Ritbhatmarathi

Search
Close this search box.

“सेजल व विनयच लग्न होऊन ‘तीन महीने’ झाले होते. दोघांचा, ‘सुखी संसार’ चालु होता. घरच वातावरण पण खुप सुंदर होत. त्यामुळे सेजलला रुळायला जास्त वेळ लागला नाही. हसत खेळत दिवस जात होते. सेजल व विनयचा, ‘प्रेम विवाह’ झाला होता. दोघे एकाच, ‘कंपनीमध्ये’ काम करत होते. घरी लग्नाचा विषय चालु झाल्यावर दोघांनी आपापल्या घरी सांगितल की, मी माझा, ‘लाइफ पार्टनर’ शोधला आहे. घरचे सुशिक्षीत असल्यामुळे व आत्ताच्या जनरेशन नुसार विचार करणारे होते, त्यामूळे लग्नाला विरोध होण अस काही झाल नाही.

दोघांच्या हि  घरातुन, ‘परवानगी’ मिळाली व दोघांच लग्न झाल.” “विनयचे आई वडील आता, ‘रीटायर्ड’ झाले होते. त्यामुळे घरी त्यांचा वेळ जात नव्हता त्यामुळे आता ते सेजलच्या मागे लागले होते की ‘लवकर बाळाचा विचार करा’. सेजलने ते विनयला सांगितले, “आई बाळाचा विचार करा म्हणत आहे”. पण विनय आता ही, ‘जबाबदारी’ घ्यायला तयार नव्हता. तस बघायला गेल तर सेजल सुध्दा हया साठी तयार नव्हती. त्यामुळे विनय नाही बोलल्यामुळे ती आता बिनधास्त झाली होती.” “सेजल संध्याकाळच सर्व काम आवरून हॉलमध्ये बसली होती. तेव्हा विनयच्या आई म्हणजेच प्रमिलाताईंनी सेजलकडे परत विषय काढला. तेव्हा सेजलने विनय आत्ताच नाही म्हणत आहे अस सांगते. तेव्हा प्रमिलाताईंचा मुड ऑफ होतो. पण त्या विनयशी बोलायच ठरवतात. पण सेजल तु तर समजवायच ना ! पुरुषांच्या  वयाला मर्यादा नाही ग बाबा होण्यासाठी पण आपल्या स्त्रियांना वयाच बंधन असंत.  योग्य वयात सगळ झाल तर चांगल असत. तु तर समजाव त्याला तुझ ऐकेल तो. सेजल फक्त हो म्हणते व आपल्या रुममध्ये जाते.“ रात्रीची जेवणं झाल्यावर सगळे हॉलमध्ये बसले होते. छान गप्पा चालु होत्या.

विनयचा मुड पण चांगला दिसत होता. हीच संधि सांधुन प्रमिलाताईनी विनयकडे विषय काढतात. “विनय लग्नाला चार महिने होत आले बाळाचा विचार कधी करणार ?”’’इतक्यात नाही करायचा आम्हाला बाळाचा विचार” आता कुठे ‘नोकरीच मार्गी’ लागत आहे. सेजलच पण आता प्रमोशन होईल त्यात हे सगळ नकोय मला.“अरे पण आम्ही कुठे सेजलला नोकरी सोड म्हणतोय. ती करुदे ना नोकरी आता आम्ही पण रिआयर्ड झालो आहोत आम्ही सांभाळु ना बाळाला तुम्ही दोघे जा तुमच्या नोकरीला.”आई उगाच मागे लागु नको ग, आजुन ‘एक दोन वर्ष’ तर आम्ही बाळाचा विचार करणार नाही;. त्यामुळे आता हा विषय नको काढु. विनयने फायनल त्याच मत सांगुन टाकलं आणि तो व सेजल रुममध्ये निघुन गेले.विनयच्या हया बोलण्यावर प्रमिलाताईंना काहीच बोलता येईना. त्या उदास झाल्या. अहो कस समजाव हया मुलांना वयाप्रमाणे सगळ व्हायला हव की नको ?मनोहरराव विनयचे बाबा “मी तुला सांगत होतो ना तु त्यांच्या जास्त मागे नको लागु आत्ताच्या मुलांच त्याबाबतीत खुप प्लॅनिंग असत ते त्यांना हव तसच आणि हव तेव्हा बाळाचा विचार करतात.

त्यामुळे तु आता हयामध्ये जास्त लक्ष नको घालु तु दुसऱ्या गोष्टीत मन रमवायला शिक आता “प्रमिलाताईना हे फारस पटलं नव्हत, पण त्यांना मुलांच्या निर्णयासमोर काहीच बोलता आलं नाही. त्या आपलं मन पुस्तक वाचण्यात, फिरायला जाण्यात रमवु लागल्या; व सेजला घरच्या कामात मदत करु लागल्या.बघता बघता कधी तीन वर्ष गेली कळलच नाही. आता मात्र प्रमिलाताईंना रहावेना. त्या परत सेजलशी बोलल्या “सेजल आता तीन वर्ष झाली लग्नाला आता तरी विचार करणार अहात की नाही बाळाचा ? की आजुन तुम्हाला थांबायचच आहे.”सेजल “नाही आई आम्ही दोन वर्ष झाल्यानंतर लगेच चान्स घ्यायच ठरवल होत; पण अजुन गुड न्युज मिळतच नाहीये.” “काय सांगतेस? मग हे मला आधी सांगायच नाही का ? आपण कोणत्या तरी डॉक्टरांना दाखवल असत ना”….प्रमिलाताई अहो, आई होईल कशाला डॉक्टरांना दाखवायचं ?बघु थोडया दिवसांनी,अस बोलुन सेजल तेथुन निघुन जाते.थोडे दिवस जाऊ दे अस करत करत, ‘चार वर्ष’ होत आली तरी सुध्दा काहीच गुडन्युज नाही.

आता मात्र, सेजल व विनय डॉक्टरांना दाखवुन येतात व डॉक्टरांची ट्रिटमेंट सुरु ठेवतात.“पुढे दिवस असेच जात होते. बघता बघता वर्ष सरत होती पण सेजलची गुडन्युज काही ऐकायला मिळत नव्हती. आता तर शेजारी-पाजारी सुध्दा नको नको ते बोलु लागले होते. ते प्रमिलाताईंना ऐकवेना त्यांना त्याच वाईट वाटु लागले. हया सगळया टेन्शने ने प्रमिलाताईंना बिपी चा त्रास सुरु झाला.”सेजल तर, ‘पुर्ण खचुन गेली’ लोकांच्या बोलण्याचा तिला त्रास होवु लागला. ती शक्य तितके कामात मन लावु लागली. “एके दिवशी शेजारच्या काकुंच्या सुनेचे डोहाळे जेवण होते. काकुनी प्रमिलाताईंना निमंत्रण दिले.  प्रमिलाताई व सेजल त्या कार्यक्रमाला गेल्या सगळे त्यांच्या सुनेची ओटी भरत होत्या. प्रमिलाताई सुध्दा तिच्यासाठी ओटी घेवुन गेल्या होत्या. पण प्रमिलाताई ती ओटी सेजलला भरण्यसास सांगतात. सेजल ओटी भरायला जात असते तोपर्यत शेजारच्या काकु तिला आडवतात. थांब तु नको भरुस ओटी………प्रमिलाताई तुम्ही वाईट वाटुन नको घेवु पण तुम्हीच भरा ओटी…  तुमची सुन नको……”हो हो प्रमिलाताई तुम्हीच भरा, “वांजोटया बाईन ओटी भरायची नसते”……..

दुसऱ्या एका शेजारच्या बाई  बोलल्या“ते ऐकुन सेजलला रडु आवरेना ती तेथुन रडतच बाहेर गेली.” प्रमिलाताईंना पण तिथे राहु वाटेना त्या ओटी भरुन लगेच तेथुन निघुन आल्या.“सेजल रडत रडत तिच्या रुममध्ये जाते विनय त्याच्या रुममध्येच बसला होता. सेजलला अस पाहुन त्याला काहीच कळेना तो सेजल जवळ जातो. सेजल काय झाल तु का रडतेयस…..”“विनय जवळ आल्यावर सेजल त्याला मिठी मारुन रडु लागते. ‘मी वाजोंटी नाहीये’…….हा एकच शब्द तिच्या तोडांतुन येत होता. तोपर्यत प्रमिलाताई तिथे येतात पण त्या रुमच्या बाहेरच थांबतात.”“सेजल रडतच  होती. ‘विनय मी वांजोटी नाहीये रे’,……..’मला पण आई व्हायच आहे’………..’मला आई व्हायच आहे’. सेजल अस बोलुन खुप रडत होती विनय तिला खुप समजावत होता.”“विनय, ‘आईंनी मला सांगितल होत’. आपल्या, ‘स्त्रियांना वयाची मर्यादा असते’. सगळया गोष्टी वेळेतच झाल्या पाहिजेत; पण मी त्यावेळी त्याच्या बोलण्याकडे, ‘दुर्लक्ष’ केल. त्यांच ऐकल नाही; त्यावेळी त्यांच ऐकल असत तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. का ऐकल नाही मी त्यावेळी………..’मला आई व्हायच आहे रे’……….ती बाळाची चाहुल अनुभवायची आहे, त्याच ते पोटात लाथ मारण अनुभवायच आहे मला, त्याला खुशीत घ्यायच आहे, त्याचे लाड करायचे आहे. मला आई व्हायच आहे.”“हे सगळ पाहुन विनयला व प्रमिलाताईना रडु आवरेना त्यांचे पण डोळे पानावले. दोघांना पण सेजलची अवस्था पहावेना.”विनय व प्रमिलाताई सेजलची समजुत काढतात. व तिला शांत करतात.“डॉक्टांच्याकडे उपचार तर सुरु होते; पण त्याचाही काही उपयोग हाईना, असच वाटु लागल होत.

वर्षामागुन वर्ष सरत गेली. 10 वर्ष कशी गेली कळलच नाही.”किती डॉक्टर केले देवधर्म केले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आता तर सेजलने आशाच सोडुन दिली होती. पण हया सगळयात खुप वाईट असस्था करुन घेतली होती तिने जास्त बाहेर पडायच नाही. कोणत्या कार्यक्रमात जायच नाही. कोणाशी जास्त बोलायच नाही. एकट एकट रहायच. तिची ही अवस्था कोणालाच पहावत नव्हती पण ते पहाण्याशिवाय कोणाकडेच पर्याय नव्हता.“असेच दिवस जात होते. एके दिवशी दुपारी काम आवरुन सेजल झोपायला जात होती; पण अचानक तिचा तोल गेला, व ती चक्कर येवुन खाली पडली. कोणाला काहीच कळेना विनयने डॉक्टरांना बोलावले. त्यांनी सेजला तपासले, डॉक्टरांनी सेजलला काही प्रश्न विचारले व तपासुन बाहेर आले.”विनय सेजला घेवुन उदया क्लिनिकला येवुन जा मला तिच्या काही टेस्ट करायच्या आहेत. एवढ बोलुन डॉक्टर निघुन गेले. विनयला काहीच कळेना काय झाल असेल सेजलला कसल्या टेस्ट करायच्या असतील डॉक्टरांना….विनयला आता टेन्शन येवु लागल.दुसऱ्या दिवशी विनय सेजला घेवुन क्लिनिकला गेला. डॉक्टरांनी सेजलच्या टेस्ट केल्या, व थोडावेळ दोघांना बाहेर थांबायला सांगितलं.थोड्यावेळात टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरानी विनयला व सेजलला बोलावले. दोघांनाही टेंशन आल होत. नेमक रीपोर्ट मध्ये काय असेल. ते दोघे थोड घाबरतच डॉक्टरांच्याकडे जातात.

विनय धाडस करून डॉक्टरांना विचारतो डॉक्टर रीपोर्टमध्ये काय सांगितलं आहे? “विनय तू व सेजल आई बाबा होणार आहात…”“डॉक्टरांच्या ह्या वाक्याने दोघांनांचा आनंद गगनात मावेना. सेजलची मातृत्वाची आस एकदाची संपली. कधी एकदा ही बातमी प्रमिलाताईंना सांगतो अस त्यांना झालं होत. दोघेही डॉक्टरांना बाकीच्या ट्रीटमेंटची माहिती विचारून घरी जातात.” दोघे घरी येतात,दोघांना पाहुन प्रमिलाताई त्याच्याजवळ जातात, काय झालं काय म्हणाले डॉक्टर?दोघे काहीच बोलत नाहीत, तसेच शांत उभे राहतात; पण प्रमिलाताईंना पाहुन सेजलच्या डोळयात पाणी येत. प्रमिलाताईंना ते दिसतं, अरे काय झालय सांगा ना सेजलच्या डोळयात पाणी का आलय? विनय तु तर बोल,आई ते…ते…ते……….तुsss मी काय अरे, बोल पटकण……..प्रमिलाताई“आई तु आज्जी होणार आहेस”येवढच ना,………..काय,? काय बोललास मी……….मी आज्जी होणार आहे. प्रमिलाताईंचा आनंद गगणात मावेना ज्या गोष्टीची त्यांना आतुरता होती, आता ती पुर्ण झाली. त्या सेजल जवळ जातात.सेजल प्रमीलाताईना मिठी मारते. आई माझी मातृतवाची आस 10 वर्षानी पूर्ण झाली. अस बोलुन सेजल रडु लागते,ये वेडाबाई, अस रडायच नसत, आता नेहमी आनंदी रहायचं. डोळे पुस पाहु. प्रमिलाताई सेजलचे डोळे पुसत बोलत.प्रमिलाताईंना तर सेजलसाठी काय करु आणि काय नको अस झाल होत. तिला काय खाऊ पिऊ वाटतट की लगेच बनवुन दयायच्या, बघता बघता दिवस सरत होते. तिचे प्रत्येक कार्यक्रम प्रमिलाताई खुप मोठयाने करतात.

चोरचाळी असो वा डोहाळेजेवण, डोहाळजेवण तर खुप मोठयाने करतात. सगळया पाहुन्यांना सांगतात आणि ज्यांनी सेजलला वांजोटी बोललं होत त्यांना तर प्रमिलाताईं आवरजुन बोलवतात.“डोहाळेजवण खुप सुंदर पणे होतो. बघता बघता नऊ महीने होतात  सेजलला व विनयल गोड अशी मुलगी होते. ‘प्रमिलाताईच्या घरात लक्ष्मी येते’. प्रमिलाताईंना मुलगी नव्हती त्यामुळे त्यांना तर खुप आनंद होतो.”***(ही कथा काल्पनिक आहे ह्याचा काही सबंध अढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)हा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो….तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका…..

===========================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *