Ritbhatmarathi

Search
Close this search box.

लग्नाचा सोहळा संपन्न झाल्या नंतर आपल्या लाडक्या राजकुमारीची ” बिदाई ” पाटील परिवाराने आपले अश्रू तरळत केले. या काळजाला भिडणारा तो भावूक क्षण सर्वजण आपले मोत्यासारखे अश्रू गाळत त्यांनी आपल्या लेकीला सासरी जाण्यासाठी शुभेच्छंचा वर्षाव केला.

कृत्तिका आपले रडू सांभाळत आपल्या आईच्या पदरात शिरून रडत होती. मिसेस निता यांना आपले रडू आवरणे कठीण झाले होते. लहापणापासूनच तळहाताच्या फोडा प्रमाणे जपलेल्या लेकीला आज त्यांच्या पासून दूर होऊन आपले नविन आयुष्याची सुरुवात नव्याने करायची होती.

मिसेस निता ” बाळा तू आपली काळजी घे नीट. तुझ्या सासरच्या लोकाना त्रास नाही देऊ …..तुला काही गरज वाटली तर मला लगेच सांग. ” असे त्या आपल्या लाडक्या लेकीच्या चेहऱ्यावरून आपला मायेच्या हळव्या मनाची समजूत घालत तिला जीव ओतून सांगत होत्या.

” हो आई मी घेईल माझी काळजी, पण तू ही तुझी काळाजी घे, अता मी नाहीये घरी तुझ्यासोबत चहा घेत गपागोष्टी करायला. ” असे कृत्तिका आपले अश्रू तरळत म्हणाली. दोघी मायलेकी मनभरून रडल्या. हे बघून सगळ्यांची मने भरून आली.

सगळ्यांची मने स्थिर झाल्यावर कृत्तिका कार मध्ये बसली. तिच्या बाजूला आदित्य ही होता.

” सगळ नीट होईल, तू काळजी नको करू, शांत हो ” असा आदित्य हुंदके देणाऱ्या कृत्तिका ला सावरण्यासाठी म्हणाला.

कृत्रिकाने आपली मान होकारार्थी उत्तर देत हलवली. तिला आदित्य सोबत असल्याचा आनंद वाटत होता. तो ज्याप्रकारे तिला समजून घेत होता ते कृत्तिका ला आपलस वाटत होत.

काही वेळाने ते आता आदित्य च्या सुंदर बंगल्या जवळ येऊन पोहोचले होते. तिथे जाताच काही क्षणात कृतिकाने गृहप्रवेश केला आणि बाकी परंपरेनुसार काही विधी केल्या.

कृत्तिका मात्र खूप थकलेली होती. रडल्यामुळे तिचा चेहरा पार सुकून गेला होता. ती आणि आदित्य त्यांच्या रूम मध्ये गेले. कृतीकाने ही खोली आधी ही पहिली होती म्हणून तिला ते पाहून खी आश्र्चर्य वाटले नाही. तिने आपली बॅग खुर्ची वर ठेवून आपल्या कपडे काढण्यास सुरुवात केली. काही आरामदायक कपडे भेटताच ती बाथरूम मध्ये जाऊन आपले कपडे बदलून आली. आपले मोल्यावान दागिने काढून तिने नीट एका बॉक्स मध्ये ठेवून देली. आदित्य ही आपले कपडे बदलून आला होता.

कृतीचा चा तो कोमेजलेल्या चेहरा बघून त्याला थोड वाईट वाटलं. ” तू झोप बेड वर मी सोफ्यावर झोपतो. ” असे म्हणत आदित्यने सोफ्यावर लोळून घेतला. ” प्लीज रिल्याक्स ….आराम कर अरा नीट. थकली किती आहे तू. ” असे म्हणत त्याने कृत्तिका ला झोपल्यासाठी खुणावले.

कृत्तिका मात्र मनातून खुश होती. तिला समजून घेणारा साथीदार तिला भेटला आहे अस तिला वाटू लागलं. ती पण बेड वर आडवी झाली आणि काही वेळात ती गाढ झोपी गेली.

कृत्तिका चे डोळे सकाळच्या गजराने उघडल्या गेले. कृत्तिका नेहमी प्रमाणे बंद करून परत आपल्या स्वप्ननगरी मध्ये परत जाणार तोच ‘ आपण आता आपल्या घरी नाही आहोत याची जाणीव तिला झाली. ‘ ती लगेच उठून बसली तेव्हा गाढ झोपेत असलेला आदित्य तिच्या नजरेस आला. त्याचा निरागस चेहरा पाहून तिच्या ओठांवर नकळत स्मितहास्य झळकले.

ती हळूच उठून बाथरूम मध्ये गेली, ब्रश आणि अंघोळ करून ती रूम मध्ये आली. तिने नेसण्यासाठी एक गुलाबी रंगाची सुंदर साडी निवडली. साडी नेसून झाल्यावर तिने थोडा मेकप करून किचन मध्ये गेली. तिने सर्वांसाठी नाश्ता तयार केला. तेवढ्या मिसेस सुजाता आपल्या सुनेने केल्या कामाची प्रशंसा करीत त्यांनी आपल्या नवऱ्याला व स्वतःसाठी नाश्ता वाढून घेतला. त्यांच्या सोबत कृत्तिका ही बसून गेली. काही वेळाने आदित्य खाली आला. त्याने ही त्यांच्यासोबत नाश्ता करत गप्पागोष्टी सुरू केल्या. मध्ये मध्ये ती सगळ्यांची नजर चुकवत कृतिकाचा निरागस चेहरा आपल्या डोळ्यात टिपत होता. दिवसभर गप्पागोष्टी मध्ये कसा गेला हे कृत्तिका ल उमजले नाही.

कालची दगदग मुळे तिला आजही थकल्या सारखे वाटत होते. आपल्या रूम मधे येताच ती बेड वर लोळून घेतल. तिचा कधी डोळा लागून गेला हे तिला सुध्धा समजले नाही.

तिला काही वेळाने जाग आली, तिने आपला मोबाईल जवळ घेत त्यात टाईम पहिला. सकाळचे 6 वाजून गेले होते. तिला अस वाटल की तिने तिचे डोळे fkt काही मिनिट मिटले आणि सकाळ झाली. आदित्य ही मस्त सोफ्यावर झोपून होता.

ती सकाळची सगळी कामं अवरून आपल्या सासू सोबत बसली होती. आजही ती मंडळी आपली बैठक मांडून बसली होती. त्यात संध्याकाळ कधी झाली हे कृत्तिका
ला समजले नाही.

” कृत्तिका चाल थोड आवर आपण बाहेर जाणार आहोत ” अस आदित्य तिला म्हणाला.

” कुठे बाहेर ???”

” सरप्राइज आहे ते” अस गूढ हास्य करत आदित्य म्हणाला.

कृत्तिका आपले कपडे बदलून थोडा मेकप करून बाहेर आली. आदित्य त्याची कार ची चावी घेऊन तयारच होता.

काही वेळात ते दोघे सिनेमा हॉल बाहेर उभे होते. त्या दोघांनी एक सुंदर हिंदी चित्रपट पाहिला. आणि त्यानंतर ते दोघेही एका आलिशान हॉटेलात जेवणासाठी गेले.

त्या दोघांनी हा वेळ खूप सुंदररित्या घालवला. कृत्तिका मात्र आता हळू हळू सासरी आणि आदित्यच्या मनात घर करू पाहत होती.

आदित्य ही कृत्तिका सोबत आपला वेळ अतिशय सुरेख पद्धतीने घालवत होता. तो तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत तिला आपल्या आयुष्यात सामील करत होता.

ते दोघं हासत गप्पा करत जेवत होते. आदित्य आपली नजर कृत्तिका क्या नाजूक गुलाबी चेहरा न्याहाळून पाहत होता. त्याचा मोबाइलवर आलेला एक मॅसेज पाहून त्याच्या ओठांवर असलेलं ते मोहक हास्य विरघळून गेलं. आपला चेहरा गंभीर करत त्याने ती मॅसेज पाहून डिलिट केला. आणि पुन्हा एकदा आपल्या चेहऱ्यावर हास्याचा मुखवटा घालून त्याने कृत्तिका कडे पाहिलं. ती मात्र लहान मुलांना सारखी जीव लावून खात होती. तीच ते गोंडस वागणं बघुन त्याला गालातल्या गालात हसू आलं.

क्रमश: