नानास अनन्य साधारण महत्व का आहे?

जाणून घ्या महाराष्ट्रातील देवींचे साडेतीन शक्तिपीठे (sadetin shaktipeeth) आणि त्यांचा इतिहास


चारधाम हे उत्तर खंडातील गढवाल हिमालयात आहे. ही यात्रा पश्चिमेपासून पूर्वेकडे जाते. याची सुरुवात यमुनेत्री पासून होते, पुढे गंगोत्री जाते, नंतर केदारनाथ मध्ये आणि बद्रीनाथ पाशी थांबते.

  • या यात्रेला जाण्यासाठी दिल्ली, हरिद्वार, ऋषिकेश आणि डेहराडून असे आपल्या सोयीचे मार्ग आहेत.
  • चारधामल जाण्यासाठी बायोमेट्रिक पंजीकारण असणे आवश्यक आहे.
  • आधार कार्ड, मतदान कार्ड, पेन कार्ड, वाहन परवाना ( ड्रायव्हिंग लायसन्स ), पासपोर्ट अशी महत्त्वाची कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
  • यात्रेसाठी आवश्यक असलेले बुकींग ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करता येते. जे लोक वयामुळे किंवा तब्येतीमुळे चालू शकत नाहीत अशांसाठी पालखी, घोडा उपलब्ध आहेत.
  • यात्रे दरम्यान गरम जॅकेट, हातमोजे, स्वेटर आणि रेनकोट असे गरम राहणारे कपडे अवश्य घ्या.
  • यात्रेत जाताना पायाला घट्ट बसतील अशा मजबूत चपला वापरा.

नोंदणी :
यात्रेसाठी पूर्वनोंदणी गरजेची आहे. यासाठी नोंदणी केंद्रावर जाऊन नोंदणी केली जाते किंवा ऑनलाईन ही नोंदणी करता येते. नोंदणी पूर्ण झाल्यावर एक यात्रा कार्ड दिले जाते जे संपूर्ण यात्रेत जवळ बाळगणे आवश्यक असते.

गुप्तकाशी आणि सोनप्रयागमध्ये असलेल्या वैद्यकीय केंद्रातून वैद्यकीय स्वास्थ प्रमाणपत्र मिळाले तरच आपण ही यात्रा करू शकतो. जर या प्रमाणपत्रात असे लीहले असेल की चढ चढून जाण्यास मज्जाव आहे तरीही हेलिकॉप्टरच्या साहाय्याने आपण ही यात्रा करू शकतो. त्याच प्रमाणे वयस्कर मंडळी पण एकट्याने ही यात्रा करू शकतात. कारण सर्व प्रकारच्या सोयी सुविधा त्यांच्याकरता उपलब्ध आहेत. जसे की पालखी, घोडा, कार, पटकन दर्शन सुविधा.

हि यात्रा अतिशय मोहक आणि अविस्मरणीय ठरते. कारण केलेली सर्व पापे धुतली जातात, जन्म मृत्यू फेऱ्यातून मुक्ती मिळण्याचे प्रवेशद्वार आणि धार्मिक कार्य सोबतच साहस आणि निसर्गआस्वाद घेता येतो. त्यामुळे आपण एकदा या यात्रेचा सुखद अनुभव घ्यायलाच हवा आणि पाप मुक्त व्हायला हवे. नाही का ??

===============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *