Ritbhatmarathi

Search
Close this search box.

पूढे आदित्य आणि कृत्तिका गुलमर्ग ला भेट देण्यास गेले. ते एक सुंदर लँडस्केप आहे जे पांढरा शुभ्र बर्फाने माखलेल्या उंच पर्वत शिखरांनी वेधले आहे. तिथे आदित्य आणि कृत्तिका ल हिवाळी खेळातील एक खेळ स्केटिंग हा बघायला भेटला. तिथे अनेक उत्कृष्ठ पद्धतीने लोक आपल्या स्केटिंग मधील कलाबजी दाखवत होते.

त्या दोघांनी अनेक सुंदर ठिकाणे, बर्फाने झाकलेले पर्वत, दाल लेक , इत्यादी हे ठिकाणे पाहिले. आणि त्यांनी अनेक फोटो ही काढले. त्या सुंदर दिवसांची आठवण म्हणून आदित्यने तिथे काही सुंदर ठिकाणांचे फ्रेम घेतली. ते फोटो त्यांना काश्मीर मधील सुंदर दृश्य आणि तिथे त्यांनी सोबत घालवलेल्या गोंडस क्षणाची आठवण करून देईल.

तिथे त्या दोघांनी थोडी खरेदी केली. कृत्तिका ने तिथे मध, केशर आणि काही फळ घेतली. आदित्यने काही शाल खरेदी केल्या. काश्मीर मध्ये इतके सुंदर दिवस घालवल्या नंतर ते दोघेही दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये जाण्यासाठी निघाले.

आदित्य आणि कृत्तिका मुंबई मध्ये पोहोचतच ते थेट आपल्या घरी गेले. ते दोघे आपले सामान हातात पकडुन दरवाजा बाहेर उभे होते आणि मिसेस सुजाता त्यांची नजर काढत होत्या.

मिसेस सुजाता आपल्या मुलाचा सुखी संसार पाहून आनंदी होत्या. आपण आपल्या मुलासाठी योग्य जोडीदार निवडला आहे हा विचार करून त्यांना बर वाटत होत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

आदित्य आणि कृत्तिका आपल्या रूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन, आणि आपले कपडे बदलून खाली गेले. तिथे मिसेस सुजाता यांनी त्यांच्या साठी नाश्ता त्यात करून ठेवला होता.

” कस झालं मग हनिमून ?” मिसेस सुजाता यांनी विचारले.

” मस्त ” आदित्य उपमाचा एक घास घेत म्हणाला.

” कस होत मग काश्मीर?”

” आई खूप सुंदर होत. तिथे सगळी कडे बर्फ होता. आणि खूप सारी थंडी होती. तिथे फिरायला खरच खूप मजा आली. आपण ना नेक्स्ट टाईम सगळे जाऊ. ” कृत्तिका मिसेस सुजाता यांना आपला गोंडस चेहरा करून त्यांना म्हणाली.

” हो नक्की जाऊ …मला तर तुझ हे सगळ ऐकून च तिथे जायची इच्छा होत आहे. ” मिसेस सुजाता ही काश्मीर ला जाण्यासाठी आता उत्सुक होत्या.

” आई आम्ही तिथून मध, केशर आणि शाल अनल्या आहेत. आणि ते खूप छान आहेत. तिथे स्केटिंग पण पहिली आम्ही, मला पण करायची होती पण मला स्केटिंग येत नाही.” कृत्तिका आपल्या चेहऱ्यावर दुःखी असल्याचा भाव आणत म्हणाली.

” वाव ….” मिसेस सुजाता त्या सर्व वस्तू पाहत त्यांनी खूप प्रशंसा केली.

” आई बाबा कुठे आहेत ? ” आदित्यने चहाचा घोट घेत म्हणाला.

” अरे ते मीटिंग आहेत त्यांना महत्वाच्या म्हणून ते लवकर ऑफीस ला गेले आहेत. ” मिसेस सुजाता त्यांना समजावून सांगत म्हणाल्या.

” काश्मीर ट्रीप सगळ्यात सुंदर होती. ” कृत्तिका आपले मन व्यक्त करत होती.

” बरं मग आता तुम्हाला पुण्यात शिफ्ट व्हायचं आहे त्याचं काय?” मिसेस सुजाता यांनी त्या दोघांचं लक्ष वेधून घेतले.

” अरे हा कृत्तिका आपल्याला पुण्यात शिफ्ट व्हायचं आहे ना ….तर आज आपण आराम करू उद्या तू तुझ्या कंपनी मधे जाऊन ट्रान्स्फर बद्दल बोलायची गरज नाहीये . मी तुझ्या मॅनेजर सोबत या विषयी आधीच बोललो आहे तर आता काही प्रॉब्लेम होणार नाही. ”
आदित्य कृत्तिका ला म्हणाला.

” ओके, आणि मग पॅकींग च काय????” कृत्तिका चे डोकं मात्र फक्त पॅकींग मधेच होते.

” मी तुमचं सामान आधीच त्या अपार्टमेंट मध्ये शिफ्ट करून दिले आहे. आणि बाकी लागणाऱ्या गोष्टीच सामान सुध्दा तिथे आधीच पोहचून गेलं आहे. ” मिसेस सुजाता कृत्तिका ला म्हणाल्या.

कृत्तिका चा चेहरा मात्र थोडा गोंधळलेला वाटत होता हे बघून ” आपल अपार्टेंमेंट आधीच फिक्स करून आहे कृत्तिका सगळ्या गोष्टी ची तयारी मी आधीच करून करून ठेवली आहे. ” अस आदित्य म्हणाला.

” ओह ….छान ” कृत्तिका ला हे जाणून आनंद झाला होता.

नाश्ता झाल्या नंतर ते दोघेही आपली रूम मध्ये गेले. दोघेही प्रवासाने खूप थकले होते म्हणून दोघे ही गरम ब्लँकेट मध्ये शिरून झोपी गेले.

जेव्हा कृत्तिका चे डोळे उघडले गेले तेव्हा संध्याकाळ होऊन गेली होती. तिने आपल्या बाजूला पहिले तर आदित्य अजून हि झोपलेला होता. त्याचा चेहरा कृत्तिका न्याहाळत होती. आदित्यच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं विलक्षण तेज होत. कृत्तिका आपल्या विचारांच्या दुनियेत हरवून गेली.

पण काही क्षणातच ती बाहेर आली आणि हळूच उठून ती बाथरूम मध्ये गेले. तिने पटकन अंघोळ करून काही मऊ कपडे घालून ती बाहेर आली. ती रूम मधे येताच तिने आदित्य ला उठलेलं पाहिलं.

आदित्य बेड वर लोळून मोबाइलवर काहीतरी पाहत होता. त्याच्या शेजारी जाऊन कृत्तिका बसली ” उठ ना आदित्य …जाऊन फ्रेश हो “

” हो पाच मिनिट” अस म्हणत आदित्यने पुन्हा त्याच डोकं मोबाईल मधे घातलं.

कृत्तिका ने त्याच्या हातातून मोबाइल हिसकावून घेतला
” जाऊन आवर ” अस ती थोड्या कडक आवाजात म्हणाली.

आदित्यने एक उसासा टाकत तो हळू हळू बाथरूम मध्ये गेला.

कृत्तिका मिसेस सुजाता यांना रात्रीच्या जेवण बनवण्यास मदत करायला गेली. तिथे सासुसूनेने मस्त गप्पा करत रात्रीचे जेवण तयार केले.

रात्रीचे जेवण पाटील परिवार यांनी छान गप्पा करत केले. सर्वांसोबत हसत खेळत वेळ कसा निघून जातो हेच उमजत नाही.

रात्री कृत्तिका ने आपल्या आई बाबा यांच्याशी कॉल वर गप्पा केल्या.

” मम्मी काश्मीर खूप खूप छान आहे आपण जाऊ तिकडे एक फॅमिली ट्रीप करून…”

” हो नक्की जाऊ, बर तुम्ही कधी निघणार आहे पुण्यासाठी ????”

” आम्ही उद्या निघणार आहोत मम्मी “

” सावकाश जा बाळा आणि नीट काळजी घ्या. आम्ही येऊ तिकडे भेट देण्यासाठी “

” हो प्लीज ..मला तुमची खूप आठवण येते ” कृत्तिका चे डोळे पाणावले होते.

” आम्हाला पण तुझी खूप आठवण येते किट्टु ” मिसेस निता यांचा ही आवाज रडवल्या सारखा झाला होता.

दुसऱ्या दिवशी आदित्य आणि कृत्तिका तयार होऊन सगळ्यां सोबत नाश्ता करण्यासाठी गेले. काही वेळात ते दोघे आपल्या बॅग घेऊन कार मध्ये बसण्यासाठी तयार होते.

” तुम्ही दोघं नीट काळजी घ्या ” मिसेस सुजाता यांना अश्रू भरून आले होते.

” हो तुम्ही पण आई ” कृत्तिका ही भावूक झाली होती.

” आई निवांत रहा. सगळ नीट होईल तू पण काळजी घे ” आदित्य मिसेस सुजाता यांना मिठी मारत म्हणाला.

कृत्तिका त्यांना काश्मीरचं अतिशय सुरेख पणे वर्णन करून सांगत होती. कृत्तिका सोबत बोलताना मिसेस निता फार आनंदित होत्या.

कृत्तिका आणि आदित्य कार मध्ये विराजमान झाले आणि काही वेळात ते एअपोर्टवर पोहोचले. त्या दोघांनी आपले सामान चेक करून घेऊन ते बुक केलेल्या प्लेन मध्ये जाऊन बसले. काही मिनिटात ते प्लेन उडान घेण्यासाठी सज्ज होत. त्याने भरारी घेताच कृत्तिका आणि आदित्य यांचा एक नवीन प्रवासाची सुरुवात झाली होती.

कृत्तिका आणि आदित्य पुण्यात पोहोचतच त्यांना एक कॅब करून थेट आपल्या अपार्टमेंट मध्ये गेले.

घरामध्ये पाऊल टाकताच कृत्तिका सगळीकडे आपली नजर फिरवून पाहत होती. आपल्या नवीन घराचे प्रत्येक कानेकोपरे तिने आपल्या चाणाक्ष नजरेतून टिपले. ते घर आकर्षक रंगांनी सजवले होते.

” कस आहे मग ??” आदित्यने कृत्तिकाकडे येत विचारले.

” खूप छान आहे “

” तो चलो फिर सब कुछ अनपॅक करना है ” अस आदित्य तिला गोल फिरवत म्हणाला.

©RoyamCharm

क्रमश: