Ritbhatmarathi

Search
Close this search box.

भाग १० चा सारांश थोडक्यात:

त्या मऊ बेड वर लोळून घेताच आणि गरम ब्लँकेट मधे शिरताच तिला झोप लागून गेली. आदित्य जेव्हा आपला कॉल संपवून रूम मध्ये आला तेव्हा त्याने कृत्तिका ला शांतपणे झोपलेल पाहिलं.

तीच ते निरागस चेहरा पाहून त्याच्या ओठांवर स्मित झळकले आणि तो ही तिच्या बाजूला जाऊन ब्लँकेट मध्ये शिरून त्याने कृत्तिका ला आपल्या मिठीत घेऊन तोही झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी ते दोघे ही लवकर उठले. दोघे ही लवकर तयार होऊन त्यांनी सोबत नाश्ता केला. कृत्तिका ने दोघांचे टिफीन तयार केले होते. निघताना तिने दोघांच्या बॅग मध्ये टाकले. आणि सगळ नीट आवरल्या नंतर ते दोघेही आपापल्या कामासाठी घराबाहेर पडले.

आदित्यने कृत्तिका ला तिच्या नवीन कामाच्या ठिकाणी सोडले आणि तो पुढे आपल्या कंपनी कडे निघाला.

भाग ११ :

©RoyamCharm

कृत्तिका आता एका आलिशान इमारती समोर उभी होती. ती इमारत आकर्षक रंगाने रंगवली होती, तिचे डोळे मिचकवत ती आत मध्ये गेली. नवीन कंपनीचे नविन लोक नवीन वातावरण.

मनातून कृत्तिका मात्र आनंदित होती. कृत्तिका तिथे जातातच तेथे तिला एक मुलगी दिसली. आपल्याला ह्या ठिकाणचे काही माहिती नसल्या कारणाने कृत्तिका ने तिच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला.

कृत्तिका त्या मुली जवळ येऊन ” हॅलो मी इथे न्यु जॉइन झाली आहे …तुम्ही मला सांगू शकाल का सेक्रेटरी ऑफीस कुठे आहे??”

” हो …तुम्ही तिसऱ्या मजल्यावर जाऊन डावीकडे एक ऑफीस आहे ते सेक्रेटरी ऑफीस आहे.” त्या मुलीने स्मितहास्य देत कृत्तिका ला समजावून सांगितले.

” थँकयू ” कृत्तिका ही तिचे आभार मानत सेक्रेटरी ऑफीस मार्गे निघून गेली.

काही वेळात कृत्तिका सेक्रेटरी ऑफीस समोर उभी होती, तिने तो थंड धातूचा हॅण्डल पकडून तिच्या दिशेने ओढले आणि ती रूम मध्ये जाताच तिला एक लांब पॉलिश टेबल दिसला . तिथे एका आरामदायी खुर्चीवर एक महिला विराजमान होती. ती एक तिशी मध्ये असलेली महिला वाटत होती पण तिच्या चेहऱ्यावर तिचे वय दिसून येत नव्हतं. ती अतिशय सुंदर दिसत होती आणि तिचे पाणीदार मोहक डोळे कोणालाही आपल्या जाळ्यात अडकवू शकत होते.

” हॅलो मि कृत्तिका, मी इथे नवीन जॉइन झाली आहे ….” कृत्तिका ने तिची ओळख करून देताच त्या महिलेने आपल्या लॅपटॉप वरचे लक्ष दूर करून तिच्या कडे पाहिले.

” हॅलो आय अम् दिव्या ” अस म्हणत तीने कृत्तिका ल बसण्याची खूण केली. ” मी तुझा रिझुयम पाहिल आहे आणि मला अस वाटते की तू स्टायलिस्ट डिपार्टमंटमध्ये फिट राहशील म्हणून ….”

” ग्रेट मला आवडेल तिथे काम करण ” कृत्तिका आपल्या चेहऱ्यावर मंदहस्या खेळवत म्हणाली.

” गुड, मिस सोनिया तेथील हेड आहेत , त्यांना भेटून ते तुला तुझी कामांची जबाबदारी सांगतील.” मिस दिव्या आपल्या लॅपटॉप वर काहीतरी महत्वाचं पाहत तिला म्हणाल्या.

” ओके देन, थँक्यु अगेन ” कृत्तिका त्यांचे आभार मानत ती खुर्चीवरून उठली.

कृत्तिका आपल्या नवीन स्टायलिस्ट डिपार्टमेंट मध्ये जाण्यासाठी फार उत्सुक होती.

तिथे गेल्यावर तिला काही वेळा पूर्वी मदत केलेली मुलगी दिसली. कृत्तिका तिच्या जवळ जाऊन ” हाय मी कृत्तिका ”
अस म्हणत तीने आपला हाथ मिळवण्यासाठी पुढे केला.

” हाय मी समिधा ….तू ह्या डिपार्टमेंट मध्ये आहेस का??” तिने आपला हाथ मिळवीत विचारले.

” होय पण त्या आधी मला मिस सोनिया यांच्यासोबत चर्चा करायची आहे .”

” ओके मिस सोनिया समोरून लेफ्ट कडे ऑफीस आहे तिथे भेटतील त्या ” समिधा ने कृत्तिका ला माहिती दिली.

” ओह थँक्यु सो मच ” कृत्तिका तिचे पुन्हा एकदा आभार मानून ती मिस सोनिया यांना भेटण्या साठी त्यांच्या ऑफीस कडे गेली.

तिथे गेल्यावर तिला मिस सोनिया यांनी तिच्या कामाची ओळख करून दिली. कृत्तिका आता तिच्या नवीन कामाला आनंदी मनाने सुरुवात केली.

कृत्तिका आणि समिधा यांची छान मैत्री जुळली. समिधा ही तिथे महिन्यापूर्वी जॉईन झाली होती.

संध्याकाळी आपली काम आटोपून कृत्तिका तिच्या नवीन घरी आली. आज ती खूप खुश ही होती. ती घरी पोहोचली तेव्हा आदित्य नव्हता आलेला. कृत्तिका ने घरी जाताच ती फ्रेश होऊन तिने संध्याकाळची सगळी कामं आटोपून ती कॉफी घेत आपला मोबाईल पाहत होती.

तेवढ्यात दाराची बेल वाजली तिने आपला कॉफी चा कप खाली ठेवून ती दरवाजा कडे गेली . तिने दरवाजा उघडताच तिला आदित्य दिसला. त्याचा चेहऱ्यावर तिला थकवा जाणवत होता.

” आदित्य नवीन ठिकाणी खूप काम होती वाटते….तू ना आधी फ्रेश होऊन घे ” कृत्तिका किचन मध्ये जाताना म्हणाली.

कृत्तिका ने त्याच्या साठी काही स्नॅक्स आणि कॉफी केली.
काही वेळात आदित्य तिच्या जवळ जाऊन बसला. त्याने कॉफी चा कप हातात घेत कृत्तिका कडे एक नजर टाकली. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तिचा आजचा पहिला दिवस छान गेला असा त्याने अंदाज केला.

” आजचा दिवस छान गेला ना..???” तो तिच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला.

” हो….खूप छान ” कृत्तिका मस्त हसत म्हणाली. ” आणि तुझा ???”

” माझा इतका काही छान नाही गेला. पण ठीक आहे “

” ओके कॉफी घे आणि रिलॅक्स हो ” कृत्तिका त्याचा कामाचा ताण दूर करण्यासाठी म्हणाली.

त्या दोघांनी कॉफी गप्पागोष्टी केल्या. रात्र होताच कृत्तिका ने स्वयंपाक केला. त्या दोघांनी लवकर जेवून घेतले. दुसऱ्या दिवशी लवकर उठावे लागेल म्हणून त्या दोघांनी लवकर झोपायच ठरवलं.

त्या दोघांना आपल्या नवीन कंपनी मध्ये चांगल्या प्रकारे रमून एक हफ्ता झाला होता. आणि आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. आज दोघेही नेहमी प्रमाणे लवकर न उठता उशिरा उठले. त्यांनी नाश्ता आणि बाकीची कामे आवरून ठरिल्याप्रमाणे ते आज पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या शनिवारवाडा पाहायला गेले.

” ओह शेवटी आपण इथे पोहोचलो….” कृत्तिका कार मधून उतरत म्हणाली.

” चलो फिर एंजॉय करते है ” आदित्य मस्त सुरात म्हणाला.

” किती लांब रांग आहे तिकीट साठी…..” कृत्तिका तिथे तिकीट काऊंटर समोर असलेली लांबलचक रांग पाहून आपल्या कपाळावर हाथ मारत म्हणाली.

” हे खूप प्रसिध्द ठिकाण आहे जान म्हणून इथे खूप गर्दी असते, तरी आपण लवकर आलो. ” आदित्य तिला समजावून सांगत होता.

त्या दोघांनी सरते शेवटी तिकीट मिळाले आणि त्या दोघांना आत मध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली.

आपल्या सुंदर डोळ्यांमध्ये कृत्तिका ते शनिवारवाड्याच्या कलाशिल्पला सामावून घेत होती. त्या काळचे जीवन कसे असेल याचे तिला फार कुतहल होते.

दिवसभर त्यांनी तो अप्रतिम कलेचा नमूना पाहत त्यांनी आपला दिवस उत्कृषटरित्या घालवला.

संध्याकाळी ते दोघे एक आलिशान हॉटेलात जेवणासाठी गेले.

” माझा आजचा दिवस खरच खूप छान गेला.” कृत्तिका घास घेत म्हणाली.

” माझा पण ” आदित्य स्मितहास्य करत म्हणाला.

” उद्या परत आपल्याला ड्यूटी आहे ..” कृत्तिका आपला चेहरा थोडा उदास करत म्हणाली.

” आपण नेक्स्ट संडे ला पुन्हा कुठेतरी जाऊ ” आदित्य तिचे मन वळवत म्हणाला.

त्यांनी आपले जेवण छान गप्पागोष्टी करत केले. आदित्यने हॉटेलचे बिल पे करुन ते दोघे कार मध्ये बसले. कृत्तिका ला कार मध्ये बसली असतानाच झोप लागत होती. तिचे डोळे हळुवार पने मिटून गेले.

घरी पोहोचतच आदित्य हळूच कार मधून उतरला. तो कृत्तिका च्या बाजूने जाऊन तिला हळुवार पने आपल्या हातांमध्ये उचलून घेतले. तो तिला आपल्या हातात घेऊनच त्यांच्या रूम पर्यंत चालत गेला. त्यांचा बेडरूम मध्ये पोहोचतच त्याने कृत्तिका ला हळुवारपणे तिला बेड वर झोपवले. त्याने तिचा चेहरा कुरुवळत तिच्या कपाळावर चुंबन घेतले आणि तो बाथरूम मध्ये गेला.

काही वेळात तो फ्रेश होऊन बाहेर आला आणि त्याने आपले कपडे बदलले. तो कृत्तिका च्या बाजूला जाऊन ब्लँकेट ओढून घेतले. आदित्य ही आज थकून गेला होता म्हणून तो ही डोळे मिटताच त्याला झोप लागून गेली.