Ritbhatmarathi

Search
Close this search box.

बँकेत खाते खोलण्याची सोपी प्रक्रिया

Bank account opening: बँका ह्या देशाच्या विखुरलेल्या आर्थिक परिस्थितीवरती लक्ष केंद्रित करतात.पैशाची देवाण-घेवाण ज्याठिकाणी केली जाते तिला बँक असं म्हंटल जातं  फार पूर्वी ज्यावेळी बँका अस्तित्वात नव्हत्या त्याकाळी सावकारकीची प्रथा अवलंबली जात असे. तसे म्हणायला गेले तर फार पूर्वी पैशासंदर्भात व्यवहार केले जात नसे म्हणजे साधे उदाहरण द्यायचे झाल्यास जुन्या काळात व्यापाऱ्यांनी प्रोटोटाइप बँक सुरु केली होती.

त्यावेळी लोकांमध्ये बार्टर सिस्टीम वापरली जात असे बार्टर सिस्टीम म्हणजे त्यावेळी लोक एका वस्तू किंवा सेवेसाठी दुसऱ्या वस्तू किंवा सेवेची देवाण-घेवाण करत असत ज्याला बार्टर सिस्टीम असे म्हंटले जाते. म्हणजेच एका गायींसाठी दहा बकऱ्यांची देवाण-घेवाण झाली म्हणजेच याठिकाणी चलन वापरली गेली नाही तर अशी यंत्रणा वापरली जात असे.

त्याचप्रमाणे इतर वस्तूंच्या मोबदल्यात लोक जमीन खरेदी-विक्रीसारखेही व्यवहार होत असे त्याकाळी म्हातारपणी लोक आपल्या शेळ्या देऊन जमिनीचा तुकडा बदलत त्याचप्रमाणे आपला कुठलाही प्राणी देऊन जमिनींचे व्यवहार होत असे. यालाच बार्टर सिस्टीम असे म्हंटले जाई. त्यानंतर सावकारकीची पद्धत सुरु झाली ज्यामध्ये कर्ज देणे आणि दिलेली रक्कम व्याजाच्या रूपात परत मिळवणे. सावकारालाच प्रतिशब्द म्हणजे धनको असा प्रचलित आहे. ज्यामध्ये कर्ज देणारा म्हणजेच तो सावकार असतो आणि कर्ज घेणाऱ्याला ऋणको असे म्हंटले जाते.बऱ्याच ग्रामीण भागात अजूनही सावकारकीची पद्धत प्रचलित आहे.

यामध्ये सावकार गरजेच्या वेळी कर्ज देतात.दिलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मुदतही देतात. कर्जावरील व्याज वेळेवर भरले न गेल्यास किंवा कर्जफेड वेळेवर न झाल्यास ऋणकोंवर किंवा कर्ज घेणाऱ्यांवर खटला दाखल केला जात नाही पण त्या व्याजाच्या बदल्यात तारण म्हणून ठेवलेली वस्तू आपल्या ताब्यात घेतात किंवा याहीपेक्षा अनिष्ट आणि घातक व्यवहार पद्धतींचा अवलंब केला जातो.

– व्याजाच्या रकमेची जास्त मागणी करणे

– कर्ज दिल्यानंतर ऋणको कडून म्हणजेच कर्जदाराकडून अनेक प्रकारच्या सेवा सुविधा विनामूल्य किंवा सक्तीने करून घेणे.

– कर्जदाराकडून कोऱ्या कागदावर अंगठा निशाणी किंवा सही करून घेणे.

– कर्जफेडीच्या हफ्त्याची रीतसर पावती न घेणे.

 सावकाराच्या अशा अनिष्ट पद्धतींवर निर्बंध घातले गेलेलं आहे. म्हणजेच सावकाराकडे सावकारकीच्या नोंदीचा परवाना असणं गरजेचं आहे. सरकारने काही अनिष्ट पद्धतीवर निर्बंध घातलेले आहे त्या पद्धती म्हणजे

– कर्जदाराला धाकदपटशाही करणे

– चक्रवाढ व्याज आकारणे म्हणजेच जास्त व्याजाची मागणी

पैशाची देवाण-घेवाण सुरळीत होण्यासाठी १९ व्या शतकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बऱ्याच बँका सुरु केल्या त्यामध्ये बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास या बँकांचा समावेश होतो या सर्व बँकांचे विलीनीकरण करून इंपिरिअल बँक बनवण्यात आली आहे. बँकांमुळे आपले व्यवहार चोख आणि सुरक्षित होऊ लागले. त्यामुळे आपली रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी ग्राहकांचा कल वाढू लागला आहे. तर याच बँकेमध्ये आपलं खातं कसं सुरु करावं याची आपण माहिती घेणार आहोत….

मूल जन्माला आलं की त्याची आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी आपण पालक नेहमी महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे बँकेमध्ये खात्याची तरदूद हि करावीच लागते म्हणजे खातं या शब्दाचा अर्थ असा होतो की ‘ खाण्याची तरतूद ‘ म्हणजेच संक्षिप्त भाषेत आपण याला खातं असं म्हणतो आता बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी काही अशा खास महत्वाच्या गोष्टी आहेत त्याची माहिती आपण घेऊयात.

२.१. खाते उघडण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे | Documents needed to open a bank account

– आपला पासपोर्ट आकाराचा फोटो

– आधार कार्ड

– पॅनकार्ड ( पर्मनंट अकाउंट नंबर )

– ड्रायविंग लायसन ( वाहन परवाना )

– वोटर आय डी कार्ड  ( मतदान कार्ड )

 – वीजबिल

 – टेलिफोन बिल

वरील सर्व बाबी या बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी गरजेच्या आहेत. त्यामुळे तुम्ही जर बँकेमध्ये आपले खाते उघडण्यासाठी जात आहात तर वरील सर्व कागदपत्रे घेऊन जाणे अनिवार्य आहे .

२.२. योग्य खात्याचा फॉर्म घ्यावा?

याठिकाणी योग्य खात्याचा फॉर्म घ्यावा असे इथे नमूद केलेलं आहे याच कारण असं कि खात्याचेही दोन प्रकार पडतात त्यामध्ये पुढील खात्यांचा समावेश असतो.

– बचत खाते (सेविंग अकाउंट)

– चालू खाते (करंट अकाउंट) 

वरील सर्व खात्यांची आपण सविस्तर माहिती पाहुयात-

* बचत खाते – बचत खाते हे एक अशा प्रकारचे खाते आहे की ज्या खात्यात पैसे जमा करून साठलेल्या पैशांचे आपल्याला व्याज मिळते.या खात्याचा फायदा असा आहे की आपल्या घरी जमा असलेले किंवा शिल्लक असलेले पैसे या खात्यामध्ये जमा करू शकता.

* चालू खाते – चालू खाते म्हणजे हे खास व्यापारी वर्गासाठी तयार केलेलं खातं आहे. ज्यामध्ये लाखोंचे व्यवहार केले जातात. या खात्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच व्याज मिळत नाही.

आता प्रत्यक्ष फॉर्म भरण्याआधी या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे म्हणून एकदा का कुठल्या प्रकारचे खाते उघडायचे आहे हे निश्चित झाले तरच आपण योग्य तो फॉर्म निवडावा.

२.३. फॉर्म कसा भरावा?

कुठल्याही बँकेमध्ये फॉर्म हा विनामूल्य असतो ज्याचं कुठलही मूल्य आकारलं जात नाही.तर खालील पद्धतीने फॉर्म भरावा

– तुमची वैयक्तिक माहिती भरावी.

– फॉर्म भरण्यासाठी निळ्या किंवा काळ्या  रंगाचा पेन वापरावा.

– फॉर्म मध्ये असलेली माहिती म्हणजेच तुमच्या वडिलांचे नाव, पत्ता,कायमचा पत्ता, जन्मतारीख,मोबाईल नंबर, खात्याचा प्रकार हि सगळी माहिती भरावी.

– फॉर्म भरल्यानंतर आपल्याला तीन ते चार वेळा स्वाक्षरी किंवा आपला अंगठा द्यावा लागतो

– यानंतर फॉर्मवरती आपला फोटो चिकटवून सगळी कागदपत्रे फॉर्म ला जोडावी.

– भरलेल्या प्रत्येक कागदावरती आवश्यक त्या ठिकाणी आपली स्वाक्षरी असणे गरजेचे आहे. सही करताना पॅनकार्ड वरील सही ज्यापद्धतीने केलेली आहे अगदी त्याच पद्धतीने बँकेचा खाते फॉर्म भरताना करावी.

– बँकेमधील कर्मचाऱ्यांकडून भरलेला फॉर्म तपासून घ्यावा आणि मगच सबमिट करावा

– जर एटीएम किंवा चेकबुक हवे असल्यास ते फॉर्ममध्ये गरजेच्या ठिकाणी टिक करावं.

– खाते उघडल्यानंतर १ ते दोन दिवसांमध्ये चेकबुक भेटलं जात

– सर्वात महत्वाचे बँकेमध्ये खाते उघडत असाल तर किमान रक्कम त्यात असली पाहिजे.

अशा पद्धतीने आपण आपली आर्थिक तरतूद करू शकतो.

– आपण जर नोकरदार असू तर आपला पगार रोख रकमेऐवजी थेट आपल्या बँकेतील खात्यात जमा होऊ शकेल

– आपल्याला जर रोख रकमेची गरज असल्यास आपण हवी असलेली रक्कम किंवा कॅश एटीएम च्या मदतीने काढू शकतो एटीएम कार्ड आपल्याला खाते उघडल्याबरोबर लागलीच मिळते.

– बँक खात्याच्या मदतीने आपण ऑनलाईन पेमेंटही करू शकतो.

– झालेल्या खर्चाची नोंद पासबुकद्वारे केली जाते जे आपल्याला वेळच्या वेळी एंट्री करणं गरजेचं असतं.

या पद्धतीने आपण आपला पैसा सुरक्षित ठेऊ शकतो आणि बँकेच्या वेगवेगळ्या सुविधांचा लाभही घेऊ शकतो.    

===============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

 

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *