Ritbhatmarathi

Search
Close this search box.

मित्रांनो गणपती म्हणजेच भगवान श्री गणेश हे सगळ्यांचे लाडके, बुध्दीदाता आणि विघ्नहर्ता आहेत. श्री गणेशाचे स्थान हे सगळ्या देवतांपेक्षा प्रथम क्रमांकावर आहे. म्हणजे कोणत्याही देवाची पूजा, अर्चना करण्याआधी आपण श्री गणेशाची पूजा करतो. कारण श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते. त्याला कारणही तसेच आहे मित्रांनो. गणपती या नावातच ते कारण लपलेले आहे. ‘गण‘ म्हणजे अष्टवसूंचा समूह. ‘वसु’ म्हणजे दिशा, दिकपाल, दिक देव म्हणून दिशांचा स्वामी आणि ‘पती’ तो गणपती. म्हणजेच सर्व दिशांचा स्वामी गणपती आहे. म्हणूनच इतर देवता त्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत. त्यामुळे कोणतेही मंगलकार्य किंवा इतर कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम गणपतीपूजन करतात. गणपतीने एकदा दिशा मोकळया केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करीत असतो, ती तिथे येऊ शकते. यालाच ‘महाद्वारपूजन’ किंवा ‘महागणपतीपूजन’ असे म्हणतात. याशिवाय ‘गण ‘ म्हणजे पवित्रके,जी अतिशय सूक्ष्मातिसूक्ष्म असतात म्हणून गणपती म्हणजे पवित्रकांचा स्वामी असेही म्हटले जाते. तसेच जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणाया ‘तिर्यक’व ‘विस्फुटीत लहरींचा समूह’ म्हणजे ‘गण’,त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा तो गणपती.

—————

याशिवाय गणपती विघ्न हरणारा आणि बुद्धी देणारा असल्यामुळे आपण सगळेच जमेल तशी त्याची सेवा, उपासना करतच असातो. तसंही आपल्या पुराणात श्री गणेशाची अनेक स्तोत्रे, श्लोक उपलब्ध आहेतच. त्यातील खूप महत्त्वाचे आणि फलदायी असलेले स्तोत्र म्हणजेच गणपती अथर्वशीर्ष.

अथर्वशीर्ष स्तोत्र म्हणजे नक्की काय ?? तर अथर्वशीर्ष स्तोत्र हे एक उपनिषद आहे. ते अथर्ववेदाशी संबंधित आहे. यामध्ये गणेशविद्या सांगितलेली आहे. अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिले आहे. थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते, असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय. यात प्रथम गणपतीच्या सगुणब्रह्माची उपासना सांगून शेवटी गणपती म्हणजेच परब्रह्म असे म्हटले आहे. गणपती हा तीन देहांच्या पलीकडचा असला, तरी “गं” हे त्याचे तांत्रिक शरीर आहे आणि तोच त्याचा महामंत्रही आहे. गणपती हा विश्वाचा आधार असून, तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे. व्रातपती, शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे. यानंतर याची फलश्रुती सांगितलेली आहे.

गणेश उपसाकामधे गणपती अथर्वशीर्षला महत्त्वाचे स्थान आहे. या उपनिषदाचे एक हजार वेळा पठन केल्याने जे हवे ते प्राप्त होईल, असे म्हटले आहे.

 • अथर्वशीर्ष पठण केल्याने सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले चंचल मन आणि बुद्धी स्थिर रहाते.
 • मनाची ताकद वाढते.
 • आत्मविश्वास वाढतो.
 • माणूस नम्र होतो.
 • संकटातून मार्ग निघायला मदत होते.
 • मन एकाग्र होते.
 • भूतकाळ आणि भविष्यात न अडकून पडता वर्तमानात जगायला शिकतो.
 • सगळी संकटे दूर होतात.
 • हवी ती इच्छा, मनोकामना पूर्ण होते.

अथर्वशीर्ष स्तोत्र पाठ करत असताना नियम आणि अटी पाळणे खूपच आवश्यक आहे. योग्य गोष्टींची काळजी घेऊन पाठ केले तर श्री गणेश लवकर प्रसन्न होऊन इच्छा पूर्ण करतात.

 • अथर्वशीर्ष म्हणण्यापूर्वी स्नान करून सुचीर्भुत व्हावे.
 • अथर्वशीर्ष पाठ करताना धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा.
 • अथर्वशीर्षाचा पाठ म्हणताना मांडी पलटावी लागू नये, याची काळजी घ्यावी. म्हणजेच एकदा घेतलेली आसन स्थिती बदलू नये.
 • दक्षिण दिशेखेरीज अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.
 • अथर्वशीर्ष पाठ म्हणण्यापूर्वी वडिलधार्‍यांना तसेच गुरुंना नमस्कार करावा.
 • अथर्वशीर्ष पठण करण्यापूर्वी गणपतीची पूजा करून त्याला अक्षता, दूर्वा आणि तांबडे फूल व्हावे.
 • पूजा करणे शक्य नसल्यास गणपतीचे मनोभावे ध्यान करावे, नमस्कार करावा.
 • उच्चार अगदी स्पष्ट असावेत
  अथर्वशीर्ष अगदी संथपणे एका गतीत म्हणावे.
 • अथर्वशीर्ष पठण भावपूर्वक म्हणावे म्हणजे त्याचा अर्थ समजून वाचन केले पाहिजे.
 • जेव्हा एकापेक्षा अधिक वेळा हे अथर्वशीर्ष म्हणावयाचे असेल, तेव्हा ‘वरदमूर्तये नमः ।’ येथेपर्यंतच म्हणावे. त्यापुढे फलश्रुती देण्यात आली असून, ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी.
 • अथर्वशीर्षाच्या आधी देण्यात आलेला शांतीमंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदाच म्हणावा.
 • अथर्वशीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय.

सुख, समृद्धी, सफलता, भरभराट मिळवण्यासाठी श्रीसूक्त स्तोत्राचे रोज पठण करा – श्रीसूक्त स्तोत्र मराठी अर्थासहित

रामरक्षा स्तोत्र पठण फायदे आणि प्रचिती

लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री सुक्ताबरोबरच लक्ष्मी सूक्त ह्या स्तोत्राचेही पठण करा. श्री लक्ष्मी सूक्त पठण

जाणून घ्या तुळशीचे आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व आणि फायदे

श्रीमहागणपत्यथर्वशीर्षम् ॥ श्री गणेशाय नमः ॥
ॐ नमस्ते गणपतये ॥
त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि
त्वमेव केवलं कर्ताऽसि
त्वमेव केवलं धर्ताऽसि
त्वमेव केवलं हर्ताऽसि
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि
त्व साक्षादात्माऽसि नित्यम्।।1।।

ऋतं वच्मि। सत्यं वच्मि।।2।।
अव त्व मां। अव वक्तारं।
अव धातारं। अवानूचानमव शिष्यं।
अव पश्चातात। अव पुरस्तात।
अवोत्तरात्तात। अव दक्षिणात्तात्।
अवचोर्ध्वात्तात्।। अवाधरात्तात्।।
सर्वतो माँ पाहि-पाहि समंतात्।।3।।

त्वं वाङ्‍मयस्त्वं चिन्मय:।
त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:।
त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽषि।
त्वं प्रत्यक्षं ब्रह्माषि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽषि।।4।।

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते।
सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति।
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति।
सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति।
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ:।
त्वं चत्वारिकाकूपदानि।।5।।

त्वं गुणत्रयातीत: त्वमवस्थात्रयातीत:।
त्वं देहत्रयातीत:। त्वं कालत्रयातीत:।
त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं।
त्वं शक्तित्रयात्मक:।
त्वां योगिनो ध्यायंति नित्यं।
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं
रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं
वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं
ब्रह्मभूर्भुव:स्वरोम्।।6।।

गणादि पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरं।
अनुस्वार: परतर:। अर्धेन्दुलसितं।
तारेण ऋद्धं। एतत्तव मनुस्वरूपं।
गकार: पूर्वरूपं। अकारो मध्यमरूपं।
अनुस्वारश्चान्त्यरूपं। बिन्दुरूत्तररूपं।
नाद: संधानं। सँ हितासंधि:
सैषा गणेश विद्या। गणकऋषि:
निचृद्गायत्रीच्छंद:। गणपतिर्देवता।
ॐ गं गणपतये नम:।।7।।

एकदंताय विद्‍महे।
वक्रतुण्डाय धीमहि।
तन्नो दंती प्रचोदयात।।8।।

एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्।
रदं च वरदं हस्तैर्विभ्राणं मूषकध्वजम्।
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्।
रक्तगंधाऽनुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपुजितम्।।
भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम्।
आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृ‍ते पुरुषात्परम्।
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर:।।9।।

नमो व्रातपतये। नमो गणपतये।
नम: प्रमथपतये।
नमस्तेऽस्तु लंबोदरायैकदंताय।
विघ्ननाशिने शिवसुताय।
श्रीवरदमूर्तये नमो नम:।।10।।

एतदथर्वशीर्ष योऽधीते।
स ब्रह्मभूयाय कल्पते।
स सर्व विघ्नैर्नबाध्यते।
स सर्वत: सुखमेधते।
स पञ्चमहापापात्प्रमुच्यते।।11।।

सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति।
प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति।
सायंप्रात: प्रयुंजानोऽपापो भवति।
सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति।
धर्मार्थकाममोक्षं च विंदति।।12।।

इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम्।
यो यदि मोहाद्‍दास्यति स पापीयान् भवति।
सहस्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत्।13।।

अनेन गणपतिमभिषिंचति
स वाग्मी भवति
चतुर्थ्यामनश्र्नन जपति
स विद्यावान भवति।
इत्यथर्वणवाक्यं।
ब्रह्माद्यावरणं विद्यात्
न बिभेति कदाचनेति।।14।।

यो दूर्वांकुरैंर्यजति
स वैश्रवणोपमो भवति।
यो लाजैर्यजति स यशोवान भवति
स मेधावान भवति।
यो मोदकसहस्रेण यजति
स वाञ्छित फलमवाप्रोति।
य: साज्यसमिद्भिर्यजति
स सर्वं लभते स सर्वं लभते।।15।।

अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा
सूर्यवर्चस्वी भवति।
सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ
वा जप्त्वा सिद्धमंत्रों भवति।
महाविघ्नात्प्रमुच्यते।
महादोषात्प्रमुच्यते।
महापापात् प्रमुच्यते।
स सर्वविद्भवति से सर्वविद्भवति।
य एवं वेद इत्युपनिषद्‍।।16।।

तर असे हे लाभदायी अथर्वशीर्ष पठण करून नक्की अनुभव घ्या.

==========================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *