Ritbhatmarathi

Search
Close this search box.

“केस नंबर तीनशे ऐंशी..”

उद्घोषणा झाली.. हाता मध्ये बेड्या असलेला आदित्य हळूहळू पावले टाकत आत आला आणि उजव्या बाजूला असलेल्या अपराधीचा कक्षात जाऊन उभा राहिला.. डोळे लाल भडक होते,कदाचित रात्रभर झोपलेला नव्हता. रडून रडून त्याचे डोळे सुजलेले होते.. आठ दिवसांपासून अंगावर तेच कपडे होते.. जे त्याने त्यादिवशी घातले होते.. तोच दिवस ज्या दिवशी ती घटना घडली.. त्याचा गावातीलच मित्राचा सुनील चा जीव गेला होता…

न्यायालयात गर्दी होती.. सुनील ची बायको त्याचा पाच वर्षाचा मुलाला मांडीवर घेऊन बसली होती.. मागे गर्दी मध्ये तिची आई छोट्या मुलीला कडेवर घेऊन उभी होती.. चुकून रडायला लागली तर लगेच बाहेरचा बाहेर जाता याव म्हणून पण त्या मुली पेक्षा त्यांचाच डोळ्यात जास्त पाणी होत..ऐन तरुणपणी त्यांची पोरगी विधवा झाली होती… त्यांना न्याय हवा होता.

बचाव पक्षाचे वकील अगदी आत्मविश्वासाने बसले होते.. एड्वोकेट प्रधान.. मुंबई मधील नावाजलेले वकील.. अगदी मोठमोठ्या सेलेब्रेटी लोकांचा खटला त्यांनी लढवला होता आणि जिंकला होता.. वय वर्ष चालीश पण आज पर्यन्त कोणतीही केस हरले नव्हते.. सांगतील तेवढं मानधन देऊन आदित्य चा वडिलांनी या वकिलांकडे वकीलपत्र दिल होत.. परंतु घटना स्थळी सापडलेले पुरावे आदित्य चा विरोधात होते..

आरोपी पक्षाचे वकील एड्वोकेट कुदळे होते.. पण समोर एवढा मोठा वकील पाहून त्यांचं अवसान आधीच गळाल होत.. कपाळावर घाम जमा झाला होता.. त्यांनी खिशातून रुमाल काढून अलगद घाम पुसला आणि रुमाल खिशात ठेवला…

न्यायाधीश बोलले.. “कारवाई सुरू करा…”

आरोपी पक्षाचे वकील उठले आणि बोलू लागले…

“जजसाहेब.. आरोपी चा पिंजर्‍यात उभा असलेला हा व्यक्ति दिसतो तसा नाहीये… त्याने मयत सुनील याचा अत्यंत निर्घुण रित्या खून केला आहे….त्या दिवशी…

आरोपीचे वकील त्या दिवशीची घटना सांगू लागले..

आदित्य आणि सुनील चांगले मित्र होते.. आदित्य चा घरात बर्‍यापैकी श्रीमंती होती.. सुनील पण तसा खाऊन पिऊन सुखी होता.. जवळचा एम आय डी सी मध्ये कायमस्वरूपी कामगार होता.. कंपनी कडून बर्‍याच सुविधा त्याला मिळायचा.. ज्यात बस ने येणे जाणे.. कंपनी मध्ये फ्री कॅंटीन तसेच परिवारा करिता आरोग्य विमा आणि त्याला स्वत:ला अपघाती विमा होता.. एकंदरीत व्यवस्थित चालू होत त्याच… सुनील ला जागा घेण्यासाठी आदित्य ने पैशांची मदत देखील केली होती.. पण दोन वर्ष होवून पण त्याने पैसे परत केले नव्हते…

त्यादिवशी संध्याकाळी दारूचा पार्टी साठी दोघे एकत्र जमले.. पार्टी म्हणजे जवळचा टेकडीवर ते दोघे रात्रीचे निवांत बसून बियर प्यायचे… टेकडीवर पोहचताच रिमझिम पाऊस सुरू झाला होता.. तरीही दोघे निवांत बसले होते… आदित्य एका दगडावर बसला होता तर सुनील समोरच खाली बसून शेंगदाणे चघळत एक एक घोट बियर पित होता.. अचानक त्यांचा दोघात पैशांचा देवाण घेवाणी मधून वाद झाला…आदित्य ने बाजूचा मोठ्या दगडावर बियर ची बाटली फोडली आणि मग हातातील धारदार फुटलेल्या तुकड्याने सुनील चा गळ्यावर वार केला.. सुनील चा गळ्या चा शिरा एका वारा नेच कापल्या गेल्या भयंकर रक्तस्त्राव सुरू झाला.. आदित्य ने सुनील ला खांद्यावर घेतलं आणि खाली येऊ लागला पण तो पर्यन्त त्याचा जीव गेला होता…

एवढा घटनाक्रम सांगून वकील साहेब पुढे बोलले…

“आदित्य ने पैशांचा देवाण घेवाणी मधून जाणून बुजून सुनील चा खून केला आहे.. त्याचा अपराधा ची शिक्षा म्हणून त्याला फाशी देण्यात यावी…”

वकील आपली बाजू मांडून आपल्या जागेवर जाऊन बसले..

न्यायालयात पुन्हा एकदा स्मशान शांतता पसरली..

न्यायालयातच एका बाजूला आपल्या दोन वर्षाचा छोट्या मुलाला घेऊन आदित्य ची बायको बसली होती.. तिने कित्येक वेळा आदित्य ला समजावून सांगितलं होत की पैशांचा व्यवहार जपून करत जावा म्हणून… पण आदित्य कधीच कोणाचं ऐकत नव्हता.. कोणीजरी येऊन त्याला पैशांची मदत मागितली की तो लगेच करायचा.. बर्‍याच वेळा खोट कारण सांगून मित्र त्याचा कडून पैसे घ्यायचे.. परत देखील द्यायचे नाहीत..आदित्य पण कधीच कोणाला पैसे परत मागत नसायचा.. कोणी आपण हून परत दिले तरच घ्यायचा… सुनील नेही त्याचा कडून असेच पैसे घेतले होते आणि परत केले नव्हते.. पण पैशा साठी आदित्य ने खून केला हे त्याचा बायको ला पटत नव्हतं.. पण आता न्यायालया चा निर्णया वर तीच आणि तिचा लहानग्या मुलाच भविष्य अवलंबून होत.. तिला न्याय हवा होता..

इतका वेळ शांत बसलेले एड्वोकेट प्रधान उठले.. त्यांनी हळूवार पणे त्यांचा फाइल मधून एक लिफाफा काढला आणि करकुना कडे दिला.. त्याने तो लिफाफा जजसाहेबांचा हातात दिला…

आपल्या धीरगंभीर आवाजात ते बोलू लागले…

“त्या रात्री नक्की काय घडलं हे वकील साहेबांनी अस वर्णन करून सांगितलं जस ते स्वत:च तिथे उपस्थित होते.. मला वाटत त्यांनी एखाद्या चित्रपटाची कथा लिहायला घ्यावी.. उत्तम लिहतील ते..”

न्यायालयात एका कोपर्‍यात हशा पिकला..

जजसाहेबांनी आपला लाकडी हातोडा दोनदा आपटला..

“एड्वोकेट.. तुम्ही मुद्दयाच बोला…” जजसाहेब बोलले..

“तुमचा हातात एक लिफाफा आहे.. त्यातील कागदपत्र पाहा…” एड्वोकेट प्रधान बोलले..

“त्या प्रतिज्ञा पत्रा मध्ये सुनील चा पत्नी यांनी स्पष्टपणे लिहून दिलेल आहे की सुनील चा मृत्यू हा अपघाती आहे.. हे पत्र त्यांनी सुनील चा कंपनी मध्ये जमा केल होत.. ज्याने यांना सुनील चा अपघाती विमेचे चालीस लाख मिळतील…कदाचित जमा देखील झाले असतील…” एड्वोकेट प्रधान सुनील चा बायको कडे पाहत बोलले..

सुनील चा बायको ला आठवलं की सुनील चा मृत्यू नंतर तिचा भावाने कंपनी व्यवस्थापना सोबत चर्चा करून तीच भविष्य सुरक्षित व्हावं आणि मुलांना चांगलं आयुष्य मिळावं म्हणून ते प्रतिज्ञापत्र तयार करून घेतलं होत.अपघाती निधन असल्यास विमा कंपनी कडून जास्त रक्कम मिळणार होती… म्हणून प्रतिज्ञापत्रात अपघाती निधन अशी नोंद करून त्यावर सुनील चा बायकोने स्वाक्षरी केली होती.. कालच पैशे देखील जमा झाले होते…

त्या एका प्रतिज्ञा पत्राने पूर्ण न्यायालयात खळबळ उडाली… पूर्ण खटल्याची दिशा बदलली…

जजसाहेबांनी आदित्य ला निर्दोष मुक्त केल…

अगदी काही तासांसाठी एड्वोकेट प्रधान लाखों रुपये का घेतात हे आदित्य चा वडिलांना कळून चुकल होत.. अत्यंत हुशारीने त्यांनी विमा कंपनी कडून ते प्रतिज्ञा पत्र मिळवल होत..

बाहेर पडताच आदित्य ची बायको आदित्य चा गळ्यात पडली.. तिचा दृष्टीने तिला न्याय मिळाला होता.. पण आदित्य अजूनही निराश होता… त्याची नजर समोर गेली… सुनील ची बायको कडेवर छोट्या मुलीला घेऊन उभी होती.. तिचा बोटाला धरून पाच वर्षाचा मुलगा उभा होता…

आदित्य हळूवार पणे चालत त्यांचा समोर जाऊन उभा राहिला… त्याने अलगद हात जोडले आणि डोळ्यात पाणी आणून बोलू लागला…

“ताई… न्यायालयाने जरी मला निर्दोष सोडलं असल तरी जोपर्यंत तुमचा नजरेत मी दोषी आहे तोपर्यंत मला सुख नाही मिळणार.. मी दुसर्‍या कोणाला नाही पण तुम्हाला उत्तर देणे लागतो… मी माझा मुलाची शपथ घेऊन सांगतो… त्यादिवशी आम्ही बियर पित बसलो होतो पण पैशांचा विषय पण निघाला नाही… सुनील ने स्वत: समोरचा दगडावर बाटली दारूचा नशे मध्ये आपटली आणि मग बाटलीचा एक धारदार तुकडा उडून त्याचा गळ्यात घुसला… आणि मग रक्ताची धार लागली.. मी खूप प्रयत्न केले.. अगदी खांद्यावर उचलून पळत होतो त्याला वाचवायला पण नाही वाचवू शकलो….”

बोलता बोलता आदित्य ढसा ढसा रडू लागला… सुनील चा बायकोचे पण डोळे पाणावले.. त्यांचा लग्ना पासून ते घर घेण्या पर्यन्त प्रत्येक ठिकाणी आदित्य कायम सुनील चा मागे उभा असायचा.. आदित्य सुनील चा जीव घेईल हे तिला पण पटत नव्हतं पण परिस्थिति आणि नातेवाईक यांचा सल्ल्या नुसार तिने केस उभी केली होती…

पण आता मात्र तिची खात्री झाली होती.. जे झालं त्यात आदित्य ची चूक नव्हती… तिचा नजरेत आदित्य अपराधी नव्हता…सुनील चा मृत्यू हा अपघाती होता..

कधीकधी दोष हा फक्त परिस्थिति चा असतो… ज्यावर कोणीच काही करू शकत नाही..