Ritbhatmarathi

Search
Close this search box.

रेवतीने मागे वळून पाहिलं आणि तिला एका निळ्या शर्ट मध्ये देखणा मुलगा गुढघ्यावर बसलेला दिसला.

“हाय रेवती,  मी वरुण….मला माफ कर..मी तुला उगाचच त्रास दिला आणि त्यामुळे तुझी फार घालमेल झाली.”

रेवतीला काय बोलायचं सुचतंच नव्हतं.. पण तिला वरुण मनोमन आवडला होता आणि खरं कि वरुणने जे सरप्राईझ दिलं होतं ते पाहून कुठलेही मुलगी मोहित झाली असती. रेवतीला सगळं कसं हवंहवंसं वाटत होतं.

तेवढ्यात वरुणने रेवतीला फुलांचा गुच्छ ऑफर करत लग्नाची मागणी घातली.

वरुण – “रेवती, मला तुझ्यासोबत माझं उर्वरित आयुष्य घालवायचं आहे. सांग ना तुला आयुष्यभर माझी बायको म्हणून मिरवायला आवडेन का?”

रेवती अजूनच गोंधळात पडली होती. ती च.. च.. प… प ….करायला लागली होती.

तेवढ्यात शालू दरवाज्यातूनच रेवतीला चिढवत म्हणाली….

“अगं एवढा विचार नको करू…पटकन हो म्हण नाहीतर…. हा माझा शाळेतला क्रश आहे…तू त्याचं प्रपोजल नसशील स्वीकारत तर तसं सांग…  मीच वरुणला होकार देईन…”

रेवती – “अच्छा, तर हे सगळं तुझं कारस्थान आहे….”

“आणि काय हो मिस्टर वरुण तुम्ही असे वाऱ्यासारखे आलात माझ्या आयुष्यात तुम्हाला असं का वाटतं कि मी तुम्हाला स्वीकारावं म्हणून….हि गुलाबाची फुलं, हा गुच्छ, हि सजवलेली रूम हे बघून मी काही प्रभावित होणार नाही….. तुम्ही असं काहीतरी करा कि माझा तुमच्यावर विश्वास बसेन..”

तेवढ्यात रेवतीची मावशी आली….रेवती मावशीकडे राहत असल्याने ..मावशी तिची खास मैत्रीण होती..रेवतीच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ती आईला सांगण्याआधी मावशीला सांगायची.

मावशी – “रेवती. ..तुझा वरुण वर विश्वास नाही पण तुझ्या मावशीवर तर आहे. हे बघ वरुण तुला भेटायच्या आधीच मला भेटून गेला होता आणि त्याने मला त्याच्याबद्दल सगळं सांगितलं आहे….आणि वरुण खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि हे बघ रेवती जेव्हा एखादा मुलगा डायरेक्ट लग्नाची मागणी घालतो ना तो खरंच त्या मुलीवर जीवापाड प्रेम करत असतो गं….आणि तू म्हणायचीस ना कि तुला तुझ्या काकांसारखाच मुलगा हवा आहे म्हणून…खरं सांगू तर वरुणमध्ये मला तुझा काकाच दिसतो….आणि हो तू ताई आणि जीजुंची काळजी नको करू..माझंत्यांच्याशीही बोलणं झालं आहे आणि त्यांनी संपूर्ण निर्णय माझ्यावरच सोपवला आहे.”

मावशीचं बोलणं ऐकून रेवतीने लागलीच मावशीला घट्ट मीठी मारली आणि मुसूमुसू रडायला लागली.

तेवढ्यात वरूण –  “Excuse me…., इथे मी सुद्धा आहे आणि बराच वेळ झाला मी गुढघ्यावर बसलो आहे पण मला कुणी इंटरटाईनच करत नाहीये….

रेवती वरुण जवळ जाऊन म्हणाली – “एस इ आकसप्त युअर प्रपोजल पण फक्त माझी एक अट आहे कि तुम्हाला तुमच्या आई बाबांशीही आपल्याबद्दल बोलावं लागेन.”

वरुण – “अगं त्यात काय एवढं…..चल आताच जाऊ या आपण..”

मावशी – “अरे थांबा रे आधी एकमेकांना थोडं जाणून घ्या आणि मग वरुणच्या आई बाबांना भेटा.”

रेवती आणि वरुण दोघांनाही मावशीचं म्हणणं पटलं. त्यानंतर जवळपास २ महिने दोघेही एकमेकांना भेटत राहिले आणि त्यांना दोघांनाही असं जाणवलं कि त्यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य आहे आणि आता लग्न करायला काही हरकत नाही.

त्यानंतर दोघांनी एक दिवस ठरवला आणि वरुण रेवतीला घेऊन घरी गेला…तसं त्याने आई बाबांना आधीच कल्पना दिली होती.

त्या दिवशी मावशीने रेवतीला छान तयार केलं होतं. मावशीच्या त्या गडद जांभळ्या रंगाच्या पैठणीत रेवती छान उठून दिसत होती. वरुण आलिशान गाडीमध्ये रेवतीला न्यायला आला होता. मावशीचा निरोप घेऊन दोघेही वरुणच्या घरी निघाले.

वरुणची संपत्ती आणि ऐशोआराम पाहून रेवतीचे डोळे दिपून गेले होते. इतक्यात एक नोकर निरोप घेऊन आला कि, “यदुनाथसाहेब येतायेत.”

वरुणचे बाबा खाली आले तशी रेवती जागेवरून उठली आणि तिने त्यांना खाली वाकून नमस्कार केला. वरूणच्या बाबांचा रुबाबाच होता. त्यांनी रेवतीला आशीर्वाद दिला…. “औक्षवंत हो .” आणि त्यांनी रेवतीला बसायला सांगितलं. रेवती थोडी अवघडुनच बसली होती.

यदुनाथरावांनी प्रश्न विचारला …. “जॉब कुठे करतेस?”

यावर रेवतीने नम्रपणे उत्तर दिले …”मी हवाईसेविका म्हणून रुजू आहे.”

यावर यदुनाथराव खोचुनच म्हणाले , “तुला जेवढा पगार असेल त्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या नोकरांना देतो आणि लग्नानंतर आम्हाला सुनेनं नोकरी केलेलं चालणार नाही…”

“आणि हो आम्ही ऐकलं कि तू तुझ्या आईवडिलांची एकटीच आहेस…त्यांची उपजीविका व्हावी म्हणून तर तू वरुणशी लग्न करतेस ना….”

यदुनाथराव बोलतच होते….वरुणने त्यांना गप्प करायचा प्रयत्न पण केला पण त्यांच्यापुढे चालतेय कुणाची.

शेवटी न राहवून रेवतीनेही बोलायला सुरुवात केली.

“सर! आम्ही गरीब आहोत पण स्वाभिमानी आहोत…. तुम्हाला जर वाटत असेल तर मी वरुणच्या आयुष्यातून कायमची निघून जाईन.”

रेवती वरुणला , “खूप चांगला अपमान केलात तुम्ही माझा…ह्यासाठी घेऊन आलात का तुम्ही मला इथे..”

असं बोलून रेवती तिथून निघून गेली …. त्यानंतर रेवतीने ना वरुणचा फोन कधी उचलला आणि ना कधी त्याला ती भेटली. तिने आपली फ्लाईट देखील चेंज करून घेतली आणि शालू , मावशी सगळ्यांना खडसावून सांगितलं कि तीची ड्युटी कुठल्या फ्लाईट मध्ये आहे हे वरुणला कळता कामा नये. मावशीनेही तिला थोडा टाईम दिला आणि ढवळाढवळ करायचं टाळलं होतं.

५-६ महिने असेच गेले. एके दिवस अचानक हवाईसेविकेमध्ये जी सिनियर फ्लाइट अटेन्डन्ट असते तिला एक नोटीस आली कि ,” जहागीरदार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मधील काही प्रवास्यांची फर्स्ट क्लास मध्ये चांगली सोय करायची आहे.” आणि हि जबाबदारी मग रेवतीवरच पडली होती. रेवतीने समजून घेतलं कि हि कंपनी वरुणच्या बाबांची आहे. पण तिने झालं गेलं सगळं विसरुन सगळ्यांची छान सोय  केली होती.

फ्लाईट बोर्डिंग च्या वेळी वरुणच्या बाबानी रेवतीला पाहिलं पण दुर्लक्षच केलं. परंतु रेवतीने फ्लाईट मध्ये संपूर्णवेळ त्यांना आणि त्याच्या सहकार्यांना काही कमी पडू नाही दिलं. फ्लाईट डेस्टिनेशन ला पोहोचायला १ तास बाकी होता तोच पायलटची तब्येत बिघडली आणि तो बेशुद्ध पडला आणि योगायोगच म्हणा त्या दिवशी नेमकी सहकारी पायलट नव्हता. पायलटवर बेसिक प्रथमोचार करून पाहिला….तो शुद्धीवर तर आला पण विमान चालवायच्या अवस्थेत नव्हता. सगळं स्टाफ घाबरून गेला होता. रेवतीदेखील एका क्षणी गोंधळली पण दुसऱ्याच क्षणी ती जागेवर आली आणि ती पायलटच्या सीटवर बसली. हवाईसेविकांना देखील इमरजेंसी लँडिंगचं प्रशिक्षण दिल जातं. पायलट शुद्धीवरच होता. तो रेवतीला इन्स्ट्रक्शन्ज़ देत राहिला आणि रेवतीने सुखरूपपणे इमरजेंसी लँडिंग केली.

विमानातल्या प्रवाशांना काही कळेनाच काय झालं ते ….तेवढ्यात सिनियर फ्लाइट अटेन्डन्ट ने घोषणा केली आणि घडलेली हकीकत कथन केली आणि शेवटी रेवतीचं नाव घेऊन तिचं कौतुक केलं. सगळ्यांनी रेवतीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला.

वरुणच्या बाबांनाही त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी समोर येत फ्लाइट अटेन्डन्टला माईक देण्यास विनंती केली.

“हि रेवती म्हणजे आमची होणारी सून बरं का!!!!! आज पोरीने नाव काढलं..”

रेवती ऐकून आश्चर्यचकीत झाली आणि तिला काय होतंय कळेनाच.

वरुणचे बाबा रेवतीजवळ आले आणि त्यांनी सगळ्यांसमोर तिची माफी मागितली.

रेवती – “अहो बाबा मला नका हो लाजवू सर्वांसमोर….तुम्ही जे केलं ते वरुण च्या चांगल्यासाठीच केलं असेल”

असं म्हणून तिने त्यांना नमस्कार केला आणि थोड्याच दिवसात रेवती आणि वरुणचं सर्वांच्या साक्षीने थाटामाटामध्ये लग्न झालं .

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories