Ritbhatmarathi

Search
Close this search box.

बहुगुणी भीमसेनी कापूर, वस्तू एक फायदे अनेक

कापूर हा खडीसाखरेच्या खड्यासारखा पांढरा व पारदर्शक असतो. हा उग्र असून कडू व थंड आहे.
कापराचे दोन प्रकार आहेत. क्रुत्रिम कापूर जो कापुरगंधी (Ocimum kilimandscharicum) तुळशीतील द्रव्यांनी व रसायनांनी बनविला जातो. दुसरा भीमसेनी कापूर जो नैसर्गिकरित्या सिन्यामोमम केम्फोरा या सदापर्णी झाडापासून विशिष्ट प्रक्रियेने बनवतात. ही झाडे भारतात डेहराडून, कलकत्ता,म्हैसूर,हैदराबाद येथे आढळतात. भीमसेनी कापराचे आयुर्वेदात फार मोलाचे स्थान आहे.

१. दाढदुखीवर

दाढ दुखत असल्यास कापराचा तुकडा किडलेल्या दाढेत धरून राहिल्याने दाढेतूनं मारणारा ठणका थांबून आराम मिळतो. लाळेतून सुटलेले कापराचे पाणी गिळले गेले तरी अपाय होत नाही मात्र भीमसेन कापूर वापरावा ज्यात रसायने नसतात.

२. केसांच्या समस्यांवर प्रभावी

हार्मोनल इम्बेलन्स, ताणतणाव,वायूप्रदूषण यामुळे केस तुटणे, केसांना फाटे फुटणे, केस गळणे, कोंडा होणे अशा केसांच्या समस्यांना बहुतांशी जणांना सामोरे जावे लागते.
कापराच्या वड्या खोबरेल तेलात मिसळून या तेलाने केसांच्या मुळांस मालीश केल्यास तेथील रकतचलन सुधारते, केसांची मुळे बळकट होतात. कापरात असलेल्या एंटी फंगल गुणधर्मामुळे कोंड्याची समस्या दूर होते.

३. ह्र्दय धडधडणे

अजिर्ण, अपचन, छातीतील जळजळ, मानसिक ताणतणाव, थकवा अथवा अन्य कारणांनी ह्रदय धडधडू लागल्यास कापूर व खडा हिंग यांची पूड करून ती घ्यावी. ह्रदयाचे धडधडणे कमी होते.

४. शय्यावर्ण

काही आजारांत रुग्णाची हालचाल बंद होते. रुग्ण कायमचा अंथरुणास खिळलेला असतो. अशावेळेस त्याची त्वचा अंथरुणास घसटून शय्यावर्ण होण्याची शक्यता असते. ते होऊ नयेत यासाठी कापूर व कात रुग्णाच्या त्वचेच लावावा.

५. संधिवातावर गुणकारी

शारीरिक दौर्बल्यामुळे, वातविकारामुळे सांधे धरतात, पायाच्या पोटऱ्यांत पेटके येतात. अशावेळी तीळाच्या तेलात भीमसेनी कापराच्या वड्या मिसळाव्यात. हे कापूर विरघळलेले तेल दुखऱ्या स्नायूंवर, ढोपरांवर लावून हलक्या हाताने मालीश करावे.

६. सर्दी, पडसेवर गुणकारी

सर्दी, पडशाची आजूबाजूस साथ असेल तर रुमालात कापूर ठेवून तो हुंगत रहावा. विषाणूंची बाधा होणार नाही. सर्दी, पडसे होऊन नाक बंद झाले असल्यास कापराची पूड हुंगावी, कापराच्या वड्या गरम पाण्यात टाकून वाफ घेतल्यास चोंदलेले नाक मोकळे होते, घसा लाल झाला असेल तर बरा होतो.

७. डोकेदुखीवर गुणकारी

कोणत्याही कारणाने डोके जड झाले असल्यास, दुखत असल्यास कापराचे तेल कपाळास चोळावे. डोकेदुखी कमी होते.

उन्हाळ्यात ‘हि’ फळे आवर्जून खा. त्यांच्या सेवनाने मिळतात हे फायदे

माहित आहे का? रिफाईंड तेल आरोग्यासाठी खूप घातक आहे. उत्तम आरोग्यासाठी आजच आहारात हे कूकिंग ऑइल समाविष्ठ करा

८. खाज येणे

थंडीत त्वचा कोरडी पडून त्वचेला खाज सुटते. अशावेळी खोबरेल तेलात कापराच्या वड्या विरघळवून ते तेल हाता, पायांना लावावे. नियमित हा उपाय केल्यास त्वचा मऊ, मुलायम, सतेज, तुकतुकीत रहाते.

९. पायांना भेगा पडल्यास

पावसाळ्यात अगर वातप्रकोप झाल्यास पायांना भेगा पडतात. त्या जागी फार भगभगते. अशावेळी  पायांना सोसेल एवढ्या गरम पाण्यात कापराच्या दोन वड्या विरघळवून त्यात पाय बुडवून थोडा वेळ बसावे.

१०. दुर्गंध दूर होण्यासाठी

दिवसभर पायमोजे पायात असल्यास पायांना खाज येते, दुर्गध येतो. पायमोजात कापराची पूड ठेवावी जेणेकरून दुर्गंध येणार नाही व पायाला खाज सुटणार नाही.

११. मच्छर, चिलटे घालवण्यासाठी

बाजारात डासांना घालवण्यासाठी केमिकलयुक्त स्प्रे, कॉईल, वड्या मिळतात, ज्यांचा वास काहींना सहन होत नाही. लहान मुले, म्हातारी माणसे त्या वासाने घुसमटतात. त्या रासायनिक वड्यांऐवजी घरात कापूर जाळण्याचे मशीन आणून त्यावर कापूर ठेवून प्लग ऑन करावा. कापूराचा सुगंध घरात पसरतो ज्याने वातावरण शुद्ध, प्रसन्न होते. डास, चिलटे, इतर किटक पळून जातात.

१२. कपाटात, बेगेत ठेवण्यासाठी

कपाटात, प्रवासी बेगेत ठेवलेल्या कपड्यांना ठेवणीचा विशिष्ट वास येतो. तो येऊ नये म्हणून, कपड्यांना कसर लागू नये म्हणून कपड्यांच्या घडींत कापूर ठेवावा. कपडे सुरक्षित व सुगंधी रहातात.

१३. सकारात्मक उर्जेसाठी

घरातील निराशाजनक उर्जा निघून जाण्यासाठी, घरात सकारात्मक उर्जा येण्यासाठी, मनावरील ताणतणाव कमी होण्यासाठी, रात्री शांत झोप लागण्यासाठी तिन्हीसांजेला घरात कापूर जाळावा. फरशी पुसण्याच्या पाण्यात कापराची पूड घालावी जेणेकरून फरशीवरील विषाणू नष्ट होतात.

१४. भाजलेले व्रण बरे होण्यासाठी

थोडेफार होरपळले असेल, भाजले असेल तर त्यावर कापूर तेल नियमित लावावे. भाजल्यामुळे होणारा त्वचेचा दाह कमी होतोच शिवाय त्या जागी पडलेले डागही हळूहळू नाहीसे होतात.

१५. ताप ओसरण्यासाठी

ताप आला असता साध्या पाण्यात कापूर विरघळवून त्या पाण्याच्या घड्या कपाळावर ठेवल्यास ताप उतरण्यास मदत होते.

१६. तळव्यांच दाहावर

मधुमेहासारख्या आजारात पायाच्या तळव्यांची आग आग होते. अशावेळी तळव्यांना कापराचे तेल हलक्या हाताने लावल्यास जळजळ, दाह शांत होतो.

या व्यतिरिक्त मुळव्याध,नाकाचा घोणा फुटणे यांवरही कापुराने इलाज केला जातो.

भीमसेनी कापूर पुजेअर्चेत, आयुर्वेदिक औषधांमध्ये फार पुर्वीपासून वापरण्यात येतो. मात्र तो योग्य मात्रेत वापरावा लागतो. कापराचा अतिवापर केल्यास दुखणे बरे होण्याऐवजी इतर व्याधी होण्याची श्यक्यता असते.

===================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *