Ritbhatmarathi

Search
Close this search box.

रेवती एक सुंदर, सुशील आणि घरंदाज मुलगी. साधारण २०-२२ वर्षांची असेल. नुकत्याच एका नामांकित एअरलाईन कंपनी मध्ये हवाईसेविका म्हणून रुजू झाली होती. रेवती मनानेही सात्विक होती. तिच्या ह्याच स्वभावामुळे कुणीही तिच्याकडे आकर्षित होत असे. नोकरीनिमित्ताने रेवती मुंबईमध्ये आपल्या मावशीकडे राहत असे. रेवती एवढ्यावरच थांबली नव्हती. शिक्षणाकडे तिचा चांगलाच कल होता. रेवती बाहेरून पदवीचं शिक्षण देखील घेत होती. आई वडिलांची एकुलती एक असल्याने ती गावी आई वडिलांना देखील हातभार लावत असे.

हवाईसेविका असल्याकारणाने प्रवाशांची काळजी घेणं, त्यांना काय हवं नको ते पाहणं हे सर्व त्यात आलंच की, मग हळू हळू ती ऑफिस स्टाफ मध्येही आपल्या सहकाऱ्यांची लाडकी झाली होती. रेवतीची मुंबई ते दिल्ली अशी एकच फ्लाईट ठरलेली असायची. त्या फ्लाईटमध्येच वरुण नावाचा तरुण दर आठवड्याला मुंबई – दिल्ली अप-डाउन करायचा.

वरुण एक पंचविशीतला तरुण होता आणि तो एका नवकोटनारायणाचा मुलगा होता. नुकतेच त्याने आपलं अभियांत्रिकीचे शिक्षण संपवून तो वडिलांच्या व्यवसायात उतरला होता. पुढील शिक्षणासाठी परदेशात जायचा वरुणचा प्लॅन होता. वरुण श्रीमंत जरी असला तरी घरंदाज होता.

महिने… २ महिने गेले. वरुण नेहमी रेवतीचीच फ्लाईट पकडायचा. रेवती तिच्या फ्लॅटची सर्वात मोहक आणि सुंदर हवाईसेविका होती. एकदा वरुणला एअरपोर्ट वर पोहोचायला उशीर झाला आणि त्याची रेवतीवली फ्लाईट मिस्स झाली होती. त्याने लगेच ऑन द स्पॉट दुसरं तिकीट बुक केलं आणि तो दिल्लीच्या फ्लाईट मध्ये बसला. पण आज वरुणला काहीतरी मागे सोडत असल्याचा आभास होत होता. त्याला राहून राहून रेवतीच दिसत होती. रेवतीच्या फ्लाईट मध्ये मुंबई ते दिल्ली पर्यंतचा प्रवास कधी संपायचा त्याला कळायचं नाही. परंतु आज त्याला २-३ तासांचा प्रवास खूप मोठा आणि जड वाटत होता. दिल्लीला हॉटेल मध्ये पोहोचल्यावरही वरुणच्या नजरेतून आणि मनातून रेवतीचा चेहरा जात नव्हता. त्याला उमजून गेलं होतं कि त्याला रेवतीची सवय झाली होती. मुंबई ते दिल्लीचा प्रवास करता करता वरुणला रेवतीवर प्रेम जडलं होत.

मुंबईला परतताच वरुणने रेवतीबद्दल चौकशी चालू केली आणि चौकशीमध्ये त्याला त्याच्या शाळेतली मुलगी शालू भेटली जी रेवतीच्याच कंपनीमध्ये हवाईसेविका होती आणि रेवतीची जिगरी दोस्त पण!! वरुणने शालूकडून रेवतीचा फोन नंबर काढून घेतला होता. वरुणने रेवतीला मेसेज पाठवला….

वरुण – “हाय, रेवती”

रेवतीला वरुणचा  मेसेज डिलिव्हर झाला पण अज्ञात व्यक्तीकडून मेसेज आल्याने तिने दुर्लक्ष केलं. वरुणने रेवतीच्या रिप्लाय चा थोड्यावेळ वाट पहिली….बऱ्याच वेळ रेवतीचा रिप्लाय न आल्याने वरुणने पुन्हा एक मेसेज रेवतीला पाठवला.

वरुण – “हाय रेवती…हाऊ आर यू? तू मला ओळखत नाहीस पण मी तुला चांगला ओळखतो. मी दर सोमवारी तुझ्याच फ्लाईट मध्ये असतो. मला तुझा नंबर तुझी मैत्रीण आणि माझी शाळेतली मैत्रीण शालूकडून मिळाला आहे….रेवती माझी ह्या वेळेसची दिल्लीची फ्लाईट मिस्स झाली होती….म्हणून मी दुसरी फ्लाईट पकडली पण ह्यावेळी मनात काहीतरी अशांतता होती. मला राहून राहून तुझाच चेहरा समोर दिसत होता. तेव्हा मला जाणीव झाली कि मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो आहे. तुला माझी माहिती हवी असेल तर तू शालुकडून काढून घेऊ शकतेस. “

“आणि हो मला माहित आहे तू काही मला रिप्लाय देणार नाहीस आणि असं कायर सारखं फोनवर प्रपोज केलेलं कुठल्याही मुलीला आवडणार नाही पण मला सध्या एवढंच सुचलं….भेटू या ह्या सोमवारी फ्लाईट मध्ये ….मी निळ्या कलर चा शर्ट घातलेला असेल….बाय..”

ह्या पार्ट मध्ये एवढंच…. पुढे काय होतं…वरुण आणि रेवती फ्लाईट मध्ये भेटतील का? वरुणला बघून रेवतीची काय प्रतिकिया असेल? हे सर्व जाणून घेण्यासाठी पुढील भागाची वाट पाहावी लागेन….तोपर्यंत काळजी घ्या.

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories