Ritbhatmarathi

Search
Close this search box.

© स्वाती काकडे 

सूर्यकिरणांचा उबदार पणा जाणवताच कृत्तिका चे डोळे हळुवारपणे उघडले एक उसासा टाकून ती बेडवर उठून बसली पावलांचा थोडाही आवाज न करता ती सरळ बाथरूमच्या दिशेने गेली. थोड्याच वेळात ती तयार होऊन आरशात तिचेच प्रतिबिंब न्याहाळून बघत होती जणू ती किती सुंदर आहे याची सुखद भावना तिला आनंदित करत होती ” माझी त्वचा किती सॉफ्ट आहे असं म्हणत कृत्तिका आपल्या चेहऱ्याला हळुवार स्पर्श केला आणि नकळत तिच्या डोळ्यासमोर काल झालेला प्रसंग उभा राहिला.

फ्लॅशबॅक

मिसेस निता म्हणजे कृत्तिकाची आई त्यांनी कृत्तिकाला बोलताच ती आपला मोबाइल सोडून समोरच्या हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन बसली.

मिसेस निता ” तुला मिस्टर अभिनव माहित आहे ना?? आदित्यचे पप्पा ??” असं ऐकताच कृत्तिका थोडा विचार करू लागली आणि आठवताच हो मला माहित आहे ते बेस्ट फ्रेंड आहेत ना पप्पा चे.” म्हणाली. .

” बरोबर तर आज आपण संध्याकाळी त्यांच्या घरी जेवायला जाणार आहोत. ” कृत्तिका हळूच हसून ” ओके म्हणाली. “

“पण त्यापेक्षा मला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. तुझा फॅशन डिझाइनर चा कोर्स झाला आहे मला आणि तुझ्या पप्पांना असं वाटतं की तू आणि आदित्य परफेक्ट मॅच आहात तर आमची तुमच्या लग्ना विषयि डिस्कस करावं असं वाटतं आणि त्यासाठीच आपण जाणार आहोत.”

आपल्या आईच्या तोंडून हे शब्द ऐकताच कृत्तिका एकदम चकित झाली तिला तिच्या कानांवर विश्वास बसेना.

‘आम्हाला तुझी काळजी आहे म्हणून तू आमच्यावर विश्वास ठेवून होकार देशील असं मी गृहीत धरत आहे. ओके. मिसेस M निता कृत्तिकाचे कोणतेही मत ध्यानी न घेता त्यांनी निर्णय व्यक्त करून दिला होता.

कृत्तिका मात्र गोंधळलेली होती तिला काही सुचेना काय बोलू ते. तिने कधी लग्नाविषयी विचार केला नव्हता पण असं अचानक घरी हा विषय होत आहे तर तिला ते अवघडल्यासारखं झालं.

आपले डोळे मिचकावत ती आपल्या विचारातून बाहेर पडली आणि टॉवेलने आपले ओले केस पुसत ती आपल्या कपाटा जवळ आली. बेड वर टॉवेल फेकून तिने कपाटाचा दरवाजा उघडला आणि आज मी काय घालू??” असं म्हणत ती तिचे कपडे चाचपडून पाहत होती..

तिने एक आकाशी रंगाचा साधा पण सुंदर ड्रेस निवडला. तसं तर कृत्तिका ला काळा रंग आवडतो पण तिला आज तो घालू वाटत नव्हता.तिने कपडे घातले आणि सिम्पल मेकअप केला कारण तिला ‘ओव्हर’ दिसायचं नव्हतं पुन्हा एकदा तिने आरशात पाहिले ” सिम्पल बट ब्यूटीफुल” अस म्हणत गोड स्मितहास्य करून स्वतः ची प्रशंसा करत होती.

” तू खूप छान दिसत आहेस चल आता ” असं ऐकताच तिने मागे वळून पाहिले अन तिच्या आईला एक क्युट स्माईल देत रूमच्या बाहेर आली.

कृत्तिका तिची आई निता आणि मिस्टर रूपेश हे कार मध्ये बसले. आणि थोड्याच वेळात ते मिस्टर अभिनव यांच्या घरी पोहोचले.

कृत्तिका कार मधून उतरली तोच मिस्टर अभिनव जाधव यांचे भले मोठे मॉर्डन घर बघून आश्चर्यचकित झाली होती आणि तिच्या आई-वडिलांसोबत तिने घरात प्रवेश केला तर प्रवेशद्वारापासून ते हॉलपर्यंत ते घर स्वागत करत होतं.

तेवढ्यात मिस्टर जाधव आणि त्यांची मिसेस सुजाता आले आणि मिस्टर रूपेश यांनी हस्तांदोलन केलं आणि बोलत बोलत ते सर्व लोक डायनिंग हॉल मध्ये पोहोचले.

कृत्तिका कडे बघत ” अरे ही तर किट्टू आहे ना किती सुंदर झाली आहेस असं मिसेस सुजाता म्हणाल्या आणि कृत्तिका स्माईल करत ” हॅलो ” म्हणत ती खुर्चीवर बसली.

कृत्तिका घराचे काळजीपूर्वक निरीक्षण करत होती भिंतीवर काही चित्रे टांगलेली होती आणि ते अतिशय सुंदर होती तिच्या.

पुढयात एक लांब पॉलिस्टर लाकडी टेबल होता त्यावर सर्व मेजवानी नाजुकपणे सजवली होती ते सर्वजण गप्पा मध्ये गुंग असताना एक देखणा मुलगा हॉलमध्ये प्रवेश करत आला ” सॉरी पप्पा मी थोडा बिझी होतो असं म्हणत मिसेस सुजाताच्या बाजूला जाऊन बसला.

” हा माझा मुलगा आदित्य ” असं म्हणत मिस्टर अभिनव यांनी त्याची ओळख करून दिली.

“हॅलो’ असं आदराने आदित्य म्हणाला.

” आणि ती कृत्तिका मिस्टर रूपेश यांची मुलगी” असं मिस्टर अभिनव म्हणताच आदित्यने कृत्तिकाला बघण्यासाठि तिच्या दिशेने मान वळवली.

आदित्य एकटक पणे कृत्तिकाकडे बघत होता. त्याचं तसं बघणं तिला थोडा अस्वस्थ करत होत. आदित्य आणि कृत्तिकाची नजरानजर होताच तिने दुसरीकडे बघायला सुरुवात केली.

” हा पप्पा काहीतरी सांगणार होता ना तुम्ही??” असं आदित्य म्हणताच मिस्टर अभिनव उत्तर देत म्हणाले

‘अरे हा बेटा आम्हाला असं वाटते की तू आणि कृतिका एकमेकांसाठी पर्फेक्ट आहात तर तुमचं लग्न व्हावे अशी आमची इच्छा आहे.”

आदित्य हे ऐकून आधी थोडा धक्का बसला त्याने आपल्या भुवया उंचावत कृत्तिकाकडे क्षणभर बघितलं आणि त्याचा ओठांवर एक गोड हसू उमटले अॅलि ला त्याचा असा प्रतिसाद बघून विचारात पडली.

‘त्याला इतकं गोड हसण्यासारखं काय झालं’ याचा ती विचार करत होती.

“मग आम्ही ते होय म्हणून घेतो, कृत्तिकाला माझी सून म्हणून पाहण्याची वाट पाहू शकत नाही.” असं मिसेस सुजाता आनंदित होऊन म्हणाल्या.

मिसेस सुजाताचे ते शब्द ऐकून कृत्तिकाचे डोळे विस्फारले गेले आणि ती फक्त त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघत बसली. कृत्तिक ला आता हे स्पष्ट झालं होतं की तिचं आणि आदित्यच्या लग्नासाठी त्यांचे कुटुंबीय खरंच गंभीर झाले आहेत.

“आणि आदित्यला आमचा जावई म्हणून खूप आनंद होईल असं कृत्तिकाची आई सुद्धा हसत म्हणाली.

सर्वजण या याविषयी खूप आनंदित होते.

कृत्तिकामात्र आदित्यचा त्रासलेला चेहरा बघण्याच्या अपेक्षित होती पण ती तिच्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकत नव्हती तिने आदित्यकडे बघण्यासाठी मान वळवली आणि तो तिला गोंडस हास्य करताना दिसला. तो तिला खूप क्युट वाटला आपले विचार वेगळ्याच दिशेने वळत आहे म्हणून तिने आपल लक्ष दुसरीकडे वळवले.

तेवढ्यात मिस्टर अभिनव “बरं आदित्य तिला आपलं घर दाखवणार म्हणजे तीला थोडी आपल्या घराची ओळख होऊन जाईल” असं म्हणत बाकी लोकांनी आदित्य आणि कृत्तिकाला एकांत वेळ मिळावा म्हणून बहाणा केला आणि आदित्यने होकारार्थी मान हलवून कृत्तिकाकडे बघत

‘चल जाऊ या’ असा इशारा केला.

कृत्तिका तिच्या उत्सूक नजरेने या सुंदर घराचे निरीक्षण करत होती. भिंतीवरील टांगलेल्या चित्रांकडे बघत असताना तिचं लक्ष चालन्याकडे नव्हत आणि ती आदित्यच्या पाठीशी धडकली आणि मागे सरकून तिच कपाळ वेदना कमी करण्यासाठी चोळत होती.

आदित्य तिच्याकडे वळला आणि ” अरे तू ठिक आहेस का ???” अस तो तिच्या डोळ्यांमध्ये बघत म्हणाला.

“मी ठीक आहे” असं कृत्तिका ने पटकन उत्तर दिलं आणि मान खाली वळवली. तिला तिचे गाल गुलाबी झाले असल्याचा भास झाला.

अचानक आदित्यने कृत्तिकाचे मनगट पकडून त्याच्या सोबत खेचले, कृत्तिकाला त्याच्या ह्या अनोळखी वागण्याने आश्चर्यचकित झाली आणि त्याच्या मागे चालत असताना तिच्या ध्यानी हि आले नाही की ती एका आता आलिशान खोलीत आली आहे आणि त्याने तिचा हात देखील सोडला आहे.

ती खोलीच्या आजूबाजूला बघत पुढे गेली जुन्या आणि नवीन फॅशन एक परिपूर्ण मिश्रण होत. खोलीचे कोपरे आणि भिंतीवर आकर्षक कोरिव काम केलेलं होतं आणि कोणत्याही व्यक्तीचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते पुरेसं होतं.

कृत्तिका त्या दृश्याचे आश्चर्य करत त्यामध्ये रमून गेली होती पणतिला तिच्या मागे कोणीतरी उभं असल्याची जाणीव होत आहे

तोच तिचं लक्ष आदित्यकडे गेलं.

“तुला आवडली का??” असं आदित्यने कृत्तिकाला विचारलं आणि तिने त्याच्याकडे न बघताच होकारार्थी मान हलवली. आणि ती ऐकून शॉक झाली जेव्हा आदित्य तिला म्हणाला की ही आता आपली रूम आहे.”

तोच कृत्तिका आदित्यकडे बघण्यासाठी मागे वळली. आदित्य आणि तिचा चेहरा फक्त काही इंच दूर होते आणि आदित्य मात्र छान स्मितहास्य करून तिला थोडं एडिटेड करण्याचा प्रयत्न करत होता. तिला तसं त्रासलेला बघून त्याला मात्र मजा वाटत होती जणू कृत्तिका त्याचं काही खेळणं आहे अस तो तिला वागवत होता.

आदित्यच्या डोक्यात नक्की काय चालू आहे ते कृत्तिकाला कळेना. काही क्षणांसाठी कृत्तिकाला मात्र त्याचा रागच आला पण ते ति दाखवू शकत नव्हती.

क्रमश: