Ritbhatmarathi

Search
Close this search box.

ashadi ekadashi in marathi :

आषाढ महिन्यातील  [जून/जुलै] शुक्ल किंवा शुद्ध पक्षातील अकरावी तिथी ही प्रथमा एकादशी किंवा महाएकादशी त्याचप्रमाणे देवशयनी एकादशी म्हणून ओळखले जाते या दिवसापासूनच चातुर्मास म्हणजेच चार महिन्यांचा काळ सुरु होतो तो काळ कार्तिकी एकादशीला संपतो त्याच कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात…

आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू हे आपल्या शेषनागावर योगनिद्रेत जातात आणि कार्तिकी एकादशीला म्हणजेच जिला आपण प्रबोधिनी एकादशी म्हणतो त्या दिवशी योगनिद्रेमधून जागे होतात. या दिवसात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असतो.

विठोबा हा देव पुंडलिकाच्या भेटीला आला आणि तोच पुंडलिक हा वारकरी संतांचा कैवारी समजला जातो त्याचा अवतार हा गयासूर नावाच्या अधर्म संस्थापक,भ्रष्ट राक्षसाचा समूळ नाश करण्यासाठी द्वापार युगात आला होता त्याचवेळी गयासुराने हिंदू धर्माचा नाश करण्यासाठी देव गणांना तसेच गो-ब्राह्मण हत्येचे कांड अखंड सत्र चालवले होते यास्तव जगत्पित्याच्या आज्ञेने श्रीहरीने बौद्ध नाव अवतार घेऊन गयासुराला अग्निकुंडात जाळून भस्म केले नंतर त्याचा पराभव करून कुंडलिक मुनीस भेटून सुस्वरूप दाखवले आणि माता-पित्याची सेवा केल्याचे फळ म्हणून मोक्षास प्राप्त केले.

आषाढी एकादशीची आणखी एक कथा पुराणात सांगण्यात आली आहे कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून भगवान शंकराकडून अमरपद मिळवले ‘ तू कुणाकडूनही मरणार नाहीस परंतु एका स्त्रीच्या हातून मरशील ‘ असा वर दिला म्हणून ब्रह्मा,विष्णू,महेश अशा देवांना अजिंक्य झाला याच वेळी सर्व देव भगवान शंकराकडे मदतीसाठी धावले त्याच्या भयाने सर्व देव चित्रकूट पर्वतावर [धात्री] आवळी वृक्षातळी एका गुहेत दडून बसले.

त्या दिवशी सर्व देवाना उपवास करावा लागला तो दिवस आषाढी एकादशीचा होता त्या सर्व देवतांना पावसात स्नान घडले, अचानक त्या सर्वांच्या एकवटलेल्या श्वासामधून एक शक्ती उत्पन्न झाली त्या शक्तीने मृदुमान्य राक्षसास ठार करून देवांची मुक्तता केली ही जी दैवी शक्ती आहे तीच आषाढी एकादशी देवता आहे या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते सगळेच शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात.

मनुष्याचे एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची एक रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो.आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरु होते म्हणजेच देवांची रात्र सुरु होते म्हणूनच आषाढी एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात.

जाणून घ्या हरिद्वारमध्ये गंगा स्नानास अनन्य साधारण महत्व का आहे?

महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर माहिती व इतिहास

वारी ही परंपरा ही एकादशीशीच संबंधित आहे…वारी परंपरा ही आठशे वर्षांपेक्षा जुनी आहे महाराष्ट्रातील विविध भागांमधून अगदी कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठलनामाचा गजर करत सगळे जण धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपतात.आळंदीमधून संत ज्ञानेश्वरांच्या पादुका आणि देहूमधून संत तुकारामांच्या पादुका पालखीत घेऊन मार्गस्थ होतात….या वारीमध्ये श्रीमंत-गरीब असा भेद नसतो,वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात भगवान विष्णूचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे हे वारकरी भक्त असतात…

आपले कर्तव्य कर्म हे निष्ठेने ते वैष्णव करत असतात म्हणून गळ्यात तुळशीच्या माळा परिधान करतात…खर तर आपल्या भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीच्या माळा घालतात…स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावून हरिपाठ करतात…संतांचे चरित्र वाचतात…सात्विक आहार,सत्वचरंन करावे,परोपकार आणि परमार्थही करावा…वारी परंपरा समाजातल्या विविध स्तरांमधून केली जाते..

वारीमध्ये कसलाही भेदभाव नसतो…एकूण समाजप्रबोधनाचे कामही वारीमार्फत होते…

वर्णअभिमान विसरली या ती एकएका लोटांगणी जाती…

निर्मळ चित्ते झाली नवनीते,पाषाणा पाझर फुटती रे..

या संत तुकारामांच्या अभंगांमधून वारीची महती कळते वारीमध्ये काळा-गोरा,उच-नीच असा भेदभाव नसतो…वारीमध्ये कितीही गर्विष्ठ माणूस जरी आला तरीही त्याचा ताठा,अहंकार लगेच गळून पडतो… याच पालखीचे अथवा वारीचे दोन वैशिष्ट्य ही प्रामुख्याने असतात…पहिले म्हणजे गोल रिंगण आणि दुसरं म्हणजे धावा दोन्हीचीही

कडूस फाटा,वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते..रिंगण ही एक अविस्मरणीय आणि श्रद्धेय अशी कल्पना आहे…या मध्ये सगळे वारकरी एकमेकांचे हात…हातात घेऊन गोलाकार उभे राहतात..यातील मोकळ्या जागेतून घोडा धावतो…यालाच ‘माउलींचा अश्व’ असे म्हणतात या अश्वावर माउली आरूढ आहेत अशी धारणा सर्वांची असते म्हणूनच रिंगणाचेही एक असे वैशिष्ट्य असते.

धावा म्हणजे धावणे…असे मानले जाते की पंढरपूरला पायी जात असताना वेळापूर इथून संत तुकाराम महाराजांना एका छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाचा कळस दिसला म्हणून आपल्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वेळापूरपासून ते पंढरपूरपयंत ते धावत गेले म्हणून याची आठवण म्हणून आजही कित्येक भाविक वेळापूरपासून ते पंढरपूरपर्यंत धावत जातात.

वारकरी संतांनी कधीही राजाश्रयाची आस धरली नाही शिवाजी महाराजांचे आमंत्रण येताच ‘ दिवट्या छत्री घोडे I हे तोबऱ्यात न पदे आणि राजगृहात यावे मानाचे आसे I तेथे काय वसे समाधान अशी प्रतिक्रिया संत तुकारामांनी आपल्या अभंगांमधून दिली. सामान्य माणूस नेहमी या पंथाचा आधार राहिला.प्रत्येक वारकरी हा कामे करूनच उदरनिर्वाह करत आहे म्हणून भिक्षावृत्तीला या पंथात थारा नाही. अंधश्रद्धेलाही या पंथामध्ये थारा नाही म्हणून वारकरी पंथ हा अजूनही श्रेष्ठ समजला जातो.

===============

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *